बांधणी :
योग्य जागेची निवड करून उत्तर-दक्षिण दिशेने बेड तयार करावे.
ड्रिप किंवा पाईप सिंचनाची व्यवस्था करून वायू खेळती ठेवावी.
पॉलीहाऊस संबंधित प्रमुख पिके :
काकडी
टोमॅटो
वांगी
स्ट्रॉबेरी
गुलाब
जर्बेरा
कार्नेशन
जरबेरा
ऑर्किड
अँथुरियम
खत व अन्न व्यवस्थापन :
माती व पाण्याची तपासणी करावी.
पिकाच्या अवस्थेनुसार खतांचा वापर करावा.
NPK, मायक्रोन्यूट्रिएंट्स व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
पिकाच्या गरजेनुसार खतांचा वापर करावा.
EC व pH तपासणी नियमित करावी.
दररोजची कामे :
तापमान व आर्द्रता नोंद करणे.
ठिबक प्रणाली तपासणे.
कीड-रोग निरीक्षण.
सुकलेली पाने काढणे..
आवश्यकतेनुसार खत व पाणी देणे.
वायुवीजन व स्वच्छता राखणे.
२) दुसऱ्या पानावरील मजकूर
पॉलीहाऊस म्हणजे काय?
पॉलीहाऊस म्हणजे पिकांसाठी आवश्यक वातावरण तयार करण्यासाठी वापरले जाणारे संरक्षित घर. यामध्ये पिकांना आवश्यक तापमान, आर्द्रता, प्रकाश व पाण्याचे व्यवस्थापन करता येते.
पॉलीहाऊसचे प्रकार :
नैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊस.
फॅन-पॅड (कूलिंग सिस्टीम) पॉलीहाऊस
हायड्रोपोनिक्स
शेडनेट हाऊस
इनसेक्ट नेट हाऊस
फायदे :
वर्षभर उत्पादन
हवामानापासून संरक्षण
पाणी व खतांची बचत
अधिक उत्पादन व दर्जेदार माल
नियंत्रित वातावरण
कीड-रोगांपासून संरक्षण
तोटे :
प्रारंभिक गुंतवणूक जास्त
तांत्रिक ज्ञान आवश्यक
नियमित देखभाल आवश्यक
विजेवर अवलंबून राहावे लागते
वादळ किंवा गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते.


