नर्सरी
विद्यार्थ्याचे नाव :-
ऋषिकेश महेश लोहार .
विभागाचे नाव :-
शेती व पशुपालन .
विभाग प्रमुख :-
भानुदास दौडकर.
प्रस्तावना :-
रोपवाटिका म्हणजे जेथे झाडेझुडपे,वनस्पती ,कलमे यांची निगा राखली जाते त्या ठिकाणास रोपवाटीका असे म्हणतात. रोपवाटिका ही भविष्यासाठी खूप फायदेशीर आहे.रोपवाटिकेत आपण वेगवेगळ्या फुलझाडांची,फळझाडांची रोपे तयार करू शकतो.तसेच कमी जागेत जास्त रोप शकतो.रोपांचे संगोपन करता येते. रोपवाटिका माध्यमातून आपण एकाच वेळी जास्त प्रमाणात बियाणांची निर्मिती करू शकतो.
उद्देश :-
1)रोपवाटीका संकल्पना समजून घेणे.
2) रोपवाटीका महत्व समजून घेणे.
3) रोपवाटीका झाडांची वाढ आणि वातावरणातील झाडांची वाढ यांतील फरक समजून घेणे.
साहित्य :-
. शेणखत, माती, तुतीची झाडे,घमेले, पोलिथिन कागद,लोखंडी रॅक इ.
कृती :-
आकृती :-
1)योग्य आर्द्रता राखता येते.
2)रोपांची व मुळांची वाढ जोमदार होते.
3)कमी कालावधीत रोपे लागवडीसाठी तयार होतात.
अंदाजे खर्च:-
अ . क्र | साहित्याचे नाव | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेणखत | 10 kg | 5 /1 kg | 50/- |
2) | माती | 10 kg | 5/1 kg | 50/- |
3) | पॉलिथिन कागद | – | – | 200/- |
4) | लोखंडी रॅक | – | – | 500/- |
5) | तुतीची झाडे | – | – | 50/- |
एकूण | 850/- |
रोपवाटिका महत्व:-
1)कमी जागेत मोठ्या प्रमाणात रोपे तयार करता येतात.
2)रोपांचे संगोपन चांगले होते.
3) रोपांवरील कीड व रोगांचे नियंत्रण राखणे सोईचे होते.
4)रोपांवर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते.
5)रोपांना पाणी,खते देऊन वाढविता येतात.
6)उत्पादनक्षम व जातीवंत रोपांची कलमे तयार करता येतात.
प्रत्यक्ष खर्च :-
अ . क्र | साहित्याचे नाव | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेणखत | 10 kg | 5/1 kg | 50/- |
2) | माती | 10 kg | 5/1 kg | 50/- |
3) | पॉलिथिन कागद | – | – | 250/- |
4) | लोखंडी रॅक | – | – | 700/- |
5) | तुतीची झाडे | 300 झाडे | – | 200/- |
एकूण | 1250/- |
अनुभव :-
. मला भविष्यात स्वतःची नर्सरी सुरू करायची आहे.म्हणून मी रोपवाटिका तंत्रज्ञान हा प्रोजेक्ट घेतला. हा प्रोजेक्ट करताना मला खूप मज्जा आली. हा प्रोजेक्ट मी भानुदास सरांच्या मार्गदर्शनाखाली केला.त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले म्हणून हा प्रोजेक्ट माझा पूर्ण झाला . या प्रोजेक्ट मधून मला रोपे कशी तयार करायची तसेच त्यांची विक्री आणि त्यामधून होणारा फायदा हे समजले.ठराविक तापमान नियंत्रण करून वाढवलेली रोपे आणि परिसरात वाढलेली रोपे यांतील फरक समजला. व रोपवाटीका महत्व समजून घेतले .आणि रोपांचे संगोपन कशाप्रकारे करायचे याचा अभ्यास केला.अशाप्रकारे मी ‘ रोपवाटिका तंत्रज्ञान ‘ प्रोजेक्ट पूर्ण केला.
. Thank you