साहित्य :-
1] बाजरी पीठ = २०० ग्रॅम
2] तीळ = १८० ग्रॅम
3] जवस = १२० ग्रॅम
4] मगज बी = १२० ग्रॅम
5] इलाईची पावडर = १० ग्रॅम
6] तूप = ८५ ग्रॅम
7] गूळ = ६०० ग्रॅम
कृती :-
कृति =(1)मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.(2) तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.(3)भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.(4)लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या.(5)वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.(6) लाडू बांधून घ्या