हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय पाण्यात शेती करण्याची पद्धत होय.

झाडांच्या वाढीसाठी मातीची गरज नसते.

झाडांना पाणी,

अन्नद्रव्ये,

ऑक्सिजन,

हवा,

प्रकाश आणि योग्य तापमानाची आवश्यकता असते.

हायड्रोपोनिक्समध्ये या सर्व गरजा पाण्यात मिसळलेल्या पोषक द्रावणाद्वारे (Nutrient Solution)

पूर्ण केल्या जातात.

Hydro म्हणजे पाणी आणि Ponics म्हणजे शेती.

त्यामुळे Hydroponics म्हणजे पाण्यातील किंवा मातीशिवाय शेती होय.

हायड्रोपोनिक्समध्ये झाडांची मुळे मातीत नसून पाण्यात किंवा ग्रोइंग मीडियामध्ये असतात.

झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळण्यासाठी एअर पंप वापरला जातो.

DWC पद्धतीमध्ये मुळे थेट पाण्यात असतात, तर NFT पद्धतीमध्ये पाण्याचा पातळ थर सतत वाहत असतो.

हायड्रोपोनिक्समध्ये झाडांना आधार देण्यासाठी कोकोपीट (Cocopeat) आणि कोको कॉयर (Coco Coir) यांसारखे ग्रोइंग मीडियम वापरले जातात.

हायड्रोपोनिक्ससाठी लागणारे साहित्य म्हणजे पाण्याची टाकी, पंप, PVC पाईप, नेट पॉट, न्यूट्रिएंट सोल्युशन आणि नेट कप.

हायड्रोपोनिक्सचे मुख्य प्रकार दोन आहेत.

Deep Water Culture (DWC) या पद्धतीमध्ये झाडांची मुळे थेट पोषक द्रावण असलेल्या पाण्यात असतात.

Nutrient Film Technique (NFT)

या पद्धतीमध्ये पाईपमधून पोषक द्रावणाचा पातळ थर सतत वाहत असतो.

Nutrient Solution म्हणजे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मिसळलेले पाणी होय.

यात नायट्रोजन (Nitrogen),

फॉस्फरस (Phosphorus), पोटॅशियम (Potassium),

कॅल्शियम (Calcium),

मॅग्नेशियम (Magnesium) आणि लोह (Iron) यांचा समावेश असतो.

हायड्रोपोनिक्समध्ये बहुतेक भाज्यांसाठी pH 5.5 ते 6.5 ठेवणे योग्य असते.

योग्य pH असल्यास झाडांना अन्नद्रव्ये सहज मिळतात.

EC (Electrical Conductivity) म्हणजे पाण्यातील पोषकद्रव्यांचे प्रमाण मोजण्याचे एकक होय.

EC कमी असल्यास अन्नद्रव्ये कमी असतात, EC जास्त असल्यास अन्नद्रव्ये जास्त असतात.

योग्य EC असल्यास झाडांची वाढ चांगली होते.हायड्रोपोनिक्सचे अनेक फायदे आहेत.

या पद्धतीमध्ये कमी पाणी लागते कारण तेच पाणी पुन्हा वापरले जाते. झाडांची वाढ जलद होते कारण अन्नद्रव्ये थेट मुळांना मिळतात.

मातीची गरज नसल्यामुळे कमी जागेतही शेती करता येते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

स्वच्छ व ताजी भाजीपाला मिळतो आणि कमी वेळात उत्पादन मिळते.

हायड्रोपोनिक्समध्ये लेट्यूस, पालक, मेथी, स्ट्रॉबेरी, मिरची, टोमॅटो, तुळस आणि काकडी ही पिके सहज घेता येतात.

हायड्रोपोनिक्समध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी पाणी,

पोषकद्रव्ये,

ऑक्सिजन,

सूर्यप्रकाश किंवा ग्रो लाईट,

योग्य pH, योग्य EC आणि योग्य तापमान आवश्यक असते.