पाणी परीक्षण (पाणी परीक्षण) :-
• पाणी परीक्षण म्हणजे काय?
– पाण्याची गुणवत्ता तपासण्याची प्रक्रिया म्हणजे पाणी परीक्षण.
– पिण्यासाठी, शेतीसाठी व इतर वापरासाठी पाणी योग्य आहे का हे समजते.
• पाणी परीक्षण का करावे
– पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी.
– पाण्यातील जिवाणू व इतर अशुद्धता शोधण्यासाठी.
– पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सुरक्षित आहे का हे जाणून घेण्यासाठी.
-स्वच्छ व निरोगी पाणी वापरण्यासाठी.
•Water Testing चे 4 मुख्य टेस्ट
– pH (Potential of Hydrogen) – पाण्याचा आम्ल/क्षारपणा तपासतो.
– योग्य pH: 6.5 ते 8.5
•EC (Electrical Conductivity) – पाण्यातील विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण दर्शवते.
– 0–700 : पिण्यास योग्य
– 700–1500 : वापरता येते
– 1500 पेक्षा जास्त : पिण्यास अयोग्य
•TDS (Total Dissolved Solids) – पाण्यातील एकूण विरघळलेल्या घन पदार्थांचे प्रमाण मोजते.
-पिण्याच्या पाण्यासाठी 500 ppm पर्यंत योग्य.
•BT (Bacterial Test) – पाण्यात जिवाणू आहेत का हे तपासते.