बॅटरीच्या पाण्याचे घनत्व मोजणे

प्रस्तावना:

बॅटरीतील पाण्याचे (Electrolyte – आम्ल + पाणी) घनत्व मोजून बॅटरीची चार्ज स्थिती (State of Charge) कळते. घनत्व जास्त असेल तर बॅटरी पूर्ण चार्ज असते, आणि कमी असेल तर डिस्चार्ज असते.

उद्देश:

बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटचे घनत्व मोजून बॅटरीची स्थिती तपासणे.

साहित्य:

  • Hydrometer
  • लीड-अॅसिड बॅटरी (Lead Acid Battery)
  • रबर ग्लोव्हज व गॉगल
  • स्वच्छ कापड

कृती:

  1. प्रथम बॅटरीचे कॅप सावधपणे उघडा.
  2. Hydrometer इलेक्ट्रोलाइटमध्ये हलक्या हाताने बुडवा.
  3. बल्ब दाबून द्रव आत खेचा.
  4. फ्लोट (float) जिथे स्थिर राहतो ते वाचन (reading) घ्या.
  5. सर्व सेलचे वाचन स्वतंत्रपणे घ्या.
  6. काम झाल्यावर बॅटरीचे कॅप नीट बंद करा.

निरीक्षण

घनत्व (Gravity)बॅटरी स्थिती
1.260 – 1.280पूर्ण चार्ज
1.230 – 1.250अर्धी चार्ज
1.200 खालीडिस्चार्ज

निष्कर्ष:

घनत्व 1.260 ते 1.280 दरम्यान असल्यास बॅटरी पूर्ण चार्ज आहे.
जर घनत्व कमी असेल तर बॅटरीला चार्ज करणे आवश्यक आहे.

भविष्यातील योजना

  1. बॅटरीचे घनत्व दर महिन्याला Hydrometer ने तपासणे.
  2. घनत्व कमी आढळल्यास योग्य पद्धतीने बॅटरी चार्ज करणे.
  3. इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी असल्यास डिस्टिल्ड वॉटर (शुद्ध पाणी) भरून योग्य लेव्हल ठेवणे.
  4. सर्व सेलचे रीडिंग समान राहतील याची काळजी घेणे