छत्री

प्रस्तावना :

या प्रकल्पात आम्ही प्रकल्पात आम्ही . छत्री तयार करण्याबाबतचा उद्देश म्हणजे . पाहुण्यांसाठी बसायची आणि सावलीची सोय करणे . कॅमस मध्ये योग्य जागा पाहून छत्री बसवायची जागा ठरली .

या कामात आम्ही वेल्डिंग , कटिंग , पॉलिशिंग आणि पावडर कोटिंग या सारखी तांत्रिक कौशल्य शिकलो . छत्री बनवताना सौंदर्य आणि उपयोग या दोन्ही गोष्टींचा विचार केला . भविष्याची ही छत्री पाहुण्यांसाठी विश्रामाची जागा म्हणून वापरली जाईल .

सर्वे:

आम्ही कॅम्पस मध्ये निरीक्षण केले आणि छत्री कुठे लावायची त्याची जागा नेमली. सॉलिड वर्क वर छत्रीचे डिझाईन तयार करणे. छत्रीसाठी योग्य सामान्य निवडणे.

उद्देश :

छत्री तयार करण्याचे कारण हे होते जे पाहुणे येथील त्यांच्यासाठी बसायची जागा व विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी शिकणे .

CPM Carta :

कामवेळ
थ्रीडी डिझाईन केले8 तास
साहित्य आणले3 तास
मेजरमेंट घेतले8 तास
पार्ट कटिंग अँड वेल्डिंग8 तास
पार्ट पॉलिशिंग अँड ग्राइंडिंग6 तास
पावडर कोटिंग8 तास
छत्री बसवणे3 तास
प्लाजमा कटिंग2 तास
एकूण6 दिवस

साहित्य :

25×25[] = 60′ ,40×40[] = 12′ , 100×100 [] = 13′

25×5 = 6′ , 40×5 = 5′ ,

6×6 = प्लेट (2) , फ्लॅन्स = 2. , रोल = 4

30/10 नट बोल्ट = 2kg. , वायसर = 500 g

ब्रश =2. , रोलर पॉलिश पेपर = 2 , रेड ऑक्साईड = 1L

पावडर कोटिंग =

ब्लॅक ऑइल पेंट = 1L , थिनर = 0.5L

सि सिमेंट = 1 गोणी , क्रश = 70 घमेली , खडी = 15 घमेली

कृती :

सर्वात अगोदर आम्ही छत्री चे 3d डिझाईन बनवलेत्यासाठी आम्ही सॉलिड वर्क हे ॲप्लीकेशन युज केले . सॉलिड वर्क वर आम्ही छत्री असेंबल होते आहे का नाही हे आम्ही बघितलेत्यानंतरन आम्ही छत्री बनवायला सुरुवात केली . सर्वात अगोदर 25 x 25 [] चे 1800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली एका बाजुला नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतला कानापासून 880 mm या अंतरावर कॉलम ट्यूबच्या अलीकडे व पलीकडे अशा दोन बाजूस कान लावले. आंतर चुकू नये म्हणून जॉब तयार केला.असे आम्ही सात पार्ट तयार केले . त्यानंतर आम्ही 25 x 25 [] चे 800 mm चे सात तुकडे कापून घेतले व त्याचे दोन्ही बाजूस पट्टीचे तुकडे लावून तोंडे बंद करून घेतली दोन्ही बाजूला ब नट बोल्ट लावण्यासाठी कान लावून घेतले . त्यानंतर आम्ही प्लाजमा कटर वर फ्लान्स तयार केला . व त्याला कान लावून घेतले.छत्रीचे सगळे पार्ट एकामेकाला नटबॉलच्या साह्याने जॉईन करून घेतले . त्यानंतरून छत्रीच्या सर्व पार्टला पावडर कोटिंग केली .100 x 100 [] चा 5000 mm तुकडा कापून घेतला. व त्याला काळा ऑइल पेंट लावला .ज्या ठिकाणी छत्री लावायची होती त्या ठिकाणे 3 फुट खोल खट्टा घेतला . त्या खड्ड्यात खांब उभा केला . त्या खंड्यात सिमेंटचे मिश्रण टाकून खांब फिट केला , व खांबाच्या शेजारील जमिनीला लागून कोबा केला. छत्री उघडण्यासाठी व बंद करण्यासाठीरोलरच्या सह्याने जॉब तयार केला , व त्याला पावडर कोटिंग करून घेतले. छत्रीचे सगळे पाठ एकामेकांना कनेक्ट करून छत्री उभा केले . ही छत्री तयार करताना आम्हाला 9275 एवढा खर्च आला .

कॉस्टिंग

क्र.मालाचे नावएकूण मालादरएकूण किंमत
11*1 ट्यूब60 F352100
240*5 पट्टी5 F30150
340*40 ट्यूब12 F45540
4100*100 ट्यूब13 F1501950
525*5 पटी6 F25150
64*4 प्लेट2150300
76*6 प्लेट2250500
830/10 नटबोल्ट2 Kg100200
9वाईअर500 G5050
10ब्रश250100
11फ्लॅन्स2150300
12रोलर250100
13गॉलीज पेपर51575
14रेडऑक्साईड1 L230230
15ऑइल पेंट ब्लॅक1 L300300
16सिमेंट1 गोणी350350
17ब्रश70 चमेली8480
18खडी15 चमेली9150
19रोल4100400
20थिनर0.5 L10050
21पावडर कोटिंग800
22मजुरी2318
Total11593

निरीक्षण :

छत्री तयार करताना छत्रीचे कार्य कसे चालते , व त्याची आतील रचना कशी असतेहे कळाले . छत्री सगळे पार्ट एकसारखे कड झाले पाहिजे , नाही तर छत्री नीट काम करणार नाही . छत्रीचे मटेरियल कसे असले पाहिजे . हेवी पाहिजे की लाईट मटेरियल पाहिजे . ज्या ठिकाणी छत्री लावणार आहे ती जागा छत्रीसाठी उपयुक्त आहे का नाही .

निष्कर्ष :

छत्री लावल्यापासून लोकांचे उन्हा व पावसापासूनसंरक्षण होते . आश्रमातील लोक एकत्रित जमा होतात येतात , गप्पा मारतात . छत्री लावल्यापासून छत्रीच्या बाजून स्वच्छता अपवाप होऊ लागली . छत्री लावल्यापासूनती मोकळी जागा वापरत आली .

भविष्यातील उपयोग :

या फोल्डेबल छत्री मुळेभविष्यात उन्हाचाव पावसाचा त्रास होणार नाही . लोकांना निवांत बसण्यासाठी एक जागा तयार झाली .

डोम रिनोवेशन

प्रस्तावना :

आम्ही डोममध्ये सर्व नवीन काहीतरी करण्याचा ठरवलेला प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनमधून आश्रमातील विविध कार्य व क्रियाकलाप लोकांसमोर दिसून यावेत, असा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण साध्या पद्धतीने न करता, वारली चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विचार आहे, ज्यामुळे पारंपरिक कलात्मकता टिकून राहील आणि आधुनिकतेसह एक आगळावेगळा संगम साधता येईल.

सर्वे :

ड्रोममध्ये काय व कुसे करायचे यासाठी प्रथम 3D डिझाईन तयार केले. त्यानंतर लागणारे साहित्य निश्चित करून रावात जाऊन आपाले. जागेची पाहणी व मोजमाप करून सर्वे केला.

उद्देश :

डोम रिनोवेशन करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता की आश्रमातील मुलांसाठी एक चहा पिण्याची जागा तसेच आरामात बसण्यासाठी योग्य ठिकाण तयार करणे. या जागेमुळे मुलांना एकत्र येऊन गप्पा मारता येतील, विश्रांती घेता येईल आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी एक अनुकूल वातावरण मिळेल.

CPM Carta :

कामवेळ
साफसफाई2 तास
मापन2 तास
साहित्य आणणे2 तास
भिंत बांधणी5 तास
पुट्टी भरणे3 तास
डोमला कलर लावणे16तास
झाडाची कटिंग2तास
लोखंडी पाईप घासणे1 तास
लोखंडी पाईपला ऑइल पेंट लावणे8 तास
एकूण6 दिवस

साहित्य :

स्क्रॅपर

पुट्टी

ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]

डिस्टेंपर

सिमेंट कलर

काळा ऑइल पेंट

सिमेंट , कच

पॉलिश पेपर (सॉफ्ट व हार्ड)

कृती :

सर्वात अगोदर डोमचा सर्वे केला . डोम मध्ये आपण रेनोवेशन कसे करू शकतो याची चर्चा केली त्यानंतर स्केचप वर थ्रीडी डिझाईन तयार केली .कामाला सुरुवात केली. सर्वात अगोदर डोमची स्वच्छता केली.स्क्रॅपच्या साह्याने जुना कलर काढला. व डोमच्या चिरा मध्ये पुट्टी भरली . डोमला आतून प्रायमर लावला व डोमच्यावरच्या साईडला सिमेंट( नारंगी ) कलर लावला .डोमच्या बाहेर बसण्यासाठी एक छोटीशी भिंत बांधली व त्याला प्लॅस्टर करून घेतले. त्याला पण सिमेंट ( नारंगी ) कलर लावला . डोमच्या आतील बाजूला लेमन येलो हा फ्रेश कलर लावला. डोमच्या आतील छत्रीसारखे स्ट्रक्चरला ब्लॅकऑईल पेंट लावला. तुमच्या आतील वाजून वारली चित्राद्वारे आश्रमातील विद्यार्थ्यांची दिनचर्या दाखवण्याचा प्रयत्न केला.डोमच्या शेजारील परिसरात ची साफसफाई केली. झाडाची कटिंग केले.

कॉस्टिंग

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1.डिस्टेंपर10 L140 L1400
2.ट्रॅक्टर इमल्शन [प्रायमर]10 L70 L700
3.पॉलिश पेपर10 L15150
4.रेडीमेड बाईंड1 L230230
5.ब्लॅक ऑईल पेंट1 L300300
6.सिमेंट कलर15 Kg30450
7.टर्पेंटाईन1 L120120
8.पुट्टी5 Kg50250
9.पीव्हीसी पाइप (हिरवा)22 F1363000
10.सिमेंट50 गोणी350350
11.कच70 चमेली8480
12.ब्रश830240
13.रोलर250100
14.सिमेंट कलर (विटकरी)3 Kg3090
15.रूळ15 चमेली9150
16.मजुरी  2000
   Total10010

निरीक्षण :

बाहेरचा रंग कोणता वापरायचा आणि तो छान दिसेल का आतला रंग कसा द्यायचा, वारली चित्रकला करावी का घर कमी खर्चात टिकाऊ कसे करावे – हे सर्व विचार करून निरीक्षण केले.

निष्कर्ष :

बाहेरच्या रंगासाठी असे रंग निवडावेत जे आकर्षक दिसतात आणि हवामानापासून टिकतात.

आतच्या भिंतींवर हलका रंग वापरावा आणि वारली चित्रकला करून पारंपरिक सौंदर्य जोपासावे.

घर कमी खर्चात टिकाऊ बनवण्यासाठी साहित्याची योग्य निवड, मोजमाप, आणि योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

पाणी जाण्याची सोय आणि पन्हाळीसाठी प्लास्टिक पाईप यासारख्या सूक्ष्म बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे

भविष्यातील उपयोग :

डोम रिनोवेशनमुळे मुलांना विश्रांती, हा मारणे आणि एकत्र बसण्याची जागा मिळेल. तसेच या जागेचा उपयोग छोटे कार्यक्रम, अभ्यास किंवा क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजसाठी करता येईल.

टेनी हाऊस

प्रस्तावना :

आजच्या युगात जागेची कमतरता आणि वाढते घरांचे खर्च लक्षात घेता, Tiny House ही एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक संकल्पना आहे.
या प्रकल्पाचा उद्देश कमी जागेत, कमी खर्चात आणि टिकाऊ साहित्य वापरून एक आकर्षक, सुरक्षित आणि कार्यक्षम घर तयार करणे हा होता.
या प्रकल्पातून मी बांधकाम, रंगकाम, वायरिंग, आणि फिनिशिंग याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.

सर्वे :

सुरुवातीला आम्ही टेनी हाऊसचे विविध थ्रीडी डिझाईन आणि मॉडेल्सचा अभ्यास केला.Tiny House संकल्पना जगभरात कशी वापरली जाते, कोणते साहित्य टिकाऊ आणि स्वस्त ठरते हे पाहिले.विविध बांधकाम पद्धती, फ्रेम प्रकार, छताची रचना आणि वायरिंगची सुरक्षित पद्धत यांचा अभ्यास केला.जागेचे मोजमाप घेऊन पाया, भिंती आणि छताच्या प्रमाणात योग्य आखणी तयार केली.

उद्देश :

कमी खर्चात हलके वजनाचे एक आकर्षक असे टेनी हाऊस तयार करणे.

लहान जागेत सर्व मूलभूत सुविधा असलेले घर बांधण्याचा अनुभव मिळवणे.

बांधकाम, वायरींग, रंगकाम आणि फिनिशिंगची प्रत्यक्ष समज करून घेणे.

व्यावहारिक ज्ञान वाढवून प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष कामकाज शिकणे.

साहित्य :

बांधकाम साहित्य (BUILDING MATERIALS)

फ्रेमिंग – रुंदी 10 फूट × लांबी 10 फूट × उंची 8 फूट — 8 नग

फ्रेम पिलर – 8 फूट, 4 नग

खिडक्या (Windows) – 4’ × 3’ — 2 नग

मुख्य दरवाजा (Front Door) – 3’ × 7’ — 2 नग

छप्पर (Roofing) – मेटल शीट 3’ × 10’ — 4 नग

इन्सुलेशन (Insulation) – रॅपिकॉन सिमेंट 50mm × 8’ शीट — 20 नग

स्क्रू (Screws with Star Drive Head) – 70mm स्क्रू 500 नग (1 बॉक्स)

सिमेंट शीट (Cement Sheet) – 18mm, 4 नग

पाइप (Pipes) – 1½ इंच, 4 नग

बाथरूम (BATHROOM)

बाथटब: Lyons 3’; × 6’

कमोड टॉयलेट

कमी पाण्याचा शॉवर हेड (Low-flow Shower Head)

भिंतीवर बसवलेला वॉश बेसिन (Wall Mounted Wash Basin)

प्लास्टिकचा पडदा (Plastic Curtain)

भिंतींसाठी करगेटेड मेटल शीट (Corrugated Metal Roofing/Sheets)

एलईडी लाईट्स

हॉलसाठी एलईडी लाईट्स – 2 नग

भिंतीचे पॅनेल (Wall Panels)

छत पॅनेल (Roof Panel)

प्लंबिंग (PLUMBING)

pvc 4” पाईप – 4 नग

pvc 3” पाईप – 1 नग

pvc 2” पाईप – 1 नग

UPVC ½” पाईप – 1 नग

UPVC टी – 4 नग

pvc 4-वे सेक्शन – 1 नग

4” एल – 1 नग

बाथरूम आउटलेट – 1 नग

कमोड इनलेट कॉक ½” – 2 नग

बाराल पाईप – 4 नग

शॉवर ¼” कॉक – 1 नग

भिंत फ्रेमिंग (WALL FRAMING)

फ्रेम आकार (Frame Size): उंची – 8 फूट

लांबी – 10 फूट

रुंदी – 10 फूट

( वायरिंग ) Wiring

एमसीबी ६३ए २ पोल १ नग.

एमसीबी १६ए १ पोल २ नग.

एमसीबी बॉक्स १ नग.

आउटडोअर लॅम्प १ नग.

इंडोअर लॅम्प ३ नग.

स्विच बोर्ड ४ नग.

२ मिमी वायर ६० फूट.

१.५ मिमी वायर ६० फूट.

कृती :

सर्वात आधी मी टेनी हाऊसचे थ्रीडी डिझाईन तयार केले.
यानंतर ज्या ठिकाणी घर बांधायचे होते त्या ठिकाणी आखणी करून घेतली आणि त्या आखणीप्रमाणे पाया बांधला.

त्यानंतर मी टेनी हाऊसची फ्रेम असेंबल करून पाहिली.
फ्रेम तयार झाल्यावर तिला रेड ऑक्साईड (प्रायमर) लावला आणि त्यावर पांढरा ऑइल पेंट लावला.
रंगकाम झाल्यानंतर फ्रेम नट-बोल्टच्या सहाय्याने फिट केली.

फ्रेमच्या आत चारही बाजूंना पीव्हीसी पाईप बसवले.
फ्रेमच्या खालच्या बाजूस स्क्वेअर ट्यूब लावल्या आणि त्यावर सिमेंट शीट बसवली.
भिंतींसाठी मी रॅपिकॉन सिमेंट शीट (50mm x 8) वापरल्या.
ज्या ठिकाणी खिडकी आणि दरवाजा ठेवायचा होता, त्या ठिकाणी शीट मापानुसार कट केल्या.

यानंतर मी 3’x4’ आकाराच्या दोन खिडक्या आणि 3’x7’ आकाराच्या दरवाजाची फ्रेम तयार करून बसवली.
छतासाठी 3’x10’ चे पत्रे बसवले आणि सेल्फ-स्क्रूच्या मदतीने फिट केले.

टेनी हाऊसमध्ये टॉयलेटसाठी स्क्वेअर बार वापरून फ्रेम तयार केली आणि त्यावर सिमेंट प्लाय बसवला.

वायरिंगसाठी मी भिंतींवर आखणी करून घेतली, त्यानुसार खाचा मारून पाईप बसवले आणि त्यावर सिमेंट लावले.
गॅप भरून पुट्टी लावली, लेव्हल काढली आणि भिंतींना व्हाईट कलर लावला.

दरवाजाला सनमायका लावून तो फिट केला.
संपूर्ण घराची वायरिंग केली आणि पॉईंट्स बसवले.

टॉयलेटमध्ये खाली मार्बल फिट करून त्यावर कमोड बसवले.
भिंतींना फरशी लावली आणि 3’x7’ चा स्लायडिंग दरवाजा बसवला.

टेनी हाऊसला सिलिंग शीट बसवताना लाईट पॉईंटच्या ठिकाणी बल्ब बसवले.
यानंतर पाईपलाईन केली, बाथरूममध्ये बेसिन बसवले आणि पाण्याचे कनेक्शन जोडले.

बाहेरच्या बाजूला छोटी भिंत बांधून त्यात मुरूम भरला आणि भिंतीला प्लास्टर केले.
टेनी हाऊसच्या बाहेरील भागातील गॅप सिमेंटने भरले आणि त्यावर कलर लावला.
शेवटी खाली फ्लोअरवर कार्पेट चिकटवले.

कॉस्टिंग

निरीक्षण :

टेनी हाऊस बांधकाम करताना अचूक मोजमाप आणि आखणी महत्त्वाची असते.

फ्रेम आणि भिंतींची जोडणी करताना मजबूत फिटिंगसाठी नट-बोल्ट योग्य रीतीने बसवावे लागतात.

वायरिंग करताना आधी आखणी करून पाईप बसवणे सोयीचे ठरते.

प्रायमर आणि पेंट यामुळे लोखंडी भाग गंजत नाहीत आणि घर टिकाऊ बनते.

बाह्य रंग आणि सिमेंट फिनिशमुळे घराचे सौंदर्य वाढते आणि गॅप्स बंद होतात.

निष्कर्ष :

या प्रकल्पाद्वारे मी टेनी हाऊस कसे बांधायचे, त्यासाठी कोणती साधने आणि सामग्री लागते, तसेच रंगकाम, वायरिंग आणि फिनिशिंगची प्रक्रिया कशी करायची हे सर्व शिकलो.
हा अनुभव खूप उपयुक्त आणि शैक्षणिक होता

भविष्यातील उपयोय

या प्रकल्पातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात लघुउद्योग, फॅब लॅब किंवा बांधकाम क्षेत्रात करता येईल.

कमी जागेत स्वयंपूर्ण घराची कल्पना पुढे नेऊन प्रत्यक्ष वापरासाठी मॉडेल तयार करता येईल.

ग्रामीण किंवा आपत्तीग्रस्त भागात अशा प्रकारची तात्पुरती पण टिकाऊ घरे तयार करता येतील.

पर्यावरणपूरक आणि किफायतशीर घर बांधणीसाठी हा एक उपयुक्त अनुभव ठरू शकतो.

मी हे शिकलो :

डिझाईनपासून रंगकामापर्यंत टेनी हाऊस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजली.

अचूक मोजमाप, साधनांचा योग्य वापर आणि टीमवर्कचे महत्त्व कळले.

प्रकल्प करताना नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारी यांचे मूल्य शिकता आले.

छोट्या जागेत कार्यक्षम आणि आकर्षक घर कसे उभारता येते हे प्रत्यक्ष अनुभवले.

गेस्ट हाउसचे बांधकाम

प्रस्तावना :

गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.

र्वे :

बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.

जागेचे मोजमाप घेण्यात आले.

गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.

  या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.

उद्देश :

गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे

मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे

विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे

बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे

सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे

CPM

साहित्य :

ACC  

केमिकल 

थापी , घमेल

कळंबा स्पिरिट

लाईन दोरी

फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी

कृती :

सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.

कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.

कॉस्टिंग :

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
1ACC  1600801,28,000
2केमिकल 2350011,500
3मजुरी  [25%]34,875
total174,375

निरीक्षण :

मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.

भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.

कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.

ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.

प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.

 निष्कर्ष :

गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.

भविष्यातील उपयोग :

गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त

मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते

ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो

बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले

ग्रील तयार करणे

प्रस्तावना :

गेस्ट हाऊसच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूत बांधकामासाठी ग्रील बसवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पात आम्ही तीन वेगवेगळ्या मापांचे ग्रील मोजून, त्यांचे कॉस्टिंग करून, आवश्यक साहित्य खरेदी करून स्वतः ग्रील तयार केले. या प्रक्रियेत वेल्डिंग, ग्राइंडिंग, मोजमाप, फ्रेम तयार करणे, रेडॉक्साईड व पेंटिंग यासारखी कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची आणि वापरण्याची संधी मिळाली.

सर्वे:

सर्वात प्रथम गेस्ट हाऊसच्या खिडक्यांचे मोजमाप घेतले असता खालीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराच्या ग्रीलची आवश्यकता असल्याचे आढळले:

पहिली ग्रील: 6 ‘× 5’

दुसरी ग्रील: 4 ‘ × 7’

तिसरी ग्रील: 2′ × 20″

मोजमापांच्या आधारे कॉस्टिंग केले व त्याप्रमाणे साहित्य खरेदी करण्यात आले.

उद्देश:

गेस्ट हाऊससाठी आवश्यक त्या आकाराच्या मजबूत ग्रील तयार करणे* गेस्ट हाऊसला सुरक्षा प्रदान करणे* धातू काम, वेल्डिंग, ग्राइंडिंग आणि फ्रेम फॅब्रिकेशन या कौशल्यांचा विकास करणे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे ग्रील तयार करणे

साहित्य:

. 30×3 L-angle

2×2 स्क्वेअर जाळी

10×10 स्क्वेअर बार

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

Red oxide प्राइमर

काळा ऑइल पेंट

कृती:

सर्व खिडक्यांचे अचूक मोजमाप घेतले. तीन वेगवेगळ्या मापांच्या ग्रीलची कॉस्टिंग केली व साहित्य खरेदी केले.30×3 L-angleवापरून सर्व ग्रीलची फ्रेम तयार केली. ४×७ ग्रीलसाठी फ्रेममध्ये 2×2 जाळी बसवली. त्यावर 4 इंच अंतरावर आडवे 10×10 स्क्वेअर बार लावले.व चार उभे स्क्वेअर बार बसवले. सर्व बार व अँगलची वेल्डिंग करून मजबुती दिली.वेल्डिंगनंतर संपूर्ण ग्रीलला ग्राइंडिंग करून स्मूथ फिनिश दिली. भिंतीत बसवण्यासाठी 30×3 अँगलचे चार तुकडे जोडले. ग्रीलला प्रथम Red Oxide प्राइमर लावला. त्यानंतर काळा ऑइल पेंट लावून फिनिशिंग दिले.

आलेल्या अडचणी :

. तीन वेगवेगळ्या मापांमुळे प्रत्येक ग्रीलसाठी फ्रेम वेगळ्या प्रकारे मोजावी लागली.

स्क्वेअर बारचे अंतर अचूक ठेवणे वेळखाऊ ठरले.

वेल्डिंग केल्यानंतर जॉइंट्स स्मूथ करण्यासाठी जास्त ग्राइंडिंग करावी लागली.

मोठ्या ग्रीलला हलवणे व सरळ ठेवणे कठीण गेले.

कॉस्टिंग :

अ. क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
130X3 L angal210 kg7014,700
210X10 [] BAR424 kg6025,440
32X2 जाळी[168] 2f223,696
430 x 3 पट्टी27 kg701,890
5रॉड पुडा34001,200
6कटींग व्हिल2025500
7ग्रीडिंग व्हिल2030600
8पॉलिश व्हिल1030600
9कटींग व्हिल [14 in]2200400
10प्रायमर4 l240960
11थीनर2l120240
12ब्रश440160
13Electricity [10%]5,000
14मजुरी [15%]8,000
15TOTAL63,000

निरिक्षण :

सर्व ग्रील मजबूत व योग्य मापात तयार झाल्या. L-angle व स्क्वेअर बारच्या वापरामुळे ग्रीलची मजबुती खूप वाढली. पेंटिंगमुळे ग्रीलला आकर्षक मिळाले. संपूर्ण प्रक्रियेत मोजमाप अचूक ठेवणे सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवले.

निष्कर्ष :

प्रकल्पातून आम्हाला ग्रील फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फ्रेम तयार करणे, प्राइमिंग आणि पेंटिंग या सर्व कामांचे चांगले ज्ञान झाले. गेस्ट हाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्रील्स यशस्वीरीत्या तयार करण्यात आल्या आणि कमी खर्चात उच्च गुणवत्ता मिळवली.

भविष्यातील उपयोग :

पुढील काळात अशाच प्रकारचे ग्रील, दरवाजे, फेन्सिंग किंवा खिडकी संरचना तयार करता येतील. या कौशल्याचा वापर करून स्वतंत्र काम किंवा व्यवसाय सुरू करता येईल.

कॉट तयार करणे

प्रस्तावना :

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.

र्वे :

बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता

1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती

वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता

रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत

उद्देश:

या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.

साहित्य:

1” x 2” स्क्वेअर ट्यूब

1” x 1” स्क्वेअर ट्यूब

0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब

वेल्डिंग रॉड

ग्राइंडिंग डिस्क

पॉलिश व्हील

रेडऑक्साईड प्रायमर

काळा ऑइल पेंट

पॉलिश पेपर

लंबी

कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन

3DDesign :

कृती:

सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.

माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.

1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.

कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.

फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.

सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.

15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.

पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले

संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.

फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.

रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.

शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.

आलेल्या अडचणी :

1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे

वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली

ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला

रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली

पाय (Legs) व फ्रेम एकाच लेव्हलवर आणणे आव्हानात्मक होते

कॉस्टिंग :

अ . क्रमालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
10.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब20′25500
21 x 2 स्क्वेअर ट्यूब360′3010,800
31 x 1स्क्वेअर ट्यूब100′353,500
41/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब100′404,000
5रॉड पुडा2400800
6कटींग व्हिल525125
7ग्रीडिंग व्हिल530150
8पॉलिश व्हिल330150
9कटींग व्हिल [14 in]1200200
10लंबी2 kg5001000
11प्रायमर2 L240480
12थीनर2 L120240
13काळा ऑईल पेंट2 L340680
14रोलर15050
15Electricity [10%]2,270
16मजुरी [15%]3,400
17total28,350

निरिक्षण :

वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.

सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.

रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.

काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.

निष्कर्ष :

या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.

भविष्यातील उपयोग :

घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट

कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य

विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान