282.9 |
1)नानकटाई तयार करणे .
साहित्य :-मैदा ,डाळदा ,पिठी साखर ,ट्रे ,तेल इ .
कृती :-1)सर्वप्रथम 200 ग्रॅम डाळदा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठी साखर 200 ग्रॅम चालून टाकली .
2)नंतर मग त्यात 250 ग्रॅम मैदा टाकला व फ्लेवरचा 1 थेंब टाकला .(लिंबू फ्लेवर )
3)व ते मिश्रण मळून घेतले . आणि साच्याने वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केल्या .
4)आणि ओव्हनमध्ये 150 c ते 180 c तापमानाला बेक केल्या .
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | मैदा | 250 ग्रॅम | 35 | 8.75 |
2) | डाळदा | 200 ग्रॅम | 46 | 9.2 |
3) | पिठी साखर | 200 ग्रॅम | 130 | 26 |
4) | ओव्हन चार्ज | 1 यूनिट | 10 | 10 |
5) | पॅकिंग बॉक्स | 1 | 5 | 5 |
2)पाव तयार करणे .
साहित्य :-मैदा ,यीस्ट ,मीठ ,तेल ,ब्रेड इम्प्रूवेअर ,गॅस,इ .
कृती :-1)सुरुवातीला 7 kg मैदा घेऊन ,यीस्ट व पाणी एकत्र करून ठेवले . मैदयात चवीनुसार मीठ घातले .
2)त्यानंतर ब्रेड इम्प्रूवेअर टाकले .यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले .
3)त्यानंतर ट्रेला तेल लाऊन घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी फुगवण्यासाठी ठेवले .
4)त्यानंतर ट्रे ऑव्हन मध्ये ठेवले . पाव बेक करण्यासाठी 250 c तापमानाच्यावरती तापमान सेट केले .
5)पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लाऊन घेतले व थंड झाल्यावर उलटे करून घेतले .
6)7 kg मैदापासून 210 पाव तयार केले .
कॉस्टिंग
अ क्र | मटेरियल | वजन | दर/किलो | किंमत |
1) | मैदा | 7.5 kg | 35 | 262.5 |
2) | यीस्ट | 200 ग्रॅम | 500 | 100 |
3) | मीठ | 100 ग्रॅम | 15 | 1.5 |
4) | ओव्हन चार्ज | 1 यूनिट | 10 | 10 |
5) | ब्रेड इम्प्रूवेअर | 20 ग्रॅम | 50 | 50 |
6) | तेल | 100 ml | 130 | 13 |
7) | मजुरी 25% | 109.25 | ||
एकूण | 546.25 |
3)मोरिंगा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .
कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .
2)त्यांचे मिश्रण करून घेतले .
3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .
4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेतला .
5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .
6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केले .
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 6 |
2) | गूळ | 300 ग्रॅम | 45 | 13.5 |
3) | तूप | 25 ग्रॅम | 620 | 15.5 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 4 बॉक्स | 5 | 20 |
6) | स्टिकर | 4 | 1 | 4 |
7) | जवस | 80 ग्रॅम | 80 | 6.4 |
8) | तीळ | 120 ग्रॅम | 120 | 14.4 |
9) | मोरिंगा पाऊडर | 20 ग्रॅम | 600 | 12 |
10) | मजुरी 25% | 23.52 | ||
एकूण | 117.62 |
4)शेंगदाणा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ ,साखर ,तेल ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,सूरी ,गॅस ,पॅकिंग बॉक्स इ .
कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .
2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला
3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .
5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले .
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 36 |
2) | गूळ | 280 ग्रॅम | 45 | 12.6 |
3) | तूप | 5 ग्रॅम | 620 | 3.1 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 2 बॉक्स | 10 | 10 |
6) | स्टीकर | 2 | 2 | 2 |
7) | मजुरी 25% | 15.19 | ||
एकूण | 81.19 |
5) टोस्ट तयार करणे .
साहित्य :मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर,साखर ,मीठ इ.
कृती :- 1)सर्वप्रथम 250kg मैदा घेतला .त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.
. 2)ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले .
. 3)मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले .
. 4)नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले .
. 5)आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक केले .
. 6)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले .
कॉस्टींग :-
6)अन्न टिकवण्याच्या पद्धती
1)नैसर्गिक पद्धती
1) वाळवणे :-पालेभाज्या फळे मासे
2) खारवणे /जास्त प्रमाणात साखर वापरणे
3) थंड करणे
4) गोठवणे
5) उकळवणे
6) हवाबंद डब्यात व बॅगेत ठेवणे
7) भाजणे
2)केमिकल पद्धती
1) सोडियम बेंजोएट
2) पोटॅशियम मेटा डाय सल्फेट
3) पेस्टिंग
* सोडियम बेनझाईट:- जॅम जेली सॉस इ
* पोटॅशियम मेटा बाय सल्फेट:- ज्यूस इ
* नैसर्गिक अन्न संरक्षक
1) तेल 2) मीठ 3) साखर, गुळ
4) विनेगर 5) लिंब
7)मोजमाप 1) kg=1000gm 2)5.9inch =172.5 3)1lit=1000ml 4)6.3inch = 187.5cm5)1m = 100cm 6)1inch=25cm7)1m= 3.3inch 8)1feet=30cm8)1feet=12inch
9)प्रथमोपचार
* प्रॅक्टिकल चे नाव:- प्रथमोपचार पेटी
उद्देश:- योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार कसे करावे हे समजून घेणे
* साहित्य:- प्रथमोपचार पेटी( बँडेज, कॉटन, सिल्लोडाईन,पेपर टेप,हॅन्ड ग्लोज)
* प्रथमोपचार:- एखाद्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी पहिली पायरी म्हणजे प्रथमोपचार जर प्रथम उपचार विषयी आपल्याला माहिती असेल तर अनेक अपघातग्रस्तांचे आपण प्राण वाचवू शकतो गंभीर अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी गडबड व गोंधळ उडालेला असतो अशावेळी डोकं शांत ठेवून पटकन कार्य करण्याची जरुरत असते जर मोठ्या प्रमाणावर रक्त स्त्रोत चालू असेल तर तो थांबवण्यासाठी प्रथम लक्ष द्यावे तो रक्त स्त्रोताची जागा फडक्याने दाबून ठेवावी सर्प दंश झाला असेल तर तर देहाच्या वरील भागात दोरीने घट्ट बांधावे काही वेळाने ती दोरी सोडून पुन्हा बांधावी त्या व्यक्तीस झोपू देऊ नये जर हृदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीस सर्वप्रथम मोकळ्या हवेत जिथे जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होईल अशा जागी न्यावे
10)अन्न आणि कॅलरीज
* प्रॅक्टिकल चे नाव= अन्न आणि कॅलरीज
* उद्देश= आपल्या शरीरातील वाहनातील कॅलरीत विषयी माहिती करून घेणे कॅलरीत प्रत्येकाला काम करण्यासाठी कशाची गरज असते आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जेचे किंवा एनर्जी गरज असते त्या एनर्जीला कॅलरीत म्हणतात आपण दररोज ज्यांना खातो त्यातून आपल्याला कॅलरीज मिळतात आपण दररोज जे पदार्थ खातो त्यातून आपल्याला प्रोटीन्स कार्बोहाइड्रेट व फॅट्स व विटामिन असे घटक शरीराला मिळतात
* प्रोटिन्स जास्त प्रमाणात असलेले पदार्थ=meat, chiken, fish, prawnsulmonds, cashew, legumel, beans, ets
* कार्बोहायड्रेट्स=sugar, candy, desserts, bread, cerad, pasta, fruits, juices, vegetables, wholegrains
* फॅट=chess, darkchodates, whole, eggs, olive, oil, peanuts, full fat dairy products, soyabean
11)तिळाची चिक्की बनवणे
* प्रॅक्टिकल चे नाव= तिळाची चिक्की
* साहित्य= तीळ, साखर, गॅस, कढई, ट्रे, चिक्की पावडर,लाटणे,पॅकिंग बॉक्स,डालडा,
* कृती= 1) सर्वात प्रथम सर्व साहित्य गोळा करून घेणे
2) त्यानंतर तीळ व साखर सम प्रमाणात वजन करून घेतले तीळ250gm व साखर250gm
3) नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला साखरेचा पाक करून घेतला
4) त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले
5) ट्रे व लाटणे व कटर तेल लावले
6) आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले
7) व चिक्की कटरने कापून व वजन केले
8) व पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग केल्या एकूण 500 ग्रॅम चिक्या बनल्या
12)पाणी परीक्षण करणे
* प्रॅक्टिकल चे नाव= पाणी परीक्षण
* साहित्य= वॉटर टेस्ट बॉटल-2 नोंदवही पेन- स्टेट पेपर
* कृती:-1) सुरुवातीला दोनwater test bottle घेतल्या
2) त्या दोन्ही बॉटल मध्ये किचन मधलं पाणी घेतलं आणि दुसऱ्या बॉटलमध्येdream house मधले पाणी घेतलं
3) व त्या दोन्ही बॉटलवर आजचे तारीख आणि वेळ मार्कर ने लिहिली
* निरीक्षण=1) एका बॉटलमध्ये किचनचे पाणी घेतले ते 48 तासानंतर काळे झाले त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नाही
2) दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रीम हाऊस मधले पाणी घेतले ते 48 तासानंतर पांढरेच राहिले त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य आहे
13)रक्तगट तपासणे
* प्रॅक्टिकल चे नाव= रक्तगट तपासणी
* साहित्य= लॅन सेट, स्पिरिट, कापूस,कॉटन, स्लाईड काचपट्टी
*कृती=1) सुरुवातीला उजव्या हाताची करंगळी शेजारील बोटाला स्पिरिट लावून निर्जंतुक करावे
2) लँडसेटच्या साह्याने टोचले
3) काचपट्टीवर रक्ताचे तीन थेंब घेतले
4) पहिल्या थेंबात anti=A दुसऱ्या थेंबात anti=B आणि तिसऱ्या थेंबात anti=दे
5) नंतर त्या थेंबांचे निरीक्षण केले
रक्तगटाचा शोध= डॉक्टर कार्ल ल्यानंदस्तीणार यांनी 1400 ते 1402मध्ये लावला
14)Ors तयार करणे
* प्रॅक्टिकल चे नाव:-ors तयार करणे
* साहित्य:- पाणीसाखर मीठ गॅस*
साधने:- चमचा ग्लास* कृती:-1) ते एक लिटर पाणी घेतले2) ते पाणी उकळून घेतले3) उकळलेले पाणी थंड करून घेतले4) त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीठ सहा चमच साखर टाकली5) आणि ते मिश्रण ढवळून घेतले6) अशाप्रकारेors तयार केले* फायदे:- जुलाब सारखे आजारांना दूर करू शकतो शरीरातील पाणी रिअयडरेशन मध्ये जिम करताना वापर
15)बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे
प्रॅक्टिकल चे नाव:- बाजरीच्या पिठाचे लाडू
* साहित्य:- बाजरीचे पीठ, गूळ, तीळ, जवस मगज बी,तूप, इलायची पावडर
* उद्देश:- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे
* साधने:- स्टिकर,पॅकिंग बॉक्स, मिक्सर
* कृती:- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले बाजरीचे पीठ= 400gm, गुळ=600gm मगज बी जवस तूप इलायची पावडर हे सर्व मिक्स करून त्याचे मिश्रण हाताने गोल करून लाडू तयार करणे
16)लिंबाचा सरबत तयार करणे
* प्रॅक्टिकल चे नाव:- लिंबाचा सरबत तयार करणे
* उद्देश:- सरबत तयार करण्यास शिकणे
* साहित्य:- लिंबू साखर पाणी मीठ
* साधने:- शेगडी टॉप लिंबातील रस काढण्याचे यंत्र
* कृती:- सर्वप्रथम आम्ही सहा किलो लिंबू घेतले त्यानंतर आम्ही लिंबूचे दोन फोडी करून कापले त्यानंतर आम्ही त्याचा रस काढला व नंतर आम्ही त्या रसाचे वजन करून घेतले त्यानंतर आम्ही एक पातेलं घेतलं त्यामध्ये आम्ही एक किलो साखर व दोन लिटर पाणी घेतले आणि नंतर त्याचा पाक तयार केला व त्या पाकात लिंबाचा रस टाकून आम्ही सरबत तयार केला *लिंबाच्या रसाचे शरीराला होणारे फायदे:- 1)पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबामध्ये भरपूर प्रमाणात c जीवनसत्व असतात2) रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सध्याच्या काळात प्रतिकारशक्ती वाढते खूप महत्त्वाचे आहे3) खाल्लेले अन्न पचायला लागते आणि सौच्याशी साफ होते
17)आवळा कॅन्डी
*प्रॅक्टिकल चे नाव:- आवळा कॅन्डी तयार करणे
* साहित्य:- आवळे हिंग साखर बरणी पाणी गॅस इलायची पावडर
* साधने:- पातेल* कृती:- सर्वप्रथम सहा किलो आवळे घेतले व ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले नंतर जावळ्यांचे सहा तुकडे करून घेतले आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले आणि एक बरणी घेतली त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम आवळे व साखर टाकली त्यानंतर पुन्हा व त्यावर आवळ्याचे तुकडे टाकले ती भरणे पूर्णपणे झाकून बंद करून ठेवली
18)आवळा सुपारी
* प्रॅक्टिकल चे नाव:- आवळा सुपारी तयार करणे
* साहित्य:- जिरे हिंग ओवा काळीमिरी साध्य मीठ काळे मीठ आवळा
* साधने:- मिक्सर पातेलं कलथा
*कृती:- सर्वप्रथम आम्ही पाच किलो आवळे घेतले त्यानंतर ते लहान लहान तुकडे मध्ये कापून घेतले व त्यानंतर त्याचं वजन करून घेतलं तर वजन भरलं चार किलो इतकं भरलं त्यानंतर हिंग ओवा जिरे काळीमिरी इत्यादी मिक्स केलेले साहित्य घेतले व ते मिक्स आवळ्यामध्ये टाकलं त्यामध्ये 350 ग्रॅम मीठ टाकून सर्व मिक्स केले आणि नंतर ड्रायरला आवळा सुपारी आणि आम्ही आवळा सुपारी तयार केली पोळ्याच्या फोडींना शंभर ग्रॅम साधे मीठ लावून ठेवावे व आवळ्याच्या पुढे व्यवस्थित मिक्स करून घेतले
19)चिंचेचा सॉस तयार करणे
* प्रॅक्टिकल चे नाव:- चिंचेचा सॉस तयार करणे
* साहित्य:- चिंचगूळ मिरची पावडर काळे मीठ गरम मसाला गॅस
* कृती:- सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले त्यानंतर चिंच साफ करून घेतली नंतर चिंच पाण्यात चांगली धुऊन घेतली व गरम पाण्यात चांगली उकळवली नंतर चिंचेच्या पाकामध्ये एक किलो 800 ग्राम इतके गुळ टाकले व ते मिश्रण करून घेतले त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्या मिश्रणात 25 ग्रॅम मिरची मसाला टाकले आणि ते मिश्रण करून घेतले ढवळून घेतले ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड करून किचनसाठी दिले
* निरीक्षण:- चिंचेचा सॉस घट्ट व चांगला झाला चवीला मस्त झाला
20)टोमॅटो सॉस तयार करणे
*प्रॅक्टिकल चे नाव:- टोमॅटो सॉस तयार करणे
* साहित्य:- टोमॅटो चार kg, 800gm पाणी,गॅस
* साधने:- फ्रुट फ्लावर* कृती:- सर्वप्रथम आम्ही लागणारे साहित्य गोळा केले टोमॅटो पाण्यात स्वच्छ धुऊन घेतले तर त्याचे वजन करून घेतल्यानंतर त्याचं वजन चार किलो 800 ग्राम एवढं झालं त्यानंतर आम्ही कुकरमध्ये टोमॅटो आणि पाणी उकळवून घेतले आणि नंतर थंड झाल्यावर त्याची साले काढून घेतली व नंतर ते मिक्सरमध्ये लहान करून घेतले नंतर त्याला आम्ही गाळून त्याचा सॉस तयार केला
* निरीक्षण:- चांगल्या प्रकारे टोमॅटो सॉस तयार झाला
21)पिझ्झा तयार करणे
.साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.
कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.कॉस्टिंग:-
निरीक्षण :-1)वेगवेगळ्या आकाराचे पिझ्झे तयार केले.2)पिझ्झा थोडा खारट होता .. 3)शाकाहारी पिझ्झा तयार केला .