नर्सरी मॅनेजमेंट :

नर्सरी व्यवस्थापन :

  • सर्वप्रथम नर्सरीसाठी जागेची निवड केली जाते. जागेमध्ये पाण्याची सोय, चांगला निचरा, सूर्यप्रकाश आणि वाहतुकीची सुविधा असणे आवश्यक असते.
  • त्यानंतर नर्सरीची स्वच्छता करून आवश्यक साहित्य जसे की सीडलिंग ट्रे, कोकोपीट, पॉलीबॅग, माती, वाळू, गांडूळखत, फवारणी पंप इत्यादी तयार ठेवले जातात.

नर्सरीमध्ये फळझाडे :

  • फळझाडे (आंबा, पेरू, लिंबू, चिंच, जांभूळ, सीताफळ),
  • फुलझाडे (गुलाब, झेंडू, जास्वंद, मोगरा),
  • आयुर्वेदिक/औषधी वनस्पती (तुळस, कोरफड, अश्वगंधा, कडुनिंब, शतावरी),
  • वनझाडे तसेच भाजीपाला पिके (टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, कोबी, फ्लॉवर) यांची रोपे तयार केली जातात.

बीजनिवड :

  • चांगले व उगवणक्षम बियाणे निवडून आवश्यक असल्यास बीजप्रक्रिया केली जाते.
  • त्यानंतर सीडलिंग ट्रेमध्ये कोकोपीट भरून प्रत्येक कप्प्यात एक बी योग्य खोलीवर लावले जाते.
  • हलक्या फवाऱ्याने पाणी देऊन ट्रे नेटहाऊस किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवली जाते.

त्याची काळजी :

  • नियमित पाणी, योग्य तापमान आणि आर्द्रता यामुळे काही दिवसांत बियांची उगवण होऊन लहान रोपे तयार होतात.
  • रोपे 2 ते 4 पाने आल्यावर ती काळजीपूर्वक ट्रेमधून काढली जातात.

प्रक्रिया:

  • पॉलीबॅगमध्ये माती, वाळू आणि गांडूळखत यांचे योग्य मिश्रण भरले जाते. त्यामध्ये तयार झालेली रोपे लावून लगेच पाणी दिले जाते.
  • त्यानंतर दररोज आवश्यकतेनुसार पाणी, खत व्यवस्थापन, तण काढणे, किड व रोग नियंत्रण आणि स्वच्छता यांची नियमित काळजी घेतली जाते.

रोपे पूर्ण वाढ झाल्यावर :

  • त्यांना बाहेरील वातावरणाची सवय (हार्डनिंग) करून शेतात लागवडीसाठी किंवा विक्रीसाठी तयार केले जाते.
  • अशा प्रकारे नर्सरीमध्ये निरोगी, मजबूत व उच्च प्रतीची रोपे तयार होतात.