शेळी पालनाचे महत्त्व

कमी गुंतवणूक – शेळीपालन सुरू करण्यासाठी इतर पशुपालनाच्या तुलनेत कमी भांडवल लागते.

चांगले उत्पन्न – शेळीचे दूध, मांस आणि शेळ्यांची विक्री यांमधून नियमित उत्पन्न मिळू शकते.

कमी जागेत पालन – शेळ्या कमी जागेतही सहज पाळता येतात.

जलद प्रजनन – शेळ्या लवकर प्रजनन करतात, त्यामुळे कळपाची संख्या लवकर वाढते.

पौष्टिक दूध – शेळीचे दूध पचायला हलके असून पौष्टिक मानले जाते.रोजगार निर्मिती – ग्रामीण युवक, महिला आणि शेतकऱ्यांसाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होते.

शेणाचा उपयोग – शेळीचे शेण सेंद्रिय खत म्हणून शेतीत उपयोगी पडते.

दुष्काळी भागासाठी योग्य – शेळ्या विविध प्रकारचा चारा खाऊ शकतात, त्यामुळे कमी चारा उपलब्ध असलेल्या भागातही त्यांचे पालन शक्य असते.

शेळीच् जाती

1.उस्मानाबादी (Osmanabadi)महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय जात.मांस व दूध दोन्हीसाठी उपयुक्त.रोगप्रतिकारक क्षमता चांगली.

सिरोही (Sirohi)राजस्थानातील जात.मांस उत्पादनासाठी उत्कृष्ट.उष्ण व कोरड्या हवामानात चांगली वाढते.

जमुनापारी (Jamunapari)भारतातील मोठ्या आकाराची जात.दूध उत्पादन जास्त.मांसासाठीही चांगली.

बीटल (Beetal)पंजाबातील जात.दूध आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त.शरीरयष्टी मोठी.

ब्लॅक बंगाल (Black Bengal)पश्चिम बंगालमधील जात.मांसाची गुणवत्ता उत्कृष्ट.लवकर प्रजनन करते.

बोअर (Boer)दक्षिण आफ्रिकेतील मांसासाठी प्रसिद्ध जात.वजन जलद वाढते.व्यावसायिक शेळीपालनासाठी वापरली जाते.

शेळींचे वजनावरून खाद्य.