🌿 गुटी कलमप्रस्तावना :गुटी कलम ही वनस्पतींची एक महत्त्वाची वनस्पतीजन्य पुनरुत्पादन पद्धत आहे. या पद्धतीत झाडाची फांदी न तोडता त्यावरच मुळे निर्माण करून नवीन रोप तयार केले जाते. ही पद्धत बागकाम व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.


गुटी कलम ही एक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने झाडांची वाढ करणारी तंत्रज्ञान पद्धत आहे. यामुळे नवीन रोप मूळ झाडासारखेच गुणधर्म राखते आणि लवकर वाढते. त्यामुळे ही पद्धत शेती व बागकामासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

2. उद्देश :झाडांची संख्या वाढवणेचांगल्या दर्जाच्या झाडांचे गुण जसेच्या तसे ठेवणेकमी वेळेत व कमी खर्चात नवीन रोपे तयार करणे

साहित्यनिरोगी झाडाची फांदीधारदार सुरी/ब्लेडओलसर माती किंवा स्फॅग्नम मॉसप्लास्टिक शीट किंवा पॉलिथीनदोरी किंवा धागापाणी

प्रक्रिया:प्रथम झाडाची निरोगी व मध्यम जाडीची फांदी निवडावी.त्या फांदीवर 1–2 इंचाचा साल काढून गोलाकार कट करावा.त्या जागेवर ओलसर माती किंवा मॉस लावावा.त्यावर प्लास्टिक शीट लावून दोरीने घट्ट बांधावे.ओलावा टिकवण्यासाठी वेळोवेळी पाणी द्यावे.काही दिवसांनी त्या ठिकाणी मुळे तयार होतात.मुळे तयार झाल्यावर ती फांदी कापून जमिनीत लावावी.

निरीक्षण :3–6 आठवड्यांत मुळे तयार होतातमुळे पांढऱ्या रंगाची दिसतातनवीन रोप जमिनीत लावल्यानंतर वाढ सुरू होते

6. निष्कर्ष :गुटी कलम ही एक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने झाडांची वाढ करणारी तंत्रज्ञान पद्धत आहे. यामुळे नवीन रोप मूळ झाडासारखेच गुणधर्म राखते आणि लवकर वाढते. त्यामुळे ही पद्धत शेती व बागकामासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

कृती

NURSERY

1) प्रस्तावना

आम्ही १५ दिवस आश्रमशाळेच्या कृषी विभागात प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामध्ये आम्ही विविध प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांची वाढ, काळजी याबद्दल शिकलो. तसेच आम्ही गुड्डी कलम, पाचट कलम यांसारख्या कलम करण्याच्या पद्धती प्रत्यक्ष करून पाहिल्या. याखेरीज आम्ही नर्सरी प्रोजेक्ट घेतला ज्यामध्ये नर्सरी स्थापन करण्यासाठी जागा निवडणे, साफसफाई करणे, रोपे गोळा करणे, त्यांचे संवर्धन व विक्री प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

2) उद्देश

  • विद्यार्थ्यांना विविध झाडांची ओळख व माहिती मिळावी.
  • झाडांचे कलम करण्याच्या पद्धती (गुड्डी व पाचट कलम) शिकणे.
  • नर्सरी प्रोजेक्टद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेणे.
  • रोपे लावणे, त्यांची निगा राखणे व विक्री प्रक्रिया समजून घेणे.
  • कृषी क्षेत्रातील मूलभूत कौशल्ये विकसित करणे.

3) कृती

  • कृषी विभागातील विविध झाडांचे निरीक्षण व माहिती संकलन.
  • गुड्डी कलम व पाचट कलम प्रत्यक्ष करून पाहणे.
  • नर्सरी प्रोजेक्टसाठी जागेची निवड व परिसराची स्वच्छता करणे.
  • गावातून विविध प्रकारची रोपे आणून नर्सरीमध्ये लावणे.
  • रोपांची देखभाल – पाणी देणे, तण काढणे, खत देणे इ.
  • रोपे कशी विकायची, त्यासाठी तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण.

4) निरीक्षक

  1. वेगवेगळ्या झाडांची वाढ व त्यांचे देखभाल पद्धती समजल्या.
  2. कलम करताना काळजी घेण्याच्या गोष्टी जाणून आल्या.
  3. योग्य जागा व माती असल्यास रोपे चांगली वाढतात हे दिसून आले.
  4. नर्सरीमध्ये स्वच्छता व नियमित पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे.
  5. बाजारात रोपांची विक्री करताना आकार, गुणवत्ता आणि मागणी यांचा विचार करावा लागतो.

5) निष्कर्ष

१५ दिवसांच्या प्रशिक्षणातून आम्हाला कृषी विषयक प्रत्यक्ष अनुभव मिळाला. झाडांची माहिती, कलम करण्याचे कौशल्य, नर्सरी व्यवस्थापन आणि विक्री पद्धती याबद्दल आम्ही practically शिकलो. या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्राबद्दलची आवड वाढली तसेच भविष्यात नर्सरी व्यवसाय किंवा शेतीसंबंधी उपक्रम करण्याचा आत्मविश्वास मिळाला.

झाड लावणे प्रकल्प

1) प्रस्तावना

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत. झाडांमुळे शुद्ध हवा, सावली, फळे आणि नैसर्गिक सौंदर्य मिळते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे.

2) उद्देश

  • पर्यावरणाचे संरक्षण करणे.
  • परिसर हिरवागार व सुंदर बनवणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे.
  • प्रदूषण कमी करून स्वच्छ वातावरण निर्माण करणे.

3) कृती

  • शाळा व परिसरात झाडे लावण्यासाठी जागेची निवड केली.
  • विविध प्रकारची रोपे गोळा केली.
  • विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून रोपांची लागवड केली.
  • रोपांना नियमित पाणी देणे व त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी निश्चित केली.

4) निरीक्षण

  • लावलेल्या रोपांची वाढ चांगली होत असल्याचे दिसून आले.
  • विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाबद्दल उत्साह वाढला.
  • परिसर अधिक स्वच्छ व हिरवागार दिसू लागला.
  • पक्षी व इतर जीवांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.

5) निष्कर्ष

झाड लावणे हा पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी मार्ग आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश या प्रकल्पातून सर्वांना मिळाला.