

1. परिचय व महत्त्व
नर्सरी म्हणजे दर्जेदार व निरोगी रोपे तयार करण्याचे ठिकाण.चांगल्या रोपांमुळे उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.फळे, भाजीपाला, फुले व वनरोपे तयार करण्यासाठी नर्सरी महत्त्वाची आहे.
2. नर्सरीचे प्रकार
तात्पुरती नर्सरी – एका हंगामासाठी.कायमस्वरूपी नर्सरी – वर्षभर रोपांचे उत्पादन.खुली नर्सरी – उघड्या जागेत.संरक्षित नर्सरी – पॉलीहाऊस किंवा शेडनेटमध्ये.
3. बियाणे निवड व पेरणी
प्रमाणित, निरोगी व उगवणक्षमता जास्त असलेले बियाणे निवडावे.पेरणी योग्य खोलीवर व योग्य अंतरावर करावी.आवश्यक असल्यास बियाण्यावर प्रक्रिया करावी.
4. माती व माध्यम
भुसभुशीत, सुपीक व पाण्याचा निचरा होणारी माती वापरावी.कोकोपीट, वाळू व शेणखत यांचे योग्य मिश्रण वापरतात.माध्यम रोगमुक्त असावे.
5. पाणी व खत व्यवस्थापन
आवश्यकतेनुसार नियमित पाणी द्यावे.संतुलित सेंद्रिय किंवा रासायनिक खते वापरावीत.जास्त पाणी देणे टाळावे.
6. रोग व कीड नियंत्रणन
र्सरी स्वच्छ ठेवावी.रोगग्रस्त रोपे काढून टाकावीत.आवश्यकतेनुसार जैविक किंवा शिफारस केलेली कीडनाशके वापरावीत.
7. रोपे तयार व रोपांतर
णरोपे 4–6 पाने आल्यावर किंवा योग्य वाढ झाल्यावर मुख्य शेतात लावावीत.रोपांतरण संध्याकाळी किंवा ढगाळ वातावरणात करावे.लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.