1. शेळी पालन
    शेळी पालन प्रामुख्याने उद्देशानुसार तीन प्रमुख प्रकार पडतात. आपल्या गरजेनुसार योग्य पद्धत निवडावी.
    1) व्यावसायिक शेळीपालन
    शेळ्यांचे वजन वेगाने वाढवून विक्री करणे हा मुख्य उद्देश असतो.
    यासाठी चांगल्या जातीची शेळी आणि योग्य आहार आवश्यक असतो.
    2) अर्ध-व्यावसायिक शेळीपालन
    शेळ्यांना दिवसातील काही वेळ चरण्यास सोडले जाते.
    उर्वरित वेळ गोठ्यात ठेवून पूरक आहार दिला जातो.
    3) मुक्त संचार पद्धत
    या पारंपरिक पद्धतीत शेळ्यांना दिवसभर रानात किंवा कुरणावर चरायला नेले जाते.
  2. शेळ्यांच्या जातींची निवड
    शेळीपालनासाठी योग्य जातीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
    प्रमुख जाती
    उस्मानाबादी
    सांगमनेरी
    जमुनापरी
    सिरोही
    कोकण कन्याळ
    बोअर शेळी
    सोजात शेळी
    जाती निवड करताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे
    उद्देश – दूध किंवा मांस उत्पादन.
    वय – मध्यम वयाची, निरोगी शेळी निवडावी.
    हवामान – आपल्या भागातील हवामानास अनुरूप जात निवडावी.
    प्रजनन क्षमता – वेळेवर पिल्ले देणारी जात निवडावी.
    बाजारपेठ – स्थानिक बाजारात मागणी असलेली जात निवडावी.
  3. शेळ्यांसाठी जागेची आवश्यकता
    शेळीचा प्रकार
    बांधण्यासाठी जागा
    मोकळ्या फिरण्यासाठी जागा
    मोठी शेळी
    10 ते 12 चौ. फूट
    20 ते 25 चौ. फूट
    नर (बोकड)
    15 ते 20 चौ. फूट
    30 ते 40 चौ. फूट
    पिल्ले
    5 चौ. फूट
    8 ते 10 चौ. फूट
    गाभण शेळी
    15 ते 20 चौ. फूट
    30 चौ. फूट
  4. शेळ्यांचे आजार व लसीकरण
    रोगाचे नाव
    लसीकरण महिना
    मात्रा
    पुनरावृत्ती
    पी.पी.आर.
    जानेवारी–फेब्रुवारी
    1 मि.ली.
    दर वर्षी एकदा
    लाळ्या-खुरकूत
    मार्च–एप्रिल
    5 मि.ली.
    दर 6 महिन्यांनी
    घटसर्प
    मे–जून
    5 मि.ली.
    वर्षातून एकदा
    फऱ्या
    मे–जून
    5 मि.ली.
    वर्षातून एकदा
    एन्टेरोटॉक्सिमिया
    जून–जुलै
    2 मि.ली.
    वर्षातून एकदा
    रेबीज
    आवश्यकतेनुसार
    0.5 मि.ली.
    वर्षातून एकदा
  5. शेळीचे वजन घेणे
    शेळीचे वजन दर महिन्याला करावे. वजनानुसार आहारात बदल करता येतो.
    वजन घेण्यासाठी वजनकाटा किंवा वेट टेप (Weighing Tape) वापरावी.