1) फळबाग पिकांचा अभ्यास करणे
लागवडीच्या पद्धती :
- चौरस पद्धत
- आयत पद्धत
- त्रिकोण पद्धत
- षटकोण पद्धत
- डोंगर उतार (कण्टुर पद्धत )
चौरस पद्धत: चारही बाजूचे दोन ओळीत व दोन झाडांमधील अंतर समान असते.
उदाहरणार्थ: 3मी × 3मी
आयत पद्धत: आयत पद्धतीमध्ये दोन ओळीतील व दोन झाडांमधील अंतर समान असते.
त्रिकोण पद्धत: जर कमी जागेत जास्त झाडे लावायचे असते तर त्रिकोण पद्धत वापरतात पण त्याची काळजी पण वाढते.
षटकोन पद्धत: षटकोन पद्धतीमध्ये सहा कोणावर सहा झाडे लावली जातेसात आणि मध्यभागी एक झाड असते. असे ऐकून सात झाडे लावली जाते.
डोंगर उतार (कुंटूर पद्धत): या पद्धतीमध्ये डोंगराचा उतार जसा आहे त्यानुसार झाडे लावली जात.
2) हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान : माती विना शेती करणे आणि पाण्यावर चालणारी शेती. हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे.वनस्पतीला वाढवण्यासाठी लागणारे पोषक द्रव्य पाण्याद्वारे दिली जातात हायड्रोपोनिक शेती ही टेरेस घरामध्ये किंवा घराबाहेर केली जाऊ शकते त्यामध्ये पालेभाज्यांपासून टमाटा पर्यंत विविध भाजीपाला आणि विविध फळ पिके घेता येतात.
साहित्य: कप पाईप मोटर स्टॅन्ड पाणी कोकोपीट खत
हायड्रोपोनिक चे प्रकार
एकूण हायड्रोपोनिकचे सहा प्रकार पडतात.
डीडब्ल्यूसी डीप वॉटर कल्चर सिस्टीम
डब्ल्यू एस वीक सिस्टीम
एन एफ टी एस न्यूट्रियंट फिल्म टेक्निकल
ए एस एरोपोनिक्स सिस्टीम
इ बी बी आणि फ्लो
डी एस ड्रीप सिस्टीम.
पाण्याचा पीएच पोटेन्शिअल हायड्रोजन 6.5 असते.r
टीडीएस टोटल डिझेलवर ऑन सॉलिड 1200 असते
इसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 2400 असते. या गोष्टी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये खूप महत्त्वाचे ठरतात.
हायड्रोपोनिक्स चे फायदे:
पाण्याची बचत होते
कमी जागेत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते
कमी खर्चातील शेती आहे.
जागेची बचत होते
वेळेची बचत हो


हैहायड्रोपोनिक्स मधील पालकाच्या भाजीचे पाणी तपासताना.
3) किड नियंत्रण
किड नियंत्रणाच्या एकूण तीन पद्धती आहेत.
- भौतिक पद्धत: भौतिक पद्धतीमध्ये नांगरणी खोलवर केले पाहिजे.आधीच्या झाडांच्या अवशेष न ठेवणे. कृतडलेले झाडांचे पाले काढून टाकने. इत्यादी गोष्टी केले पाहिजे.
- रासायनिक पद्धत: रासायनिक पद्धतीमध्ये रसायनांचा वापर करून क्रीडांवर नियंत्रण केले जात.उदाहरणार्थ : डायमिथाईट (केमिकल), चिकट सापळे. चिकट सापळ्याचा उपयोग फळमाशीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. अट्रॅप्स व्हेजिटेबल मुखी या रसायनांचा वापर कीड नियंत्रणासाठी केला जातो.
- जैविक पद्धत: जैविक घटकांचा वापर करून किड्यांवर नियंत्रण केले जाते. उदाहरण: दशपर्णी अर्क, ब्युवेरिया बसियना (बुरशी), थ्रीप्स, हूमनी सारख्या किड्यांना नियंत्रण करत.

केळीच्या बागेत ATTRAPS VEGETABLE FLY बॉटलला स्प्रे करून जमिनीत रवताना.

4)तापमान मोजने
तापमान मोजण्याचे दोन एकक आहेत.सेल्सिउसआणि फेरेनाईट


त्याचे नाव थर्मामीटर आहे. त्याचा उपयोग म्हैस, गाईंचं, शेळ्यांचं, कुत्र्यांचं, अशा अनेक प्राण्यांचा तापमान मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
5) पिकांना नुकसान पोहचवणारे घटक
- किड
- रोग
- वायरस
- जंगली प्राणी
- मूशक वर्गीय प्राणी
- पक्षी.
1) कीड :
किड्यांचे दोन प्रकार आहेत.
1) रस शोषणारी कीड :
ही कीड पानावर बसून फांद्यांच्या साह्याने पानाच्या आतील रस शोषून घेतात.
उदाहरण : थ्रिप्स मावा तुडतुडे
2) पाने खाणारी कीड :
झाडांच्या पानावर बसून पाने खातात.
उदाहरण : नाकतोडा
2) पक्षी :
पिकाचे दाणे खातात.
3) मूशक वर्गीय प्राणी :
उंदीर: मुळ्या खातो किंवा जमिनीखालील पीक खातो साठवलेली धान्य खातो.
4) जंगली प्राणी:
खाऊन टाकतात किंवा तुडवून टाकतात.
5) वायरस:
मिरचीवर थ्रिप्स नावाची कीड आली की वायरस येतो व्हयरसमुळे मिरची पिकामध्ये बोकड्या नावाचा आजार येतो.
6) आळी:
1)नाग अळी:
पानाच्या आतील गाभा खातात. झाडाच्या पिकाच्या खोडातील गावा खातात.
उदाहरण: मक्यावरील लष्करी अळी.
फळे पोखरणारी अळी:
काही अळ्या फळातील गाभा खातात.
उदाहरण:भोपळा, काकडे, पपई, सारखा पिकावर येतात.
6) शेतीच्या मोजमापावरून रोप लागवडीचे संख्या ठरवणे.


7) प्राण्यांचे दूध काढणे
प्राण्यांचे दूध काढताना घ्यावयाची काळजी
सर्वात पहिले गाईचे स्वच्छता केली पाहिजे. दुधाची वेळ बारा तासांचा गॅप असला पाहिजे ह्या वेळेमध्ये कुठलाही बदल करता कामा नये. दूध काढणारा माणसाची स्वच्छता असणे गरजेचे आहे. दुधाची कॅटली बाटली स्वच्छ धुणे. दूध काढताना नेहमी कास ही गरम पाण्याने धुणे.
दूध काढण्याचे प्रकार:
हाताच्या साह्याने दूध काढणे.
मशीनच्या साह्याने दूध काढ.

गाईचे दूध काढताना
8) प्राण्यांचे अंदाजे वजन काढणे
प्राण्यांचे अंदाजे वजन काढन्याचे सूत्र = वजन = छातीचा घेरा X छातीचा घेरा X लांबी



गाईंच्या वजनासाठी त्यांची मापे घेताना.
9) पिकांना लागणारे अन्नद्रव्य
नत्र (नायट्रोजन एन):
पिकांना लागणारे आवश्यक्य अन्नद्रव्य मध्ये नत्राचे हे महत्त्वाचे स्थान आहे. कारण पिकांमध्ये विविध जैव रासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नत्र हे मुख्य भूमिका बजावते. पिकांना नत्र काहीक वाढीसाठी पुनरुत्पादन क्रिया जैव रासायनिक क्रिया इत्यादी महत्त्वाच्या असतात.
मित्राची आवश्यकता:
पिकांना बीज प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अन्न निर्मितीमध्ये महत्त्वाचे असते.
पिकांच्या कायीक आणि शाकीय वाढीसाठी नत्र मुख्य भूमिका बजावते.
मित्रामुळेच प्रथिनेची निर्मिती होत असते.
पिकामध्ये नत्राच्या कमतरतेची लक्षणे:
पिकांची कायिक वाढ थांबते.
नत्राच्या कमतरतेमुळे फुलधारणा कमी होते.
नत्रामुळे पिकातील जुनी पाने पिवळी पडतात.
स्पुरद (फॉस्फरस पी):
पिकांना ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रक्रियेत स्पुरद मुख्य काम करते. जास्तीत जास्त मुलाच्या वाढीसाठी आणि लवकर वाढ होऊन फळांच्या पिकवण्यासाठी लागणारा वेळ कमी कमी करण्यासाठी खोडाची वाढ व मजबुतीसाठी तसेच रोग प्रतिकारक्षमता वाढते व थंडीपासून बचाव करणे इत्यादी महत्त्वाच्या क्रियेमध्ये स्पुरद गरज असते.
स्पुरद चे पीक पोषणात शोषण वहन:
स्पुरद हा पिकांत जमिनीपासून त्याच्या मुळाद्वारे प्रवेश करतो आणि पिकांचा मुळावरील केसाच्या स्वरूपातील मुळाद्वारे मुळाची टोळ आणि मुळांच्या बाहेरील बाजूस असणारा पेशी द्वारे शोषण होते. स्फुरद हा मुळामध्ये प्रवेश केल्यानंतर तो पिकाच्या मुळामध्ये साठवला जातो यानंतर पिकांच्या वरच्या बाजूला पुरवठा केला जातो.
पालाश:
फुलांची संख्या कमी होते आणि फळाचे आकारमान वाढत नाही.
वनस्पतीमध्ये कोणते घटक कमी असल्यामुळे कोणते लक्षणे दिसून येतात:
कॅल्शियम:
पानाचे कडा करपणे पिवळे डाग पडतात. आणि टोके जळतात व फुल फळाचे गळती जास्त होते.
मॅग्नेशियम:
जुन्या पानाचे कडा पिवळे पडतात आणि काळा नंतर आणि शिराकडील भाग पिवळे पडतात.
सल्फर:
गंधकचा कमतरतेमुळे ही नत्राची कमतरता सारखं असतात. व नवीन पाणी पिवळी फिके पडलेले दिसतात.
10) प्राण्याच्या वजनावरून त्यांचे खाद्य काढणे.

11) बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया मंजे पेरणिपूर्वी बियावर जी प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया म्हणतात.
बीज प्रक्रियाकरण्याचे फायदे :
कडकपणा कमी होतो.
बियाची उगवण क्षमता वाढते.
जमिनीतील असणारे बुरशिजन्य रोग पिकाला लागत नाहीत.
बियाची साठवण क्षमता वाढते.
बीज प्रक्रियाचे प्रकार
भौतिक प्रकार :
एक बादलीत बिया टाकून पाणी टाकणे व वर आलेले दाणे काढून टाकणे. नंतर खाली असलेल्या बिया उन्हात वाळवण्यासाठी टाकने.
रासायनिक प्रकार:
बीज प्रक्रिया करण्यासाठी रसायनाचा वापर केला जातो. मेनकोझेब, कार्बनडाझीन सल्फर या रसायनांचा वापर बीज प्रक्रिया साठी केला जातो.
घावयाची काळजी:
रसायन हाताळताना हातमोजे घालावे,मास्क घालावा,हातपाय स्वच्छ धूने.
उदाहरण: 1) ज्वारीच्या दहा केजी बियाण्याला वीस ग्राम गंधक चोळावे.
2)कांदे किंवा भाताची रोपे M-45 च्या द्रवणास बुडवून लावल्यास येणारा करपा टाळता येतो.
रासायनिक प्रक्रियेचे फायदे:
1)उगवण क्षमता वाढते.
2) बुरशीजन्य आजार विकास होत नाही.
3) रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
जैविक बीज प्रक्रिया:
1) ट्रायकोडरमा हे जैविक बुरशी नाशकाचे काम करते.
2) रायबोझीअम द्विधर पिकांमध्ये नग चेरीकरणाचे काम वाढवते.
जैविक वीज प्रक्रिया चे फायदे:
माणसाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.
12) गाईच्या गोठ्याची स्वच्छता
गायीच्या गोठा का साप ठेवावा ?
गाय गोठा साप ठेवल्यामुळे गाईला कोणते आजार होणार नाही. गाईच्या दुधामध्ये जंतू किंवा गायीचे दूध खराब नाही मिळणार. दुधाची गुणवत्ता चांगली मिळेल. गाईला कोणतेह आजार होणार नाहीत. गाईला होणारे आजार कमी होतात. गाईला औषध साठी लागणारा खर्च कमी येतो.
गोटा साफ ठेवण्याचे फायदे कोणते?
गोटा साफ असल्यावर गाईला होणारे आजार कमी होतात.
गाईच्या दुधामध्ये वाढ होते.
गाय दिसायला सुंदर आणि चांगले दिसते.
कासाचे आजार किंवा रोग होणार नाही.
गायीच्या कासेला होणारे आजार व लक्षणे
- दगडी: हे आजार गायीच्या कासाला कडकपणा आणतो.
- मस्टडी: हे आजार गायीच्या कास सुजवण्याचे कार्य करते.

गायीच्या गोठ्याची स्वच्छता करताना.

गायीच्या गोठ्याची स्वच्छता करताना

गायीची स्वच्छता करताना

गाईला स्प्रे गन्ने धुताना.
13) मुरघास तयार करणे
उद्देश :
पावसाळ्यामध्ये जनावरांना चारा नसतो अशावेळी धरणाचे हिरवा चारा कमी पडायला लागतो त्यावेळी आपण आपल्या जनावरांसाठी मुरघास बनवून साठवून ठेवू शकतो व अडचणीच्या वेळी तो चारा जनावरांना देऊ शकतो.
साहित्य :
गुळ मीठ,मिनरल मिक्स्चर, मक्याची कुट्टी.
कृती :
शेतातील मका कापून घेणे. यानंतर मक्याची मशीन मध्ये कुठे करून घेणे. 3 टनाच्या बॅगेत ते भरून त्यात मीठ गूळ आणि मिनरल मिक्स्चर पावडरचा थर दिला जातो. मुरघास बागेत दाबून बसवला जातो. त्यानंतर त्या बॅगेला हवाबंद करून ठेवले जाते.

गाया मुरघास खाताना.
14) पिकांना पाणी देण्याच्या पद्धती
पाणी देण्याच्या दोन पद्धती आहेत:
1) पारंपरिक पद्धत:
1) मोकाट पद्धत
2) सपाट वाफा पद्धत
3) सरी पद्धत
4) वाफा पद्धत
2) आधुनिक पद्धत:
1) ठिबक सिंचन:
ठिबक सिंचन म्हणजे पिकांचा झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब शेंबे किंवा बारीक धाराणे पाणी देण्याचे आधुनिक पद्धत होय.
शोध:
ठिबक सिंचन चा शोध इसराइल मधील सिम चा ब्लास यांनी लावला.
साहित्य:
पिऊसी पाईप, ग्रोमॅक, टी, एल, जॉईंटर,रबर, एंड कॅप, पिन, कॉक.
फायदे:
पाण्याची बचत होते झाडाला पाहिजेल तेवढेच पाणी जाते तन वाढ कमी होते पाणी जमिनीत न जाता झाडाच्या मुळाशी जाते.
लॅट्रल: ठिपकाचा पाईप.
एंड कॅप: शेवटच्या टोकाला लागणारे साधन.
ड्रीपर: पाणी देण्याचे.
तुषार सिंचन:
तुषार सिंचन म्हणजे पिऊसी पाईपला जोडलेला नवजल द्वारे पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते त्याला तुषार सिंचन म्हणतात.
फायदे:
श्रम आणि खर्च कमी करते. उत्पन्न वाढवण्यास मदत करते. 30% ते 50% पाण्याची बचत होते. सर्व प्रकारच्या मातीसाठी वापरले जाते. विद्राव्य खते व रासायनिक खते वापरणे शक्य होते.
पारंपारिक व आधुनिक पद्धतीतील फरक

15) एफ सी आर (फीड कन्व्हर्शन रेशो)
खाद्याचे मासमध्ये होणारे रूपांतर.
सुत्र : एफसीआर = खाद्य÷वजन

16) वनस्पती उती संवर्धन
वनस्पती उंची संवर्धन म्हणजे रोप त्यातील अथवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी अथवा त्या वाढवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याला प्लांट टिशू कल्चर असे म्हणतात.
वनस्पतीच्या वाढीसाठी काही पोषक द्रव्य आवश्यक असतात. पोषक द्रव्यात सर्वसाधारणपणे सोडियम व पोटॅशियम आयन, ऊर्जेसाठी ग्लुकोज,प्रक्रियेसाठी विकरे, आवश्यक अमिनो आम्ले,काही संप्रेरके, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइड मिश्रित हवा यांचे मिश्रण असते यालाच वृद्धी मिश्रण म्हणतात.
वनस्पती उती संवर्धन म्हणजे वनस्पतीच्या पेशी उती किंवा अवयव यांची निर्जंतुक स्थितीमध्ये निगा राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वापरल्या जाण्याच्या तंत्रज्ञानाचा संग्रह आहे.

गुलाबाच्या झाडाची फांदी कापताना.
वनस्पती संवर्धनाचे फायदे:
- वनस्पतीचे अवयव कीटक आणि बुरशीरोधक पोषक द्रव्ये विकसित केली जाते हे खास करून चांगल्या फुलांच्या फळांचे उत्पादन किंवा इतर इष्ट गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे क्लोन तयार करते.
- बियाणे नसलेली फळे बियाण्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन न करता अनेक वनस्पतीची निर्मिती होते.
- या तंत्रात जनुकीय बदल केले जातात संपूर्ण रोप एकाच पेशीतून बांधता येते या तंत्रामुळे रोगप्रतिरोधक कीटक आणि मजबूत प्रतिरोध जाती निर्माण होऊ शकतात प्रत्येक पेशीत संपूर्ण विकसित करण्याची ताकद असते याला पूर्ण निर्मिती क्षमता असे म्हणतात या पद्धतीने वनस्पतीचे पुनर्वापर करता येते.

ल्यामिनार फ्लोअर मध्ये गुलाबाचे कापलेले होती काडी लावताना.
17) माती परीक्षण
माती म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील थर होय. माती हवा पाणी सेंद्रिय पदार्थ खनिज व अनेक जिवाणूंच मिश्रन आहे. मातीही झाडाला पोषक तत्त्वे पुरवण्याचे व आधार देण्याचे काम करते.
मातीचे सामू (PH ) पोटेन्शिअल ओन हायड्रोजन 7-14 असते.
1-7{acidic (आम्ल)} आणि 7-14{basic (अम्लारी)}.
हंगामी पिके 20cm
भाजीपाला30cm
फळबाग100cm
माती परीक्षण का करावे ?
मातीतील अन्नद्रव्याचे प्रमाण किती?
जमीन आम्लधर्मी का विमल धर्मी आहे?
संतुलित खतांचा वापर आणि खतांची बचत.
जमिनीची सुपीकता टिकवणे.
अन्नद्रव्यांचा समतोल राखणे.
मातीचा नमुना कसे घ्यावे?
- जागा निश्चित करावी.
- त्या ठिकाणी 20 सेंटीमीटर चा व्ही आकाराचा खड्ड्यातून माती घ्यावी.
मातीचा नमुना केव्हा घ्यावा ?
- मातीचा नमुना पिक वाढणे नंतर आणि नांगरणीच्या आधी घ्यावी.
- खते टाकल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नये.
माती परीक्षणाचे फायदे.
- माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य व जमिनीचे दोष समजतात व त्यावर नियोजन करता येते.
- जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात.
- खतांचा संतुलित वापर होऊन येणारा खर्च कमी येतो..
- जमिनीचे सुपीकता राहते, उत्पादनक्षमता वाढते.
नमुना तपासणीसाठी देताना घ्यायची काळजी.
- नमुना क्रमांक देणे
- नमुना घेतल्याची दिनांक
- शेतकऱ्याचे पूर्ण नाव
- गाव पोस्ट जिल्हा तालुका
- सर्वे किंवा गट क्रमांक
- नमुनेचे क्षेत्र
- बागायत किंवा जिरायत
- मागील हंगामातील पीक आणि
- पुढील हंगामातील पीक आणि वाण
- जमिनीचा उतार किंवा सपाट
- पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट.
फूड लॅब मागील शेतातील मातीचे परीक्षण केले.
PH-7.7 सामू (पोटेन्शिअल हायड्रोजन)
N-140 नायट्रोजन (नत्र)
P-35 फॉस्फरस (स्फुरद)
K-325 पोटॅशियम (पालाश)
OC-0.4 ऑरगॅनिक कार्बन (सेंद्रिय कर्ब)
TDS-30
EC-60

मातीचे नमुने गोळा करत असताना.

माती परीक्षणकरताना.
18) पिकांना लागणारे खते
रासायनिक खते:
रसायनांचा वापर करून झाडांना लागणारे नत्र स्फुरद पालाश सल्फर अशा घटकांना अन्नद्रव्यांना एकत्र करून घन पदार्थात रूपांतर केले जाते काही अन्नद्रव्य ही मिश्र स्वरूपात असतात तर काही अन्नद्रव्य ही संयुक्त स्वरूपात असतात.
रासायनिक खतांचे प्रकार :
1) संयुक्त खते
या खतामधून एकच घटक जमिनीस किंवा पिकांना मिळतो.
उदाहरणार्थ : युरिया खतामधून 47% नत्र मिळतो.
2.17 केजी युरिया घेतल्यानंतर 1kg नत्र मिळते.
2) मिश्र खते
दोन किंवा जास्त आणि द्रव्य एकत्र केलेले असतात.
मिश्र खते
- 10:26:26
- 12:32:16
- N:P:K:00:5
3) पाण्यात विरघळणारे खते:
यांना विद्राव्य वाढीच्या अवस्थेत असताना 1919 प्लस 12 61कथे असेही म्हणतात. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्यातून किंवा ठिबक द्वारे सोडले जाते.
- 12:61
- 13:4:13
- 0:52:34
- 0:0:50
- 19:19:19
- वाढीच्या अवस्थेत असताना19:19:19 आणि 12:16 हे खते दिली जातात.
- फळांची साईज वाढवण्यासाठी 0:0:50 हे खत लागते.
- ज्यावेळेस कळी निघायला सुरुवात होते तेव्हा0:52:34 ही खते पूर्णतः पाण्यात विरघळत असल्यामुळे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये वापरले जाते.
जिवाणू खते:
जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य झाडांच्या मुलांना उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू करत असतात. वेगवेगळ्या अन्नद्रव्यांसाठी वेगवेगळे जिवाणू असतात म्हणून जमिनीमध्ये जिवाणू जगवण्यासाठी सेंद्रिय खते जास्त वापरावे.
उदाहरणार्थ:
- Azatobactor जमिनीतून नत्र उपलब्ध करून देण्याचे काम करते.
- Phosphorus solubilizing bacteria स्फुरद उपलब्ध करून देण्याचे काम करते.
- potash mobilizing bacteria जमिनीमध्ये पालाश व पोटॅश उपलब्ध करून देण्याचे कार्यकर्ते
- Rhizobium द्विदल झाडांच्या मुळांना Rhizobium च्या घाटी असतात. या गाठी हवेतील नत्र झाडांना उपलब्ध करून देतात.

पिकांना खत टाकताना.



पाण्यातून खत देताना.
19) नर्सरी तंत्रज्ञान
नर्सरी तंत्रज्ञान म्हणजे काय ?
नर्सरी म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी निरोगी आणि उच्च दर्जाच्या रोपांची लागवड केली जाते. तसेच त्यामध्ये फळे भाजीपाला यासारखे रोपांची निर्मिती केली जाते. काळजीपूर्वक वाढविले जातात. ती रोपे लागवड योग्य केली जातात 15 ते 45 दिवसांमध्ये हे रोपे लागवडीस योग्य केली जातात. तसेच त्या रुपांना शेतामध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या रोपांची लागवड केली जाते त्याला नर्सरी असे म्हणतात.
रोपवाटिकेमध्ये वाढवली जाणारी रोपे
भाजीपाला,फुल झाडे, वनस्पती झाडे, फळ झाडे,औषधी वनस्पती, जंगली झाडे
फायदा
रोपांच्या गुणवत्तेची खात्री नेहमी रोपवाटिका मध्ये करता येते.
रोपवाटिका मध्ये उच्च दर्जेची रोपे तयार करता येते.
रोपवाटिकेमध्ये कलम तयार करता येते.
उच्च दर्जाचे फळबाग किंवा झाडे वाढवता येतात.
कमी जागेत जास्त रोपांची संख्या तयार करता येते.
कमी जागेत कमी वेळेत जास्त काम करता येते.

ट्रेनमध्ये कारल्याच्या बिया भरताना.

ट्रेमध्ये कोकोपीट भरताना.

ट्रेनमध्ये बिया टाकून झाल्यानंतर कोकोपीट भरताना .

नर्सरी मधील झाडांची देखभाल करताना.
20) अद्राता चेंबर
भाजीपाला नर्सरी मध्ये बियांची उगवण लवकर होण्यासाठी काय केले जाते?
बियाचे ट्रे एकावर एक ठेऊन त्यावर कापडाने झाकून त्याच्यावर बल्ब लावला जाते त्यामुळे बियांचे उगवन लवकर होते,यालाच भट्टी लावणे असे म्हणतात.
झाडे उगवण्यासाठी लागणारे घटक = पाणी, आर्द्रता, उष्णता.
(वनस्पती प्रसाराच्या पद्धती )
1) बीया = झाडाच्या बीया लावल्या नंतर अनेक रोप तयार होते वनस्पती प्रसाराचा मुख्य घटक आहे.
2) झाडांची फांदी = झाडाचा पान, पानफुटी, ब्रम्हकमळ
( काही वनस्पतीचा प्रसार मुळान पासुन होतो )
रताळ, बटाट, बांबू

चेंबरचे काम करताना.

तुती झाडाचे लागवड


तुतीच्या झाडांना कोंब फुटल्यानंतरची स्थिती.
21) ब्रूडिंग करणे
ब्रूडिंग का करायची असते?
जेव्हा अंडी इनकुबेटर मध्ये किंवा कोंबडी खाली बसवली असते तेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी 37 डिग्री अंश सेल्सिअस ते 39 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असते. जेव्हा इंक्युबेटरमधून पिल्ले बाहेर काढले जाते तेव्हा बाहेरचे वातावरणातील तापमान कमी असते यामुळे पिल्लांना ते सूट होत नाही.कोंबडीचे पिल्ले आजारी पडू शकतात. पिल्ले मरून जातील. त्यामुळे पिल्लांना सूट होण्यासाठी ब्रूडिंग करणे गरजेचे आहे.
ब्रूडिंग कसे करायचे असते?
जेव्हा पिल्ले जन्माला येण्याआधी किंवा आल्यावर त्यांना 35 ते 37 डिग्री अंश सेल्सिअस तापमानामधे ठेवायचे असते किंवा दिले जाते.37 डिग्री ऑन सेल्सिअस तापमान तयार करण्यासाठी सुरुवातीला काळा ताडपत्रीने चारही बाजूने किंवा वरून बांधून घेणे. ताडपत्रीच्या आत मध्ये गोल आकाराचा चीक गार्ड लावून घेणे.यामध्ये 2 ते 3 इंच तुसाचा थर देवून तूसावर न्यूज पेपर अंथरणे. टोपल्याच्या झापेला ताराने बांधून घेणेआणि टोपल्याच्या घातलेल्या आत मध्ये एडिसन बल्प लावणे. पिल्लासाठी खाद्य टाकने. नंतर पिल्लांना त्यामध्ये सोडणे. पिल्लू साठी पाणी ठेवणे.

पिल्लांसाठी ब्रूडिंग ची तयारी करताना.

21 दिवशी अंडीतून पिल्ले बाहेर पडताना.

पिल्यानचं वजन करताना.

पिले दुसऱ्या बाजूला ठेवताना.

22) शेळीपालन
भारतामध्ये एकूण तीन प्रकारे शेळीपालन केले जाते
मोकाट शेळीपालन
या प्रकारामध्ये शेळ्यांना डोंगर शेतात किंवा निसर्गात मोकळेपणाने करायला सोडले जाते. या प्रकारात खाद्याचा खर्च कमी होतो.आजारी जास्त पडतात.
अर्ध बदिस्त शेळीपालन
अर्धा दिवस गोठ्यातच खाद्य देणे आणि अर्धा दिवस मोकळ्या ठिकाणी चारायला घेऊन जाणे.
बंदिस्त शेळीपालन
बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांचे खाद्य एकाच ठिकाणी दिले जाते शेळावर लक्ष देणे सोपे जाते शाळा आजारी कमी पडतात खाद्य जास्त लागते खाद्याचे खर्च जास्त होते
शेळ्यांच्या जाती
1) उस्मानाबादी
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उगम स्थान आहे जुळे देण्याची क्षमता 70% ते 80% टक्के असते.10% शेळ्या 3 किंवा जास्त पिल्लांना जन्म देतात. कोणत्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असते.
कोकण कन्याळ
डॉक्टर बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये तयार केलेली ही जात आहे. ही शेळी कोकणामध्ये कोणताही वातावरणात उष्ण किंवा दमट वातावरणात तग धरून राहते.
संगमनेर
महाराष्ट्रातील सांगमणेरी जिल्ह्यातील उगम स्थान आहे. ह्या शेळ्यांमध्ये जुळे देण्याची क्षमता 40 टक्के ते 50 टक्के शेळ्या एकाच पिल्लांना जन्म देतात.
आफ्रिकन बोर
मास उत्पादनासाठी प्रचलित आहे. चांगली काळजी घेतल्यास 200 ग्रॅम प्रति दिवस करडे वाढतात.
सासेन
या शेळ्या जगामध्ये दुधाची राणी म्हणून ओळखले जाते. एका दिवसात दोन ते तीन लिटर दूध देते.
गोठ्याची बांधणी करताना जागा कशी निवडायची असते?
घोठा उंच ठिकाणी असावा.
पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
बाजूला झाडे असावी.
गोठ्यावर जाण्याची सोय असावी.
गोठ्या शेजारी लाईट असावी.
गोठा बांधताना A आकारात बांधावा.
काही शेळींच्या महत्त्वाच्या गोष्टी
- शेळीचे आयुष्य 12 ते 18 वर्षे असते
- आठ वर्षापर्यंत चांगला उत्पादन देते
- पाच महिन्याचा शेळीचा गर्भकाळ असतो
- पहिल्या माझ्यावर येण्याचा काळ चार ते पाच महिने वरती
- शेळीचे वय दहा ते बारा महिने झाल्यावरच गाभण करावी
- शेळीला दर तीन महिन्याला जंताच्या औषध दिले पाहिजे
23) कुकुट पालन
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या जाती
1)व्हाईट लेग हॉर्न
वैशिष्ट्य: हा पक्षी वजनाने हलका असतो.
हा पक्षी कणखर असतो.
अंडी उत्पादन क्षमता: 13 ते 14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो. 300 ते 325 अंडी वर्षाला देतात. अंडे चे वजन 50 ते 54 ग्रॅम असते. 85 टक्के उत्पादन क्षमता असते.
2)BV 300 (वेंकी)
वैशिष्ट्य: हा पक्षी अतिशय काटक असतो. सहसा हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत नाही. दिसायला रुबाबदार फ्रेश सडपतळ व उंच असतो.
अंडी उत्पादन क्षमता: १३ ते १४ महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो. 350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात. अंडी 55 ते 60 ग्रॅम वजनाचे असते. 95 टक्के उत्पादनक्षमता असते.
3) बोन्स
वैशिष्ट्य: हा पक्षी वजनदार असतो. हा पक्षी बीवी 300 एवढा कणखर नाही दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ व उंच असतो.
अंडी उत्पादन क्षमता: 13 ते 14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो. 350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात. अंड्याचे वजन 65g पेक्षा जास्त वजनाचे असते. 90% उत्पादन क्षमता असते.
4) हायलाईन
वैशिष्ट्य: हा पक्षी वजनाने हलका असतो. हा पक्षी कणखर असतो. दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ आणि उंच दिसतो.
अंडीत उत्पादन क्षमता: १३ ते १४ महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो. 350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतो. 50 ते 55 ग्राम वजनाचे अंडे भरते. 85 टक्के उत्पादन क्षमता असते.
अंड्यावरील कोंबड्यांचे शेड
वय (आठवडे) | गादी पद्धत चौरस फूट प्रति पक्षी | पिंजरा पद्धत चौरस इंच प्रतिपक्षी |
0 ते 4 | 1/2 | 24 |
5 ते 8 | 1 | 48 |
9 ते 20 | 1.5 | 60 |
21 ते 72 | 2 | 60 |
अंड्यावरील कोंबड्या ह्या पिंजरा पद्धतीमध्ये सांभाळले जाते. पिंजराची उंची सात ते आठ फूट उंच असते. दोन पोल मधील अंतर 10 ft असते. कोंबड्यांना खाद्य टाकण्यास गवाने पिंजऱ्यांनाच असते. या पद्धतीमध्ये कोंबड्या आणि कोंबड्यांचा संबंध येत नाही.
काही महत्त्वाच्या गोष्टी
अंडे तयार होण्यासाठी सव्वीस तासाचा कालावधी लागतो. अंड्यावरील कोंबड्यांना सोळा तास प्रकाशाची गरज असते. एका कोंबडीला दोन watt ऊर्जा लागते. दर 35 दिवसांनी लासोटा नावाची लस देणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये उष्णताचा तणाव पक्षावर येऊ नये म्हणून विटामिन सी च्या पावडर किंवा गोळ्या कोंबड्यांना द्याव्या. चिंच लिंबू संत्री याचे रस करून ठेवले तरी चालेल.

अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या पोल्ट्रिला विजिट केली.
ब्रॉयलर पक्षी
ब्रॉयलर पक्ष्यांचे खाद्य
पक्षांचे वय | खाद्य प्रकार | 50 kg चे पोत किती रुपयाला आहे |
0 ते 7 | फ्री स्टार्टर | 50kg 2250 रुपये |
7 ते 21 | स्टार्टर | 50kg 1750 रुपये |
22 ते 42 | फिनिशर | 50kg 1850 रुपये |
लसीकरण वेळापत्रक:
पक्षाचे वय | घ्यावयाची लस | औषधाचे नाव | प्रमाण पद्धती |
पहिला दिवस | मरेक्स (हॅचरीत देतात) | ग्लुकोज पावडर | पंधरा ते वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून |
दुसरा दिवस | टेट्रासायक्लिन | 1 ते 2 ml | |
तिसरा दिवस | बी कॉम्प्लेक्स | एक लिटर पाण्यातून | |
चौथा दिवस | वाई मेरोल | 10 ml शंभर पक्षी | |
पाचवा दिवस | वाई मेरोल | 5 ml शंभर पक्षी | |
सातवा दिवस | लासोटा | एक थेंब डोळ्यातून देणे | |
10 दिवस | चोची कापणे | गुळ पाणी | दहा ग्रॅम एक लिटर पाण्यात |
12 दिवस | गंबोरा लस | एक थेंब डोळ्यातून देणे | |
13 दिवस | प्रोटन (लिव्हर टॉनिक) | 10ml 100 पक्षी | |
14 दिवस | लासोटा बूस्टर डोस. | ही लस पाण्यातून देणे. दूध पावडर व थंड पाणी पाण्यात मिक्स करून देणे. |
पक्षी आल्यानंतर आठ ते दहा दिवस पक्षांना उष्णता व उजळ देणे गरजेचे आहे. क उन्हच्या वेळेत रस्ते होऊ नये व लसीकरण करताना पाण्यात मेडीक्लोरे टाकू नये. एक महिन्यानंतर दोन आठवड्यातून तीन दिवस पक्षांना लिव्हर टॉनिक 15 एम एल प्रति 100 पक्षी या प्रमाणात देणे व एकदा चोच कापणे.
पक्षी शेडमध्ये येण्याच्या आधी:
शेड स्वच्छ धुऊन घेणे. वाईट वॉश चुना लावणे. पोर्टर शेडमध्ये एका घमेल्यात एक केजी ब्लिचिंग पावडर घेणे. सर्व साहित्य व्यवस्थित लावून घेणे. कोंबड्यांचे खाद्य टाकून ठेवणे. पाण्याची व्यवस्था करणे.
पक्षी शेडमध्ये आणताना
मोरॅक्स दिली गेली आहे ह्याची खात्री करणे. पक्षी आणण्याच्या अगोदर किमान दोन तास आधी विजेचे दिवे पेटवून ठेवावे आणि शेडमध्ये 96 ते 98 डिग्री सेल्सियस तापमान तयार करावे. चिक फीड आणि COCCIDIOSTATS आणून ठेवणे. गुरुकुल वाटर आणि विटामिन ए सोल्युशन ठेवणे. पहिले दोन दिवस खाद्य पेपरवर देणे. (दोन दिवसानंतर चेक फिडर). पाचव्य किंवा दहाव्या दिवशी लासोटा लस देणे. (नाकात किंवा डोळ्यात). दहाव्या किंवा बाराव्या दिवशी गंबोरा लस देणे. (नाकात किंवा डोळ्यात).

ब्रॉयलर पोल्ट्री लां विजीट केली.

कोबड्यांना बीएसएफ अळी खाद्य वजन करून देताना.
24) शिमला मिरची पीक लागवडीचा खर्च
केलेले काम | केलेल्या कामाचे खर्च |
रोपे 200×3 | 600 |
ह्युमिक ऍसिड | 225 |
19:19 | 240 |
M-45 | 135 |
AREVA THIAMETHOXAM | 216 |
QUANTIS (अमिनो ऍसिड आणि nutrients) | 199 |
recover | 395 |
Deltron | 245 |
reward (GA) | 175 |
retive | 168 |
agronil | 325 |
actara | 80 |
GI tar | 654 |
दोरी | 150 |
neemoil | 400 |
hamala | 110 |
0:52:34/2kg/230 | 520 |
0:0:50/2kg/155 | 310 |
4 मावशी 2 तास 2 दिवस काम केले | 544 |
राजाभाऊ | 800 |
एकूण आलेला खर्च | 6491 |
एकूण 93 केजी सिमला मिरची निघाली.1कीलो सिमला मिरची तीस रुपये दर.तर ऐकून शिमला मिरची=93×30=2970
25) Mobile app
Plantix App
वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.
झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.

.