1.पर्जन्य मापक
पर्जन्य मापक म्हणजे पाऊस मोजण्याची मापन .
पर्जन्यमापक तयार करण्याची पद्धत
पर्जन्यमापक बनवण्यासाठी सगळे सोपी पद्धत आणि कमी खर्चात.
प्रथम एक बॉटल घेतली.
बॉटल च्या वरचा भाग कापून नरसाळेचा उपयोग केला
बॉटलचा तळसपट करण्यासाठी सिमेंट टाकले.
बॉटल बसून सर्वात सोपे पर्जन्यमापक तयार केले.
आलेख
दिवस | Humidity | ml | MM | Total |
सोमवारी | 93% | 26 | 2.30 | 355.3 |
मंगळवार | 94% | 12 | 1.06 | 356.36 |
बुधवार | 89% | 12 | 1.06 | 357.42 |
गुरुवार | 90% | 17 | 1.50 | 358.92 |
शुक्रवार | 91% | – | – | – |
रविवार | 90% | 25 | 2.21 | 361.13 |
2) वायर गेज मोजणे
वायेर गेज मोजणे म्हणजे विविध तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात वायर्स, केबल्स किंवा तारांची जाडी मोजणे.
वायेर गेज मोजण्यासाठी विशेष साधने, जसे की वायेर गेज किंवा मायक्रोमीटर , वापरले जातात.
साहित्य – वेगवेगळ्या गेजच्या वायर
साधने – 1] वायर गेज 2] स्ट्रिपर
अनुमान – गेज पुढीलप्रमाणे लिहितात
1] 1/18 – एक तार 18 गेजची
2] 2/20 – तीन तारा 20 गेजची
3)डिझेल इंजिन ( जनरेटर)
इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वलामार्ग यांत्रिका ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात
प्रथम ज्वलन झाल्यावर उष्णता निर्माण होते. उष्णता मुळे दाब तयार होतो व दाबामुळे गती मिळते.
आम्ही डिझेल इंजिनची माहिती घेतली आणि त्याच्या प्रत्यक्ष भागांची माहिती घेतली. हे चालू आणि बंद करायचे
मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतले.
रासायनिक ऊर्जा > उष्णता > दाब > गती
इंजिनचे प्रकार:
1) बाह्य ज्वलन इंजन (
2) अंतर्गत ज्वलन इंजिन.
4)Dc and AC circuit
विद्युत प्रणालीमध्ये DC (डायरेक्ट करंट) आणि AC (अल्टरनेटिंग करंट) या
दोन्ही प्रकारांचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो.
DC म्हणजे विद्युत प्रवाह जो एकाच दिशेत वाहतो.
बॅटरी, सोलर पॅनेल, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामध्ये DC करंटचा वापर होतो.
बरेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे DC करंटवर काम करतात, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम असतात.
AC म्हणजे आल्टरनेटिंग करंट. यामध्ये करंटची दिशा आणि मात्रा वेळोवेळी बदलते.
घरगुती आणि औद्योगिक वीज, पुरवठाइलेक्ट्रिक,मोटर्सलाइटिंग, सिस्टीम्स उपकरणे यामध्ये Ac करंटचा वापर होतो.
AC करंट वेगवेगळ्या दिशांनी वाहतो, ज्यामुळे तो ट्रान्सफॉर्मरद्वारे सहजपणे वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
5)एलईडी माळा ( LED lights )
डेकोरेशन साठी एलईडी मळा आम्ही बनवल्या त्यामध्ये शोल्डरिंग शिकलो. सिरीज आणि
पार्लर मध्ये एलईडी माळा असतात.या माळेमध्ये विविध
रंगांच्या एलईडी दिव्यांचा समावेश असतो, ज्यामुळे घराला एक आकर्षक रूप मिळते.
माळासाठी लागणारे साहित्य.
Costing:
Product Decription | Quantity | Rate | Amount |
LED Bulb | 50 | 5.50rs | 275 |
Sunrise single wire (7×76) | 1 | 200rs | 200 |
2 pin Plug | 1 | 25 | 25 |
Quick Fix soldering wire | 1 | 50 | 50 |
kunjan mini regular Cap | 50 | 1.30rs | 65 |
6)मूलभूत साधने
साधनांची विविध कामासाठी गरज असते. साधने विविध कामांसाठी लागतात. इलेक्ट्रिशन किंवा वायरमेन या साधनांचा वापर करतात
मुख्य लागणारे साधने .
1) पक्कड( वेगळे प्रकार)
2) कॉम्बिनेशन प्लायर ( combination plier)
3) नोज प्लायर ( Nose plier)
4) मेजरमेंट टेप (Measurement tape )
5) गुना ( Try square)
6) हातोडी ( Hammer)
7) टेस्ट लॅम्प ( Test lamp )
8) लाईन टेस्टर ( Line tester)
9) स्कु ड्रायव्हर ( Screwdriver )
10) (मशीन्स )All type machines
11) इन्सुलेशन टेप ( Insulation tape )
12) हॅन्ड ग्लव्स (Hand gloves)
13) स्त्रीपर ( Stripper )
या सर्वांचं उपयोग इलेक्ट्रिक कामांसाठी होतो.
सीसीटीव्ही कॅमेरेच्या रिपेरिंग त्याचे मी BNC connector बसवले. पूर्ण सीसीटीव्ही चेक केला
व सर्व दुरुस्ती केले. Fab lab मधला डीव्हीआर पण बसवला आणि एक सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन पण केला.
त्यात वापरलेले साहित्य : स्टेपर, इन्सुलेशन टेप, वॉटरप्रूफ टेप,Bnc कनेक्टर्स
7) विज बिल (light Bill)
मी वीज बिल काढायला शिकलो. विज बिल काढणे खूप सोपे आहे.
विज बिल MSEDCL( Maharashtra state Electricity Distribution Company Ltd)
या मान्यता कडून येते. विज बिल वरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. जर चुकीचे प्रकारे विज बिल
आले तरी आपण एम एस ई बी वाल्यांना सांगू शकतो.
मीटर चे प्रकार
1)सिंगल फेज मीटर
2)थ्री फेज मीटर
एकक – विज =युनिट
1000 वोल्ट कोणतेही एक उपकरण तास चालवल्यास एक युनिट वीज खर्च होते.
1000W=1KW
1000KW=1MW
युनिट =वॉट × नग × तास
1000
आमच्या घरचे विज बिल काढलेले.
8)बोर्ड भरणे
बोर्ड भरणे. आवश्यक सामग्रीः स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ.
.१) स्विच : इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतातः एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते. श्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते. २) वायर : वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो 1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे. 2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते. 3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते. 4. ब्लू वायर या वायर आपण देखील इन्व्हर्टर कनेक्ट होत आहात तर तर वायरिंग, नंतर आपण इन्व्हर्टर हा रंग वायर निवडू शकता (३) सॉकेट : हा पाच पिनचा असतो, ज्यामध्ये आम्ही आमचा मोबाईल चार्ज करतो आणि तो साधारण 6 amps असतो पण जर तुम्ही एखादे उपकरण जास्त लोडसह चालवत असाल तर, स्वीच प्रमाणे, 16 amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे. ४) इंडिकेटरइंडिकेटर चा वापर बोर्डात इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे का ते कळते.
costing
product | Rate | price(₹) |
switch button | 15×2 | 30 |
6 model board | 40×1 | 40 |
Plug(3pin) 6A | 20×2 | 40 |
wire(1mm) | 1meter | 18 |
9)CCTV reparing
सीसीटीव्ही कॅमेरेच्या रिपेरिंग त्याचे मी BNC connector बसवले. पूर्ण सीसीटीव्ही चेक केला
व सर्व दुरुस्ती केले. Fab lab मधला डीव्हीआर पण बसवला आणि एक सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन पण केला.
त्यात वापरलेले साहित्य : स्टेपर, इन्सुलेशन टेप, वॉटरप्रूफ टेप,Bnc कनेक्टर्स
10) कृत्रिम श्वसन
उद्देश- कृत्रिम श्वसन मध्ये शेफिएअर आणि सिलव्हिस्टर या दोन पद्धतीचे कार्य कसे करायचे.
साहित्य -चटई, दोन स्वयंसेवक, मार्गदर्शक
उपयोग- जेव्हा एखाद्या व्यक्तीला करंट लागतो त्या वेळेस या दोन पद्धतीचा वापर केला जातो.
१) सेफीएअर पद्धत जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मागे करंट लागलेला असतो.
अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.
२) सिलव्हिस्टर पद्धत – जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या बाजूने करंट लागलेला असतो.
अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.