1.विद्युत सर्किटचे मूलभूत ज्ञान मिळवणे.

2.विद्युत घटकांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करणे.

3.सुरक्षितता नियमांचे पालन करणे.

विद्युत घटक: बॅटरी,बल्ब,स्विच,प्रतिरोधक (रेसिस्टर) ,कंडक्टर (तार)

साहित्य:PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड),बॅटरी ,कनेक्टर, स्क्रू, ड्रायव्हर, मल्टीमीटर

सुरक्षा साधने:इन्सुलेटेड हॅन्ड ग्लोज, सुरक्षात्मक चष्मे

1. पहिल्यांदा आम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड घेतला.

2. नंतर बोर्डच्या मापाचे सर्किट डायग्राम काढली.

3. त्याच्या मधील थ्री पिन सॉकेट बसवण्यासाठी कटरने त्याच्या मापाचे कट मारले.

4. थ्री पिन सॉकेट बसवले आणि नंतर स्विच बसवले.

5. दोन्ही सॉकेट ने स्क्रू ड्रायव्हरने चांगले टाईट केले.

6. पहिल्यांदा फेज वायरिंग केली व नंतर अर्थिंग ची केली. आणि नंतर न्यूट्रल ची वायरिंग केली.

7. वायरिंग झाल्यावर काही वायरिंग लूज आहेत का नाही ते बघितले व नंतर बोर्ड सरांना दाखवून फिट केला.

8. टेस्ट लॅम्प घेऊन बोर्ड चेक केले. त्यामध्ये न्यूट्रल फेज व अर्थिंग फेज असे पण चेक केले त्यामुळे आम्हाला कळले की अर्थिंग पण बरोबर असली तर लाईट चांगली चालते.

प्रयोगाद्वारे सर्किटच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि कोणते नाहीत याचे विश्लेषण करणे.

कोणते घटक कार्यरत आहेत आणि सुधारणा आवश्यक आहेत का हे तपासणे.