विद्यार्थीचे नाव : दिपिका दिलीप चिपात

मार्गदर्शिका : रेशमा म्याडम

दिनांक : 12/8/2022

उद्देश : मोरिंगा चिक्की बनवायला शिकणे . चिक्किचे उपयोग समजून घेणे . सह्याद्री स्कूलची ऑर्डर म्हणून बनवली .

साहित्य : शेंगदाणा ,जवस ,तिळ ,मोरिंगा पावडर ,तूप ,गुळ .

साधने : चिक्की ट्रे ,चिक्की कटर ,चिक्की रोल , गॅस ,कढई ,उलथणा , इत्यादि .

कृती : 1. प्रथम शेंगदाणे ,तिळ ,जवस भाजून घेतले .

2. त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतले .

3. 2.5 kg गुळ बारीक करून घेतला . तसेच 1.20 kg शेंगदाणे ,640 gm जवस , 720 gm तिळ , 120 gm मोरिंगा पावडर याचे मिश्रण तयार केले .

4. 280 गुळाचा पाक तयार केला . त्यात 25 gm तूप टाकले . त्यानंतर 300 gm मिश्रण टाकून मिक्स करून घेतले .

5. व ट्रेला तेल लावून त्यावर चिक्की लाटून घेतली .

6. आणि चिक्की कटर ने चौकोणी आकारात कट करून पॅक केली .

1) मोरिंगा पावडरचा उपयोग : मोरिंगा मध्ये अटी ऑक्सीइट्स व्हिटॅमिनसी आणि व्हिटॅमीन भरपूर असतात . या पोषण तत्वांमुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते . केस लांबसडक व घनदाट होतात . मोरिंगा पावडर पासून आपण फॅस फॅक तसेच केसांसाठी कंडिशनर बनवू शकतो . यामुळे केस व त्वचेला नैसर्गिक स्वरूपात मॉइथराईसचा पुरवठा होतो .

2) जवस चे उपयोग : जवसमध्ये लोह (iron ) प्रमाणात मुबलक असते . जे अनिमिया दूर करण्यास फायदेशिर ठरते . जवसामधील अटी ऑक्सी डेट्स बॉडीला डिटाक्स करतात . ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होते . रोज एक चमचा जवस पावडर खाल्याने मुळ नियंत्रित राहण्यास मदत होते .

3) शेंगदाण्याचे उपयोग : शेंगदाणे हे प्रोटिन , फॅट आणि अनेक पोषण तत्व भरपूर असतात . शेंगदाण्यांध्ये बायोटीन नायसीन ,फॉली असिड , कोपर ,मॅगनिज , फॉस्फरस , मॅगनेशियम यासारखी अनेक उपयुक्त असून त्यामुळे हदयविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते .

4) तुपाचे उपयोग : तूप खाल्याने पचनक्रिया सुधारते ,वजन वाढते . व दुर्बलता कमी होते . डोळ्याचे व त्वचेचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत राहतात .

5) गुळाचा उपयोग : गुळामध्ये लोह , फॉस्फेट सारखे पोषण तत्व असतात . दररोज गुळाचे सेवन केले तर शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते . गुळ हा शरीरासाठी खूप फायदेशिर ठरतो .

मोरिंगा चिक्की (कॉस्टिंग ) 5 kg

अ . क्र . मटेरियल वजन दर / kg किंमत
1)शेंगदाणा 1.20 kg 120 RS 144.00
2)जवस 640 gm 80 RS51.20
3)तिळ 720 gm 100 RS72.00
4)मोरिंगा पावडर 120 gm 500 RS 60.00
5)गुळ 2.5 kg40 RS100.00
6)तूप 480 gm710 RS340.80
7)गॅस 180 gm1050 RS13.30
8)पॅकिंग बॉक्स 12 बॉक्स 4.5/154.00
9)पॅकिंग बॉक्स 1बॉक्स 25RS/ 125.00
10)स्टीकर 1नग 50 पैसे / 1 नग O.50

TOTAL= 860.00

11) इलेक्ट्रिक चार्ज 1/2 यूनिट 7 RS / यूनिट = 3.50

863.50

302.22

एकूण खर्च =1165.72

5 kg मोरिंगा चिक्की =1165.72 RS

1 kg मोरिंगा चिक्की =233.14 RS

अनुभव : तूप कमी टाकल की चिक्की चांगली बनत नाही . पाक जास्त वेळ केला की चिक्की कडक होते . मोरिंगा पावडर जास्त झाल्याने चिक्की कडू होते . चिक्की लाटताना पटकन लाटता आली पाहिजे . नाहीतर मिश्रण कडक झाल की लाटता येत नाही .