आज आम्ही गाय पालन या विषयाचा सविस्तर अभ्यास केला.
सर्वप्रथम गायींच्या विविध जातींची माहिती घेतली.
त्यामध्ये गिर, साहिवाल, देवळी ,थारपारकर, रेड सिंधी, जर्सी, खिल्लार, होलिस्टीन फ्रिजियन (HF) इत्यादीजातींची वैशिष्ट्ये समजून घेतली.
त्यानंतर गोठा बांधण्याच्या तीन पद्धती शिकल्या.
१)तोंडासमोर तोंड (Face to Face)
२)शेपटीसमोर शेपटी (Tail to Tail)
३)७मुक्त गोठा.
यानंतर दूध उत्पादन या विषयाचा अभ्यास केला.
100 मि.ली. दुधामध्ये Fat, SNF (Solid Not Fat) यांचे प्रमाण कसे मोजतात आणि त्याचे महत्त्व समजून घेतले.
तसेच दुधापासून तयार होणारे पदार्थ जसे की तूप, लोणी, दही, ताक, श्रीखंड, खवा, पनीर, चीज, आईस्क्रीम इत्यादींची माहिती घेतली.
गायीचे वजन मोजण्यासाठी खालील सूत्र शिकले:वजन (कि.ग्रॅ.) = (छातीचा घेरा × छातीचा घेरा × शरीराची लांबी) ÷ 660
शेवटी गायींना होणारे प्रमुख आजार व त्यावरील उपाय शिकलो.
FMD (तोंड-खुर रोग) – लसीकरण करणे.
HS (हेमोरॅजिक सेप्टिसेमिया) – वेळेवर लसीकरण व उपचार.
BQ (ब्लॅक क्वार्टर) – लसीकरण.मास्टायटिस – स्वच्छता राखणे व पशुवैद्यकीय उपचार.
लम्पी स्किन डिसीज (LSD) – लसीकरण, डास-माशांवर नियंत्रण व योग्य उपचार.
हे सर्व आम्ही प्रॅक्टिकल व कसं करायचं हे शिकलो.

