१. माती परीक्षण

. आज मी तुम्हाला माती परीक्षणाबद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आपण माती परीक्षण म्हणजे काय व ते कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

. माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचे विश्लेषण करणे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीची सुपीकता किंवा आरोग्य तपासता येते आणि पिकांसाठी खतांची मात्रा ठरवता येते.

. माती परीक्षण करण्यासाठी सर्वप्रथम ज्या क्षेत्रातील माती परीक्षण करायचे आहे त्या शेतातून माती आणाली. व त्या मातीचे सॉइल टेस्टिंग किट च्या मदतीने नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियमचे प्रमाण बघायचे. जर यातील कशाचे पण प्रमाण कमी असले तर ते वाढवण्यासाठी त्या घटकाची फवारणी करायची. माती परीक्षण हे पिक लावण्याच्या 45 दिवसाआधी करावे लागते व एकदा फवारणी झाली की तीन महिन्यांनीच माती परीक्षण आपण करू शकतो. नाहीतर आपल्याला चुकीचे निष्कर्ष भेटू शकतात.

२.बीज प्रक्रिया

. आज मी तुम्हाला बीज प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहे ज्यामध्ये आपण बीज प्रक्रिया कशी करतात हे बघणार आहोत व मी माझा अनुभव आपल्याला सांगणार आहे.

. बीज प्रक्रिया म्हणजे बीजोपचार किंवा बियाण्यांची योग्य प्रकारे प्रक्रिया करणे. यामध्ये पेरणीपूर्ती बियाण्यांवर केलेल्या विविध उपचारांचा समावेश होतो. ही प्रक्रिया बियाण्यांमध्ये रोगजंतूंचा नाश करून त्यांना उगवण्यासाठी सशक्त बनवते. बियाण्यांना विशिष्ट रासायनांनी,जैविक घटकांनी आणि उकळलेल्या पाण्याने प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्यांचे उगवण क्षमतेचे प्रमाण वाढते आणि पीक चांगले येते.

. रासायनिक बीज प्रक्रिया :-

. रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी येड्यांवर रासायनिक पदार्थांनी. या प्रक्रियेत बियाण्यांवर विशिष्ट रसायनांचे लेप दिले जाते, जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल आणि त्यांची उगवण क्षमता वाढेल. रासायनिक बीज प्रक्रियेमुळे बियाणांचे बुरशी, बॅक्टेरिया आणि किडींपासून संरक्षण होते. उदाहरणार्थ = कार्बो-डायझीम, थायराम किंवा मॅन्कोझेब यांसारखी रसायने बियाण्यांना लागणारे रोगजंतू नष्ट करून त्यांचे संरक्षण करतात. ज्यामुळे उगवलेले पिक अधिक सशक्त होते.

. आम्ही केलेली बीज प्रक्रिया पुढील प्रमाणे :-

पहिल्यांदा छोटा बटाट्यांना उन्हात पसरवून ठेवले. व दुसरीकडे एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचे कार्बो-डायझिंग टाकले. मग या तयार झालेल्या रसायनाला बटाट्यांवर फवारले. मग बटाट्यांना उलटे करून त्यांच्या मागच्या बाजूवरही हे रसायन फवारले. या रसायनामुळे बटाट्यांना बुरशी लागणार नाही किंवा त्यांच्यावर कीड लागणार नाही. व त्यांना वाढीसाठी मदत करेल.

३. दूध काढायच्या पद्धती

आज मी तुम्हाला प्राण्यांचे दूध कसे काढायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. यामध्ये आपण दूध काढण्याच्या पद्धती व त्यांचे फायदे व तोटे बघणार आहोत.

. जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढणे व योग्य प्रकारे हाताळणे गरजेचे आहे.

. 1] हाताने दूध काढणे :-

i) मूठ पद्धत :- या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने गायीचे दूध काढण्यासाठी केला जातो.

ii) चिमटा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.

iii) अंगठा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.

. फायदे :- कासे तील दूध पूर्णपणे काढले जाते, सडाला इजा होत नाही.

. तोटे :- वेळ जास्त जातो, लेबर चार्ज जास्त जातो, जास्त जनावर असतील तर ही पद्धत वापरता येत नाही.

४. TDN पद्धतीने प्राण्यांचे खाद्य काढणे.

आज मी तुम्हाला TDN पद्धतीने खाद्य कसे काढायचे ते सांगणार आहे.

TDN म्हणजे एकूण पचनीय घटक (Total Digestive Nutrients). TDN पद्धतीने आपण कोणत्याही प्राण्याचे एका दिवसाचे खाद्य काढू शकतो. उदा.) शेली, मेंढी, गाय, कोंबडी इ.

TDN पद्धतीचे सूत्र =

वरील सूत्राप्रमाणे आपल्याला ज्या प्राण्याचे खाद्य काढायचे आहे त्या प्राण्याचे वजन माहित असायला पाहिजे. सुत्राप्रमाणे वजनाचे ३% कढायचे जे काही उत्तर येईल ते त्या प्राण्याचे एका वेळेचे खाद्य असणार आहे. त्या ३% खाद्याचे २ भाग करायचे २५% खुराक व ७४% चारा. आता या चार्याचे परत दोन भाग करायचे २५% सुका चारा व ७५% ओळ चारा. या सर्व कृती करून झाल्यात की तुमच्या प्राण्याचे एका दिवसाचे पौष्टिक खाद्य मिळेल.

मी काढलेले आमच्या एका कालवडीचे खाद्य पुढील प्रमाणे =

५. ऊती संवर्धन

. आज मी तुम्हाला कृती संवर्धनाबद्दल माहिती देणार आहे. यामध्ये ऊती संवर्धन म्हणजे काय ते कसे करतात व त्याचे फायदे काय याबद्दल आपण माहिती देणार आहोत.

. ऊती संवर्धन म्हणजे एखाद्या झाडाची एक ऊती काढून तिची प्रयोग शाळेत रोप बनवणे.

. आता ऊती संवर्धन कसे करतात ते आपण जाणून घेऊ. सर्वात पहिल्यांदा ज्या झाडाचे रोप बनवायचे आहे त्या झाडाची एक ऊती काढून घ्यायची. तिला एका बंद डब्यामध्ये काही रसायने ठेवून लागणारे तापमानात काही दिवसांसाठी तसेच ठेवायचे. हळूहळू त्याला मुळे यायला सुरुवात होईल. त्यानंतर त्याला प्लास्टिक चे काही ट्रे भेटतात त्यात लावायचे. नंतर त्याचे रोप तयार होईल, ते झाल्यावर त्या रोपाला आपल्या शेतात किंवा तुमच्या बागेत लावू शकतात.

. ऊती संवर्धनाचे खूप फायदे आहेत पण त्याच्यातला एक सर्वात भरी असा फायदा म्हणजे समजा तुमच्याकडे एक पेरूचे झाड असेल जे खूप चविष्ट व मोठे पेरू देते. आणि तुम्हाला त्याची अजून रोपं पाहिजेत तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात. पण तुम्ही म्हणाल की आपण फलाच्या मदतीने पण रोप बनवू शकतो तर हीच पद्धत का तर याचे उत्तर म्हणजे जर तुम्ही फळांच्या मदतीने झाड लावले तर ते तसेच मोठे किंवा चविष्ट पेरू देईल याची संभाव्यता खूप कमी असते. पण जर तुम्ही ऊती संवर्धनाची पद्धत वापरली तर तुम्हाला तसेच पेरू भेटतील. त्यामुळे ही पद्धत आपल्याला खूप उपयोगी आहे.

६. फवारणी

आज मी तुम्हाला फवारणी बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आपण फवारणीचे प्रकार, फवारणी करताना लागणारी सुरक्षा व त्याचे फायदे यांच्या बद्दल महिती सांगणार आहे.

खाऱ्यामध्ये फवारणीचे प्रकार नसतात तर त्याच्यात वापरल्या जाणाऱ्या स्प्रेच्या नोझलचे प्रकार असतात. ज्याच्या मदतीने आपण फवारणी करतो.

. आता आपण फवारणी करताना कोणकोणत्या सुरक्षा बळगव्यात याबद्दल माहिती बघणार आहोत. फवारणी करताना फवारणीसाठी चे वेगळे कपडे हे आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या कपड्यांपासून लांब ठेवायचे. नेहमी फवारणी करून झाल्यावर टॅंक हा स्वच्छ साफ करावा. वादी करत असताना काळजी घ्यावी की फवारणी करणाऱ्या माणसाला कोणतीही इजा नसली पाहिजेल व त्याने आपले नाक तोंड व डोळे हे चांगले झाकून ठेवले पाहिजे. आणि शेवटचं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी केल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवावे किंवा स्वच्छ आंघोळ करावी. कारण आपण जे औषध फवारतो ते आपल्या चुकून हातात द्वारे पोटात गेले किंवा जखमेद्वारे शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात जे जीवघेणे पण ठरू शकतात त्यामुळे वरील काळजी ही बारावी.

७. मुरघास तयार करणे

आज मी तुम्हाला मुरघास घरी कसे बनवायचे ते सांगणार आहे.

मुरघास हा प्राण्यांसाठी खूप चांगला, पौष्टिक असतो जो घरी बनवायला खूप सोपा आहे. त्यासाठी ज्वारी, हत्ती गवत किंवा मका घ्यायचा त्याचे यंत्राच्या सहाय्याने २ ते ३cm चे तूकड करायचे. नंतर एक प्लास्टिक चे पोते घ्यायचे त्यात पहिला ठार हा चाऱ्याचा थर लावायचा नंतर त्यावर गुळ व मिठाचा थर लावायचा मग परत चाऱ्याचा व त्यावर परत गुळ व मिठाचा थर लावायला. सगळे थर लावून झाल्यावर प्लस्तिक्चे पोते हवाबंद असे बांधायचे. ज्याने ते आधी पेक्षा जास्त काळ टिकून राहील.

आम्ही बनवलेले मुरघास :-

८. तण नियंत्रण

शेतात आपल्या उत्त्पन्ना बरोबरच तण पण येतात जे आपल्याला उपयोगाचे नसतात.

तणांची वैशिष्ट्ये :-

१) आपल्या पिकांच्या तुलनेत लवकर येतात .

२) कमी पाण्यात पण जास्त प्रमाणात वाढतात व पसरतात.

३) लवकर उंच उगतात ज्यामुळे आपल्या पिकांपर्यंत सूर्यप्रकाश पोहचत नाही.

होणारे नुकसान :-

१) तण कापण्यात खूप वेळ व मजूर वापरल्यास खूप पैसे जातात.

२) पिकांना खताची कमतरता भासते.

३) पिकांची वाढ चांगली होत नाही.

गवतांचे प्रकार :-

१) सुरसुरी ६) दुधी

२) पंबोड्या ७) काडमोड

३) गाजर गवत ८ ) दाळभाजी

४) चेच ९) शेवरा

५) कर्मोडी १०) जुट

९) दुधातील भेसळ

आज मी तुम्हाला दुधातील होणाऱ्या भेसळ बद्दल माहिती देणार आहे.

कमी दुधातून जास्त नफा होण्याकरिता भेसळ केली जाते. यामध्ये पाणी व वेगवेगळे रसायने वापरली जातात.

. 1) पाणी = दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी दुधात पाण्याची भेसळ केली जाते. भेसळयुक्त दूध तपासण्यासाठी एक काच घ्यायची त्यावर दुधाचा एक थेंब सोडायचा. तो थेंब खाली आला की त्याने केलेले रेषेचे निरीक्षण करायचे. जर ती रेष पांढरी असेल तर दुधात भेसळ नाही आहे असे समजायचे पण जर पांढरे नसेल तर त्यात पाणी टाकलेले आहे.

. 2) मेलमाईन = जेव्हा आपण दुधात पाणी मिसळतो तेव्हा त्यातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते ते वाढवण्यासाठी त्यात मेलमाईन टाकले जाते.

. 3) फॉरमिलिन = दुधाचे जीवन काळ वाढवण्यासाठी फॉरमिलिन मिसळतात.

. 4) कोनफ्लोवर = हा पदार्थ लस्सील घट्ट बनवण्यासाठी वापरतात.

. 5) क्रोस्ट्रिक सोडा = हा पदार्थ जास्त करून डिटर्जंट, हार्पिक या गोष्टींसाठी वापरतात. पण दूध पांढरे व त्यात थोडा फेस येण्यासाठी दुधात मिसळतात.

6) युरिया = दुधातील fat वाढवण्यासाठी मिसळतात.

१०) प्राण्यांची ओळख

. आज मी तुम्हाला ‘ प्राण्यांची ओळख ’ या विषयाबद्दल माहिती देणार आहे.

. आपल्याकडे जेव्हा जेव्हा 5 ते 6 जनावरे असतात तेव्हा आपण त्यांना नावे देतो. जाने त्यांना ओळखणे सोपे पडते. पण जेव्हा 10 पेक्षा जास्त प्राणी असतात तेव्हा तेवढी नावे लक्षात ठेवणे थोडे अवघड असते व कधी कधी गोंधळही होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ओळखण्याच्या काही पद्धती असतात.

. 1) बिल्ला पद्धत = यामध्ये आपण एका बिल्ल्यवर कोणताही अंक लिहितो आणि त्या बिल्याला त्यांच्या कानावर लावतो.

. 2) ट्याटू पद्धत = यामध्ये त्या प्राण्याच्या अंगावर रंगाक्या मदतीने त्या प्राण्याच्या नावाचे इंग्रजीतील पहिल्या अक्षर गिरवतो.

. 3) छाप पद्धत = यामध्ये लोखंड गरम करून त्याचा चहा बनवतात त्या गरम छापाला प्राण्याला लावले जाते.

११) प्राण्यांचे अंदाजे वय काढणे

आज मी तुम्हाला प्राण्यांचे अंदाजे वय कसे ओळखायचे याबद्दल माहिती देणार आहे.

. आपण गायचे उदाहरण घेऊया. एका गायला एकूण आठ दात असतात. ते पण खाली असतात. गायला जन्मतः दात असतात पण ते दुधाचे असतात. त्यांच्या पहिल्या कायमच्या दातांची जोडी ही 15 ते 18 महिन्यात येते. दुसऱ्या कायमच्या दातांची जोडी ही 20 ते 24 महिन्यात येते. तिसऱ्या कायमच्या दातांची जोडी 24 ते 30 महिन्यात येते. आणि शेवटची कायमच्या दातांची जोडी ही 30 ते 35 महिन्यात येते.

हे तर झालं पण नंतर आपल्याला कळालं पण आता प्रश्न असा पडतो की त्यांचे दुधाचे दात व खरे दात कसे ओळखायचे. तर जेव्हा आपण गाईचे पुढचे दोन दात बघतो, त्यांच्यामध्ये जर जागा असेल तर ते दुधाचे असतात पण जर पुढच्या दोन दातांमध्ये जागा नसेल तर ते दुधाचे नसतं. बाजूचे दात ओळखण्यासाठी त्यांना हात लावून बघायचे जर ते धारदार असतील तर याचा अर्थ ते दुधाचे असतात पण जर ते जास्त धारदार नसते तर ते कायमचे दात असतात. अशाप्रकारे तुम्ही गाईंचे दात तपासून त्यांचे एक अंदाजे वय सांगू शकता.

१२) कीटकांचे जीवन चक्र

. तो अळी आज मी तुम्हाला कीटकांच्या जीवन चक्र बद्दल थोडी माहिती देणार आहे व आपल्या रोपांवर लागणाऱ्या कीटकांबद्दल पण थोडी माहिती देणार आहे व त्यांचे प्रकार सांगणार आहे.

मच्छर= याचे चक्र म्हणजे पहिल्यांदा मच्छर हा अंड्यात न बाहेर निघतो त्यानंतर जेव्हा तो अंड्यातून बाहेर निघतो तेव्हा तो आणि अळी रूपामध्ये असतो. त्यानंतर तो स्वतःभोवती फुलपाखरासारखे कोश बांधतो आणि नंतर त्याच्या आधीच्या रूपामध्ये परत येतो आणि हे चक्र तसेच चालू राहते.

1) बुरशीजन्य रोग :- Anthracnose, fusarium, powdery mildew, Botry rot, Dowhy mildew, Rust

2) जिवाळूजन्य रोग :- Bacterial leaf spot, Bacterial blight

3) विषाणूजन्य रोग :- Tomato spotted mosaic virus, Tobacco mosaic virus

4) सूत्रकृमी :- या जमिनीखाली राहतात, या मुलांवर हल्ला करतात.

१३) प्रकाश संश्लेषण

. आज मी तुम्हाला प्रकाश संश्लेषणाबद्दल माहिती देणार आहे.

ही एक झाडांमध्ये होणारे सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. यामध्ये झाड सूर्याच्या प्रकाशापासून बनवतात. यामध्ये मातीत असणाऱ्या जीवनसत्वांचा पाणी आणि co2 चा वापर केला जातो.

१४) ठिबक सिंचन प्रणाली

1) पंप = प्रणालींच्या घटकांद्वारे ठराविक दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य क्षमतेचा पंप वापरला जातो. डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर्स हे पंपाचे नेहमीचे प्राईम मूव्हर्स आहेत. अलीकडे ठिबक सिंचनाच्या उद्देशाने सौर पंप लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

2) नियंत्रण डोके = पुरवठा केलेला दाब आणि पाणी नियंत्रित करण्यासाठी, पाणी फिल्टर करण्यासाठी आणि त्यात पोषक तत्त्वे जोडण्यासाठी ठिबक प्रणालीचे नियंत्रण प्रमुख जबाबदार आहे. या घटकांमध्ये खताचा वापर करणारा फिल्टर आणि काही कंट्रोल व्होलव्ह.

3) खत टाकी = खत तात्यांचा वापर योग्य पोषक तत्त्वे, विशेषतः नायट्रोजन, पाण्याला ठिबक करण्यासाठी केला जातो. यामुळे खत वापरण्याची गरज कमी होते. टाकी हे एक लहान जहाज आहे. ज्यामध्ये इनलेट आणि आउटलेट मुख्य लाईनला जोडलेले आहे. पोषक घटक विरघळण्यासाठी प्रवाहाचा एक भाग थेट टाकीकडे वळविला जातो जो आउटलेट द्वारे मुख्य रेषेशी जोडला जातो. ज्या ठिकाणी टाकी मुख्य रेषेशी जोडलेली असते तो काही वेळा वेंचुरी असतो. हा वेग डोके वाढवतो आणि टाकीचे पाणी मुख्य रेषेत टाकण्यासाठी सक्षन विकसित करतो.

4) फिल्टर = ठिबक प्रणालीच्या कंट्रोल हेड इन्स्टॉलेशन मध्ये चांगल्या दर्जाचे फिल्टर असणे आवश्यक आहे. फिल्टरचा वापर पंपाद्वारे पुरवले जाणारे पाणी ड्रीप सर पर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यातून निलंबित अशुद्धतेमुळे छिद्र आणि ड्रीपरच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. ड्रीपर्सचे यश मुख्यत्वे फिल्डरच्या कामगिरीवर अवलंबून असते.

5) मुख्य ओळ = मुख्य ओळ सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याचे एकूण प्रमाण वाहून नेते. हे विविध उपमुख्य रेषा जलस्त्रोतांची जोडते. मुख्य पाईप्स सामान्यतः पीव्हीसी किंव प्लास्टिक सारख्या लवचिक सामग्री पासून बनलेले असतात. तथापि एस बेस्ट ऑफ सिमेंट किंवा गर्व नाईस स्टील पाईपचा वापर पारंपरिक स्प्रिंकलर सिंचनासाठी मुख्य लाईन प्रमाणेच केला जातो.

6) उप मुख्य = उपमुख्य एक किंवा दोन्ही बाजूंनी शेफटी फीड करते. हे एक तर मध्यम घनता पॉलिथिन किंवा पीव्हीसी पासून बनलेले आहे. मुख्य आणि उपमुख्य व्यासांमध्ये संतुलन असावे. हे डिस्चार्ज दर, उपमुख्यांची संख्या आणि पाईप्स मधील घर्षण नुकसान लक्षात घेऊन निर्धारित केले जातात.

7) पार्श्व भाग = हे सामान्यतः 1 ते 1.25 सेंटीमीटर व्यासासह कमी घनतेच्या पाईपचे बनलेले असते. 1.2 सेंटीमीटर व्यासासह बाजू लोकप्रियपणे वापरल्या जातात काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये लहान व्यासाचे कठोर पीव्हीसी पाईप लेटरल वापरात आढळतात.

8) वितरक = वितरक कमी डिस्चार्ज दर आणि वातावरणाच्या दाबाने पाणी टिपतात. वितरक ड्रीपर किंवा नोझल मायक्रो ट्यूब किंवा व्यावसायिक रित्या रित्या उत्पादित केलेल्या कोणत्याही प्रकारचे आउटलेट असू शकतात.

9) ठिबक सिंचनाचे फायदे = कमी पाणी वापरून अधिक उत्पादन, प्रत्येक झाडाला आवश्यकतेनुसार पाणी मिळते, पाण्यामुळे मातीला हानी कमी पोहोचते.

10) सुलभ हाताळणी = झाडाची वाढ आणि उत्पादन वाढवा “खते वापरात सुधारणा करा” मर्यादित तणांची वाढ.

१५) गांडूळ खत

आज मी तुम्हाला गांडूळ खत कसे तयार करायचे याबद्दल माहिती देणार आहे.

गांडूळ पैदास करण्यासाठी इसीनिया फोयटिडा या विदेशी जातीचा वापर करावा तसेच गांडूळांच्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहिल याप्रमाणे छप्पर करावे साधारणपणे 2000 गांडूळे सोडून त्यांच्यापासून प्रजनन तसेच त्यांच्यापासून गांडूळ खत मिळण्यासाठी जमिनीमध्ये वीस सेंटीमीटर खोलीचा एक मीटर लांब व 60 सेंटीमीटर रुंद असा खड्डा खोदावा. या खड्ड्यामध्ये अर्ध कंपोस्ट खत व अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजे पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा. म्हणजेच हा या गादीवाफा तयार होईल. हे खाद्य अंदाजे 200 किलो होते. या गादीवाफ्यामध्ये 2000 गांडूळे सोडावे. गांडुळे सोडल्यानंतर या गादीवाफेवर गोणपाठाचे आच्छादन करून त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी शिंपडावे. अशाप्रकारे गांडूळ खत तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करताना अवजारांचा वापर करू नये त्यामुळे गांडूळ खताला इजा पोहोचते वर नमूद केल्याप्रमाणे पुन्हा गादीवाफ्यात सोडावेत. या खतामध्ये गांडुळांची अंडी, विष्टा, कुजलेले खत व माती यांचे मिश्रण असते. हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते व छोट्या खड्ड्यांमध्ये पालापाचोळा, शेणखत, माती यांचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे. तेथे नाहीत, म्हणून ते खत करण्यासाठी उपयुक्त आहेत.

गांडूळांचे शेतीसाठी फायदे :- गांडूळांमुळे जमिनीची पोच सुधारते, मातीच् कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो, गांडूळची विष्ठा हे एक उत्तम प्रकारचे खत आहे. याला ह्युमस असे म्हणतात. यातून झाडांच्या वाढीसाठी लागणारे स्पुरक, पालाष व इतर सूक्ष्म दव्य झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात, जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.

१६) FOGGER

. Types of foggers =

1) one way fogger

2) two way fogger

3) four way fogger

flow rate = 28/LPH

one nozzle produce 7 litre water.

operating pressure = 2kg/cm2, 2 bar, 28 psi

it drops 7° temperature in just 30 second.

Four way fogger range = 5.5 sqml2

size of a drop = 1 micro

१७) कलम

. आज मी तुम्हाला कलम बद्दल माहिती देणार आहे यामध्ये आपण त्यांचे प्रकार, त्यांचे उपयोग व ते कसे तयार करायचे याबद्दल चर्चा करणार आहोत.

. मला कलमांचे दोन प्रकार माहित आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.

1) गुटी कलम = यामध्ये झाडाच्या साधारण 3 ते 4 सेंटीमीटर असलेल्या जाडीच्या फांदी निवडायची. त्या फांदीवर साधारण दोन सेंटीमीटर एवढे अंतर मधोमध घ्यायचे आणि तेवढ्या अंतरामध्ये त्या झाडाचे साल सोलयचे. त्या सोललेल्या फांदीला मोस लावायचे ओले करून. मग शेवटी त्या मोसला प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या साह्ने हवाबंद बांधायचे. ज्याने तेथे मुळे यायला चालू होतील जेव्हा मुळे येतील तेव्हा ती फांदी कापून आपण ती मातीमध्ये पेरू शकतो.

2) दाब कलम = यामध्ये झाडाच्या जमेलगतच्या उरलेल्या फांद्या निवडायच्या त्यांना मधोमध थोडे कापायचे त्या कापलेल्या जागेत एक छोटी काठी लावायची त्या काठीला खाली जमिनीवर पेरायचे आणि त्यावर दगड ठेवायचा थोड्या दिवसांनी त्या जागेस मुळे यायला सुरुवात होतील जेव्हा मुळे येतील तेव्हा ती फांदी कापून मातीत लावायची.

१८) रोपवाटिका तयार करणे.

. आज मी तुम्हाला रोपवाटिका कशी तयार करायची हे सांगणार आहे.

सर्वात पहिल्यांदा विटांच्या वतीने एक आयताकार तयार करायचा. त्याच्या आत मध्ये खताचा पहिला थर लावायचा आणि दुसरा थर हा मातीचा लावायचा. नंतर त्यामध्ये आपल्याला ज्या झाडाचे किंवा फुलाचे रोप पाहिजे आहे त्या झाडाची फांदी चे तुकडे घ्यायचे त्या तुकड्यांच्या खाली कोरफडीचे गर लावायचे जेथे गर लावलेले आहे ती बाजू त्या मातीमध्ये पेरायची त्यावर पॉलिहाऊस सारखे छोटे डिझाईनचे एक यंत्र भेटते त्याला ठेवायचे ज्याने तुमची रोपवाटिका तयार होईल.

१९) दाटा लॉगर

आज मी तुम्हाला दाटा लॉगर बद्दल माहिती देणार आहे.

दाटा लॉगर हे हरितगृहामध्ये वापरले जाते. त्यामध्ये दाटा लॉगर तापमानाची मोजमाप करण्याचे काम करते. ज्याने आपल्याला हरित गृहाचे तापमान कळते व पिकांनुसार कमी करायचे की जास्त ते समजते. आपण फक्त तापमान त्यात बघू शको ते बदलायचे असेल तर फोगर्स किंवा इतर गोष्टींनी कमी जास्त करू शकतो. आपल्याला जर एका ठराविक वेळात तापमानाची माहिती घ्यायची असेल तर त्याला आपण तसे सेट करू शकतो. याची माहिती आपल्याला त्याच्या ऍपच्या मदतीने बघू शकतो.

.