- माती परीक्षण
उद्देश:- माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठी
चे घटक जानुन घेणे.
1) माती घेताना मी झिगजाग पद्धतीने घेतली.
2) माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला
3) PH-7.0
त्यानंतर नत्र चेक केला.
4) नत्र N -295 भेटला.
5) पूरत P-35
6) पालाश K – 370
2.प्रॅक्टिकलचे नाव :बीज प्रक्रिया
उद्देश :बियाणे सुरक्षित कीटकांपासून सुरक्षित ठेवणे .
साहित्य :सर्व साधण्याच्या बिया त्याला लावण्यासाठी
कीटकनाशक मीठ हळद इत्यादी .कृती :सर्वात आधी जाड मोठे
दाणे वेगळी काढायचे साल गूळ पाणी बुरशी नाशक
कीटकनाशक पावडर लावणे .तसेच मीठ टाकायचे नंतर ते एका
पिशवीमध्ये भरून ठेवायचे .काळजी :कीटकनाशक बुरशी नाशक
पावडर लावताना काळजी ध्यायची हात मोचे वकाम झाल्यानंतर
हात स्वच्छ धुवावे .फायदे :पिकांना किड लागत नाही .पीक
चांगल्या प्रकारे येते . तर उत्पन चांगल्या प्रमाणात भेटू शकेल.
२)द्रव बियाणे उपचार:बुरशी नाशक लेप लावणे किंवा द्रावण
कीटकनाशक लावणे .
3.प्रक्टीकल :- Clean milking of animal
1) गाईना रोज धुवणे.
2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी
धुवावे.
3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.
4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात
करावी.
5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे.
4.प्रॅक्टिकल :-झाडांचे कलम तयार करणे.
खोड कापणे:-
मूळ कापणे:-
झाड कलम करत असताना किती उंचावर कट करावे.:-
झाड कलम करत असताना कापण्या ची उंची 15 सेंटिमीटर वर
कट करावे. कलम करत असताना ने झाड विकट मध्ये कापावे.
Root: मुळापासून दुसरे झाड तयार करणे. उदाहरणात हरळी,
अशा झाडांपासून तयार झालेले झाड कलम करत असताना 2.5
सेंटीमीटर वर कापावे प्लास्टिक नेम बांधून घेणे.
पानांपासून नवीन रोप तयार करण्याची पद्धत:-उदाहरणार्थ ,
पानफुटी ,कोरफड
I.T सेफ मध्ये झाड कापावे. झाडाची फांदी ची सालं काढून कोंब
आलेले रोप फांदी मध्ये ठेवून प्लास्टिक ने बांधून घेणे.
5.प्रॅक्टिकल :-पिकांवर कीड अभ्यास करणे.
उद्देश:-पिकांवर व कानावर रोग पडतत या चा अभ्यास करणे.
साहित्य;-पंप, स्टिकर, औषधे ,इत्यादी.
फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस.
१) फंगस हा रोग पिकांवर पडतो. हा रोग हवेत पासून होतो
फंगस हा रोग पिकांवर पडतो. हा रोग हवेत पासून होतोक व
पानकिडतात. किंवा पानावर काळे डाग पडतात.
२) बॅक्टरिया:-रोगपाण्यापासून होतं असतं आपल्या रोपांवर किंवा
पिकांवर होतं.३) वायरस:-हा रोग आपल्या रूपाला जमिनी
पासून येत असतं व आपल्या जमिनी मध्ये घटक कोणता कमी
किंवा जास्त आहे झाडांची पानं किंवा पिकांवर दिसून येते.
आपल्या झाडांमध्ये एखादा घटककमी व जास्त असल्यास काय
परिणाम होतो:-मॅग्नेशियम:-झाडाचे पान पिवळे पडतं. पण
पानांच्या शिरा हिरव्या असतात. जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमी
असल्यास झाडांवर रोग होते.:-ग्रीस सूट:-ऊस उगवत नाही.
उसाचे रोप किंवा बियाणे चांगलं होत नाही. रूट:-झाडांची मुळे
कुजतात व काळे पडतात त्यामुळे झाड मरुन जाते.
कॅल्शियम:-झाडांची पानं कडेला पिवळी पडतात त्या झाडांमध्ये
कॅल्शियम यांचा प्रमाण कमी आहे.
भुयमुं गावरपडणारा रोग:-
पाणी जास्त झाल्यास पिवळे पान पडतात फास्फो रस फुलंचांगले
येत नाही .
कीड:-ही कीड आपल्या फुलांवर किंवा फळांवर पडली असेल तर
फुलं चांगले येत नाही व फळांमध्ये बॅक्टेरिया असते.
6.पिकाला पाणी देण्याच्या पद्धती
पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .
१) तुषार सिंचनसाहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .
कृती :-१) सर्व पाईप पसरवणे.
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं.
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं.
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली
नंतर मोटार चालू केली .
काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .
२) ठिबक सिंचनसाहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन ,
सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक .
कृती:१) मेण पाईप टाकली२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या
साह्याने जोडून घ्यावे .३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .४)
स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .५) मोटार चालू करण्याचे
आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक
करा .
काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .३) पाठ पाणी
देणेसाहित्य :- फावडेकृतीफावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग
मोकळा करावा .प्रत्येक झाडाला पाणी भिलते कि नाही त्याची
काळजी घावी .
तोटा;१) पाणी जास्त वाया जाते२) खात द्यायला अडचण होते३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही….
7.आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे.
उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे.
साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71
. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने
तन . काढणे. 4} कागद हातरणे
कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो.
. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.फायदे; 1} रासायनीक पद्धत- • कमी कष्ट. • वेळेची बचत. 2}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले येते
8. अंदाजे वजन काढणे.
उद्देश :- प्राण्यांचे अंदाजे वजन काढण्यास शिकणे.
साहित्य :- मिटरटेप , वजन काटा
कृती :- वजन काढण्याच्या दोन पद्धती पाहिल्या
1.वजन काटा :- प्रत्येक शेळीला एक एक करून वजन काट्यावर
ठेवून काढले. त्यामध्ये शेळ्यांचे वजन, करडांचे वजन व
आफ्रिकन बोरचे वजन काढले.
2.सूत्र :- मीटर टेपच्या मदतीने गाईच्या पुढच्या पायापासून ते
शेपटीपर्यंत गाईची लांबी मोजली. मग गाईच्या छातीचा घेरा
मोजला. व सूत्राच्या मदतीने गाईचे अंदाजे वजन काढले.
सूत्र :- 1) वजन = छातीचा घेरा × लांबी ÷ Y
2) वजन = छातीच्या घेऱ्याचा वर्ग × लांबी ÷ 666
9.शेतीच्या मोजमापकांचा अभ्यास करणे.
उद्देश :- शेतीच्या मोजमापकांचा अभ्यास करण्यास शिकणे .
साहित्य :- मीटरटेप
1) 100 m = 328 ft. 1inch
2) 700 Ft. = 213.36 m
3) 1गुंठा = 33*33 = 1089 sq. ft.
4) 40 गुंठे = 1 एकर
5) 1 एकर = 43560 sq. ft.
6) 2.5 एकर = 1 हेक्टर
7) 1 हेक्टर = 108900 sq. ft.
10.पिक लागवडीसाठी जमीन तयार करणे.
उद्देश :- पिक लागवडीसाठी जमीन तयार करण्यास शिकणे .
साहित्य :- मिटरटेप , फावडा , कोळप
कृती ;- 1) जमीन निश्चित करणे
2) जमीन स्वच्छ करणे .( दगड , प्लॅस्टिक , गवत )
3) शेताची फणपाळी करून जमीन समतोल करणे .
4) पिकाच्या प्रकारानुसार सरी , सऱ्या , गादी , वाफे , बेड तयार करणे .
5) पाणी देण्याची सोय करणे ( पाट , तुषार सिंचन , ठिबक सिंचन )
1 ओळ = 72 फुट 1 ओळ = 2160 सेमी .
2 बियांमधील अंतर = 20 सेमी .एक ओळीतील बियांची संख्या = 2160 सेमी ./ 20 =108 बियातर 15 ओळीतील बिया = 108 * 15 = 1620 बिया
11.कीड लागलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे.
उद्देश :- पानांवरच्या किडी ओळखण्यास शिकणे.
वांगी :- लक्षण — फळाला होल पडले आहे, फळ कापल्यावर अळी दिसत आहे.
किड :- फळ पोखरणारी अळी
यासाठी आम्ही पेरूची, मिरची, वांगी, मका, चवळी, पालक, यांचे नमुने आणून बघितले व त्यावरच्या अळी व रोग पहिले.
पान पालक :- पानावर पांढरे चट्टे व खडबडीत होते. म्हणजे या पानावर रस शोषण करणाऱ्या अळी होत्या.
rs शोषण करणाऱ्या किडी :- या प्रकारच्या किडी पानांवर बसून मधील रस शोसून घेतात. रस शोषलेला भाग खडबडीत किव्हा चेहऱ्यावर घामोळ्या आल्यासारख्या दिसतो. उदा., तुडतुडे, मावा, पांढरी माशी, कोळीपेरूची पान :- चांगले पाने ही दोन्ही साईडून प्लेन दिसले व खडबडीत नव्हते. खराब पाने त्यावर दोन्ही साईडून खडबडीत होते व पांढरे टिपके होते त्या पांढऱ्या ठिपक्यांना लोकरी मावा रोग म्हणतात. त्या पानांना हा रोग झाला होता.
सुभाबळ :- ही पाने मागे चिकट झाली होती यात चिकट साधा मावा हा रस शोषणारी किड होती त्यावर ही अळी होती.अनुभव :- पांनावरील किडी ओळखण्यास व त्यावरील रोग ओळखण्यास शिकलो. या किडी पांनावर होल पाडतात. व फळांवर सुद्धा पांढरे व काळे ठिपके असले तर मावा रोग असतो.
12.फवारणीचे द्रावण तयार करणे.
उद्देश :- फवारणीचे द्रावण तयार करण्यास व त्याचे प्रमाण ओळखण्यास व द्रावण बनवण्यास शिकणे.
साहित्य :- पंप, औषध, पाणी, मास्क, हॅन्डग्लोज
कृती :-
सर्वप्रथम पंप भरपूर पाण्याने धुतला.नंतर नोझल साफ करून पाणी व्यवस्थित फवारते का ते चेक केले.नंतर 3 लिटर पाण्यात निम ऑइल Azadriachin हे औषध 30 ml टाकले. व त्यामध्ये मायक्रो न्यूट्रिन ही powder टाकली 25 gm.पंपात 15 लिटर पाणी भरले. व मास्क घातला.व पेरूच्या बागेला खालच्या प्लॉटला, चवळीला, मिरची, वांगी यांना फवारणी केली.जास्त उन्हात फवारणी केल्याने उपयोग होत नाही.प्रमाण :- 1लिटरला 2ml निम ऑइल ( Azadriachin )15 लिटर पाण्यामध्ये 25 gm ( मायक्रो न्यूट्रिन powder )हे द्रावण पेरूच्या झाडांना फवारले होते. कारण त्यांना लोकरी मावा किड व रोग असल्यामुळे फवारले.चवळीच्या पांनावर काळे ठिपके होते. म्हणजे त्या पानांना काळा मावा हा रोग होता व त्यावर पाने पोखरणारी अळी लागली होती. म्हणून त्यावर निम ऑइल या औषधाचे द्रावण करून फवारणी केली होती.
13. प्राण्यांचे तापमान चेक करणे.
उद्देश :- प्राण्यांचे तापमान चेक करण्यास शिकणे.
साहित्य :- थर्मामीटर
कोणत्याही प्राण्यांचे body tempretere normal 102° च्या कमी असते. जर 102° पेक्षा जास्त असेल तर त्या प्राण्याला ताप असतो.
ताप आला कि नाही हे आपण प्राणी खात आहे कि नाही यावरूनही पाहू शकतो. आम्ही येथील गाईचे तापमान चेक केले.
गौरी — 100.6°
सोनम — 100.9°
मोठी काळी शेळी — 101.9°
छोटी काळी शेळी — 102.1°