1) मापन
मापनाच्या दोन पद्धती आहेत.
1) ब्रिटिश पद्धती : मैल,खंडी,इंच,फूट,कोस,डझन,नग,एकर,मन, शेअर,आठव,चिपट,तोळा,चाराने, पांड इत्यादी.
2) मॅट्रिक पद्धती : मिलि मीटर,मिलि लीटर,सेंटी मीटर,मीटर,किलो मीटर,ग्राम,किलो ग्राम, लीटर, मिलीलिटर इत्यादी.
1) 1फूट मंजे =12 इंच. 9) 1000 ग्राम मंजे =1kg
2) 1डझन मंजे=12 नग. 10) 3फूट मंजे =1मीटर
3) 1खंडी मंजे=20 नग. 11) 1फूट मंजे =30 cm
4) 1तोळा मंजे=10 ग्राम. 12) 1फूट मंजे=12 इंच
5) 1मीटर मंजे=100 cm. 13) 1फूट मंजे=300mm
6) 1मीटर मंजे=1000mm. 14) 1इंच मंजे=2.5cm
7) 1000 मीटर मंजे=1km. 15) 1 मन मंजे=40kg
8) 1000 मीली लिटर मंजे=1लिटर. 16 1खंडी मंजे=20
मापणाचे नियम:
1)मीटर चे रूपांतर सेंटिमीटर करताना 100 ने गुणने.
2)मीटर चे रूपांतर मिली मीटरमध्ये करताना1000 ने गुणने.
3)सेंटीमीटरचे रूपांतर मीटर मध्ये करताना 100 ने भागने.
4)इंचचे सेंटीमीटर करताना 2.5 ने गुणने.
5)मीटरचे फुटमध्ये करताना 3.3 ने गुणने.
6)फुटाचे मीटरमध्ये करताना 3.3 ने भगणे.
7)कीलोग्रामचे ग्राम करताना 1000 ने गुणने.
8)मिटरचे किलोमीटर करताना 1000 ने भागणे.
9) किलोमीटरचे मीटर करताना 1000 ने गुणने.
10) फुटाचे इंच करताना 12 ने गुणने.
11) इंचचे फुट करताना 12 ने भागणे.


कुठल्याही साहित्याचे मोजमाप करताना योग्य साहित्याचे आकार पाहून मोजमापाचे साधने वापरावे
2.मशीनिंची माहित
1) लेथ मशिन
लेथ माशीनिचे प्रकार
लेथ माशीनचे सहा प्रकार आहेत.
1) TURRET LATHE
2) CAPSTAN LATHE
3) TRACER /COPY LATHE
4) AUTOMATIC LATHE
5) CNC LETH
6) TOOL ROOM LETH
TOOL ROOM LETH हे वर्कशॉपमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडाचे जॉब कापण्यासाठी आणि तयार करण्यासाठी होतो.थ्रीडिंग पाडण्यासाठी, ड्रिलिंग करणे, चांपर, फेसिंग, बोरिंग, इत्यादी साठी उपयोगी पडते.या मशिनीची किंमत 1 लाख 20,000 पासून सुरू होते.

2) मिल्लिंग मशिन
मिल्लिंग मशिन मशीन वर्कशॉमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडी जॉब तयार करण्यासाठी केला जातो.या मशिन वर मी लाकडी जॉबला सर्फेस कलीनिंग केलो आहे.चावी गाळा आणि डिग्री मारली आहे.या मशनीची किंमत पर्यंत असते.


3) पॉवर एक्सा मशिन
सी ओ टू मशीन हे विद्युतधारावर चालते. याच्यामध्ये तांब्याची वायर असते याच्या साह्याने दोन वस्तूंना एकमेकांना जोडू शकतो. या मशीनमध्ये दोन वायर बाहेर निघतात एक म्हणजे वायरिंग गण आणि दुसरी म्हणजे अर्थींग. सी ओ टू वेल्डिंग करताना वायरिंग सोबत गॅस बाहेर निघते. या मशीनची वेल्डिंग खूप मजबूत आणि चांगली होते. सी ओ टू वेल्डिंग मशीन चा उपयोग उद्योगधंद्यामध्ये कारखान्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी गाड्यांचे पार्ट तयार होतात त्या ठिकाणी याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. हे वेल्डिंग आर्क वेल्डिंग पेक्षा खूप चांगली असते.
पॉवर, एक्सा मशिन हे वर्कशॉपमध्ये वापरले जाते याचा उपयोग लोखंड आणि लाकडी वस्तू कपण्यासाठी होतो.याची किंमत पासुन सुरू असते.

4) अर्क वेल्डिंग मशिम
अर्क वेल्डिंग चा वापर वर्कशॉपमध्ये केला जातो. अर्क वेल्डिंग हे दोन समान आणि असमान धातूंना योग्य तापमानाला वितळून एकमेकांना जॉइंट होते.याचा उपयोग लोखंडी वस्तूंना वेल्ड करण्यासाठी होतो.अर्क वेल्डिंगमध्ये धातूंना जोडण्यासाठी रॉड वापरावी लागते. या मशीनची किंमत पासून सुरू होते.

5) पाइप कटर मशीन
पाईप कटर मशीन ने लोखंडी स्केअर फुट पाईप एल अँगल सर्कल पाईप कटर मशीन हे सर्व लोखंडी वस्तू पाईप कटर मशीन वर कापता येते. लोखंडी पाईप या मशीनवर 45 अंशाचा कोणावर कापता येतो.

6) बेंच ग्राइंडर मशीन
बेंच ग्राइंडर मशीन हे वेल्डिंग घासण्यासाठी किंवा खुराडी यांना धार देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. एखादा पाईपचा भाग खडबड असेल तर त्याचा पृष्ट भाग प्लेन करता येतो. या मशीनची किंमत पासून सुरू होते

7) CO2 वेल्डिंग मशीन
CO2 वेल्डिंग मशीन दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर वितळून एकमेकांना जॉईंट करते . याचा उपयोग उद्योगधंद्यामध्ये कारखान्यांमध्ये आणि गाड्यांच्या पार्ट आणि ऑइल टँकी बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याची वेल्डिंग आर्क वेल्डिंग पेक्षा मजबूत असते. याच्यामध्ये कॉपरची तार असते तारेने वेल्डिंग करावे लागते.

8) स्पॉट वेल्डिंग
स्पॉट वेल्डिंग म्हणजे पातळ पत्रा, स्टील चे वस्तू पातळ लोखंडाची वस्तू यांना योग्य तापमानावर वितळून याची जोडणी करणे म्हणजे स्पॉट वेल्डिंग. ह्या मशीनचा उपयोग स्टील उद्योग धांद्यांमध्ये केला जातो.या माशिनीची किंमत पासुन सुरू होते.

3)आर्क वेल्डिंग मशीन
आर्क वेल्डिंग मशीन म्हणजे दोन समान किंवा असमान धातूंना एकत्र योग्य तापमानावर त्यांची जोडणी करणे म्हणजे अर्क वेल्डिंग होय.
हे मशीन विद्युतधारावर चालते.आर्क वेल्डिंग मशीन मध्ये फ्लक्स रॉड च्या साह्याने वेल्डिंग केली जाते. हे रॉड 2.5MM असते. ज्या वस्तूला वेल्डिंग करायचे आहे त्या वस्तूला अर्थिंग दिल्याशिवाय बिल्डिंग होत नाही. अर्क वेल्डिंग मशीन मधून दोन वायर बाहेर निघतात एक म्हणजे वेल्डिंग रोड पकडण्याची गण आणि दुसरी म्हणजे आर्थिंग वायर.अर्क वेल्डिंग करताना वेल्डिंग गन आणि ज्या वस्तूला वेल्डिंग करतो त्याच्यातील कोण हा दहा ते वीस अंशचा कोण असला पाहिजे तेव्हा त्याची वेल्डिंग खूप भारी होते.
आर्क वेल्डिंग करताना घ्यावयाची काळजी: 1) डोळ्यांवरती नेहमी काळा रंगाचा चष्मा वापरला पाहिजे.2) पायामध्ये सेफ्टी शूज असले पाहिजे.3) हातामध्ये हॅन्ड ग्लोज असले पाहिजे.4) वेल्डिंग केलेल्या वस्तूंना कधीही बिना हॅन्ड ग्लोज हात नाही लावायची.5) जेव्हा वेल्डिंग करताना वेल्डिंग रॉड मधून धुर निघतो ते धूर आपल्या डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर डोळ्यांना विजा होऊ शकते.
मी केलेले काही आर्क वेल्डिंग चे काम : 1) चप्पल स्टॅन्ड बनवले.
2) मेमोरियल हॉलचे खिडक्यांना पावसाचे पाणी आत मध्ये येऊ नये म्हणून फ्रेम तयार केले.




4)सी ओ टू वेल्डिंग
सी ओ टू वेल्डिंग म्हणजे दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर वितळून त्यांना एकमेकांना जुळवणे. सी ओ टू वेल्डिंग मशीनला दुसरे नाव म्हणजे गॅस वेल्डिंग आहे.
सी ओ टू वेल्डिंग करताना घ्यावयाची काळजी: 1) डोळ्यांवरती काळा चष्मा घातला पाहिजे.2) हातामध्ये हॅन्ड ग्लोज असली पाहिजे.3) पायामध्ये सेफ्टी शूज असले पाहिजे.4) सुरुवातीला मशीन चालू करण्याच्या आधी सर्व कलेक्शन पाहून घ्यावे. गॅसचा मीटर मध्ये जेवढा गॅस पाहिजे तेवढाच ठेवावा.
सी ओ टू वेल्डिंग चा उपयोग कारखान्यामध्ये मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये आणि गाड्यांचे पार्ट तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये याचा वापर करतात.
मी केलेल्या सी ओ टू वेल्डिंग चे काही कामे:1) वेल्डिंग टेबल ला हाईट देणे.2) जाळीची प्रेम तयार केली. 3) प्रोजेक्टचे वस्तूंना वेल्डिंग केला.



5) रंगकाम
रंगकाम म्हणजे एखाद्या भिंतीला किंवा एखाद्या लोखंड वस्तूला चांगलं दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी किंवा त्या वस्तूचे आयुष वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
रंगकाम करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रश, बकेट, रंग, पाणी, पॉलिश पेपर, थिनर, रोलर ब्रश.
रंगाचे प्रकार:1) प्रायमर 2) ऑइल पेंट 3) डीस्टेंबर
प्रायमर हा रंग सुरुवातीला मारला जातो कारण याच्या वरती दुसरा रंग चांगला आणि व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणजे. प्रायमर हा रंग पांढऱ्या कलरचा असतो. हा पांढरा कलर भिंतींसाठी मुख्यतो वापरला जातो.
लोखंडाला जो प्राइजवर दिला जातो त्याला रेड ऑक्साईड असे म्हटले जाते. हा रंग लोखंडाला ऑइल पेंट देण्याच्या अगोदर दिला जातो. रेडॉक्सिड दिल्यामुळे त्या लोखंडी वस्तूंची आयुष वाढते. यावर दिलेला ऑइल पेंट हा छान बसतो आणि छान दिसतो.
ऑइल पेंट हा रेड ऑक्साईड नंतर दिला जाणारा रंग आहे. हा रंग दिल्यामुळे लोखंडी वस्तूला लवकर गंज चढत नाही आणि तो खूप काळ टिकून राहतो. आणि दिसायला छान दिसतो.
डिस्टम्बर म्हणजे पांढरा कलर आहे. त्याचा उपयोग मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये सुरुवातीला त्याचा उपयोग केला जातो. भिंतीलाही याचा उपयोग केला जातो. डिस्टम्बर रंग हा दिसायला मस्त आणि स्वस्त भेटतो.
मी केलेल्या रंगाचे काही काम 1)इलेक्ट्रिकल लॅबला रंग देताना 2) कोटला आम्ही कॉम्प्रेसर मशीन वरती स्प्रे गन्ने रंग दिला.


6)प्लंबिंग
प्लंबिंग म्हणजे पाईपचे जोडणी करून घरात किंवा इमारतीमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी केला जातो.
प्लंबिंग साठी लागणारे साधने: 1) जी आय म्हणजे ( galonise iron), टेपलॉन टेप,सर्विस सॅडल, टॅंक निप्पल युनियन रेडूसर नॉन रिटर्न वॉल येलबो टी ब्रास सोलुशन एफ टी आणि एम टी एक्सा इत्यादी.
पाईपाचे प्रकार: 1) PVC (poly vinyl chloride) 2) UPVC (unplasticized poly vinyl chloride) 3) CPVC (Chlorinated poly vinyl chloride) 4) GI ( galonise iron)
आम्ही केलेले काही प्लंबिंग चे काम: 1) दोन टाक्क्यांना खंदून पाईपलाईन करूनb जोडणी केली.



7) विटांचे बांधकाम
विटांचे बांधकाम म्हणजे सिमेंट वाळू पाणी यांचे मिश्रण तयार करून विटा एकमेकांना जोडून त्यावर मिश्रण ओतून विटा एकमेकांना जोडणे म्हणजे विटांचे बांधकाम करणे होय.
बांधकाम करताना लागणारे साहित्य: खोऱ्या,कुदळ, मीटर टेप, सिमेंट, वाळू, क्रॅश सेंड, ओळंबा, लाईन दोरी, हातमोजे, मालं कालवण्याचे बूट, थापी, फक्की इत्यादी.
बांधकाम करताना विटांचे पाच प्रकारचे बोंड असतात :1) स्ट्रेचेर बोंड 2) इंग्लिश बोंड 3) फ्लेमिश बोंड 4) हेडर बोंड 5) राट्राप बोंड
बांधकाम करताना सिमेंट आणि वाळूचे प्रमाण एकास सहा (1:6)असते. म्हणजे सिमेंट एक टोपलं आणि वाळू सहा टोपली.
बांधकाम हे 9 इंच आणि 6 इंच असते.हे दोन्ही प्रकारचे बांधकाम केलं आहे.
आम्ही केलेले काही कामे 1) शेतातील होस्टेलचे बांधकाम 6 इंच केले.2) वर्कशॉप पाठीमागील बांधकाम 9 इंच केला.





8) R. C. C. कॉलम
आरसीसी कॉलम म्हणजे जास्त वजन पेलण्यासाठी वाळू काँक्रिट आणि सिमेंट यांचे मिश्रण तयार करून 12 इंची पाईपात मिश्रण भरून घेतले. मंजे आरसीसी कॉलम होय.
आरसीसी कॉलम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: मोठी खडी, सिमेंट, वाळू,ऑइल,बाइंडिंग वायर, सळई ,कॉलमचा साचा, टोपली.इत्यादी.
आरसीसी कॉलम तयार करताना मिश्रण पाईपामध्ये टाकून घेणे ते घेतल्यानंतर 24 तासानंतर पाईप उघडून घेणे.दररोज तीन वेळेस पाणी घालावे.
आम्ही आरसीसी काम तयार करतानाचे काही फोटो

9) पाया आखणी
पाया आखणी मंजे ऐका सरळ रेषेत रेश ओढून ते रेष खणून घेणे.त्यामध्ये विटा किंवा दगडी घालून त्यावर वाळूंचे आणि सिमेंट चे मिश्रण टाकने. असे केल्यामुळे भिंत सरळ आणि भिंत खचू नये म्हणून पाया आखणी करणे गरजेचे असते.
या साठी लागणारे साधने: पहार,कुदळ, खोऱ्या, ओळम्बा, सिमेंट आणि वाळू, मोठी खडी,लाईन दोरी, फकी, गुण्या,इत्यादि.
आम्ही सरळ दोरी लावून त्यावर फकी मारली आणि तीन मीटरवर एक खड्डा खंदून त्यामध्ये खांब रवून घेतले आणि खांबानभोवती सिमेंट आणि वाळूचे मिश्रण टाकून घेतले. ते खांब घट्ट बसून घेतले आणि खंतारांनी कुंपण करून घेतले


10) एफ आर पी
एफ आर पी म्हणजे (फायबर रेनफोर्सड प्लास्टिककिंवा पोलिमर).
याचा उपयोग आम्ही आईस्क्रीमच्या डब्याचे वेज बुजवण्यासाठी केला या डब्याचा उपयोग किचनमध्ये दही तयार करण्यासाठी केला जातो.
यासाठी लागलेले साहित्य: हार्डनर, कोबाल्ट, पिगमेंट, कातर, एफ आर पी, वॅक्स केमिकल, रेगजीनआणि ग्लास मेस्ट इत्यादी.
कृती:1) आईस्क्रीमच्या डब्याला पडलेले वेज पॉलिश पेपरने रफ करून घेतले.2) रफ केलेली जागा स्वच्छ करून घेतले.3) आतल्या बाजूने टेप लावून घेतला 4) सुरुवातीला रेगझिन 200 एम एल घेणे. त्यानंतर 100 ग्रॅम पुट्टी मिक्स करणे. 10 एम एल कोबाल्ट आणि हार्डनर 10 त्यामध्ये मिक्स करून मिश्रण तयार करणे.5) त्याच्यामध्ये ग्लास वेस्ट ची जाळी भरून घेणे.6) रेडमी चे तयार केलेले मिश्रण त्यावर ओतणे.6) 3 ते 6 तास त्याला उणा मध्ये सुकण्यासाठी ठेवले पाहिजे.
घ्यावयाची काळजी: रेगनिझ चे मिश्रण तयार करताना हाताला हात मोजे वापरणे.


11) लेथ मशीन

लेथ मशीन म्हणजे लोखंडी आणि लाकडी टूल्स यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या आकार देण्याचे कार्य लेथ मशीन करतो.
लेथ मशीन वर लोखंडाला आणि लाकडाला दिले जाणारे आकार: 1) चांपर, थ्रेडिंग, सरफेस क्लीन, ड्रिलिंगbआणि डीग्री इत्यादी कामे लेथ मशीन वर लाकडाला आणि लोखंडाला करता येतात.
लेथ माशीनिचे प्रकार
लेथ माशीनचे सहा प्रकार आहेत.
1) TURRET LATHE
2) CAPSTAN LATHE
3) TRACER /COPY LATHE
4) AUTOMATIC LATHE
5) CNC LETH
6) TOOL ROOM LETH
TOOL ROOM LETH हे वर्कशॉपमध्ये वापरले जाते. याचा उपयोग लाकडाचे आणि लोखंडाचे जॉब कापण्यासाठी आणि तयार करण्यासाठी होतो.थ्रीडिंग पाडण्यासाठी, ड्रिलिंग करणे, चांपर, फेसिंग, बोरिंग, इत्यादी साठी उपयोगी पडते.या मशिनीची किंमत 1 लाख 20,000 पासून सुरू होते.
घ्यावयाची काळजी: नेहमी डोळ्याला चष्मा वापरावे. आजूबाजूला कोणी थांबू नये. टूल व्यवस्थित सेटिंग करून घ्यावे. हाताला नेहमी हात मोजे घालावे.
लेथ मशीन वर काम करताना.



12) मिलिंग मशीन

मिलिंग मशीन वर लाकडाला आणि लोखंडाला डिग्री, चावी गाळा, सरफेस क्लीन इत्यादी कामे करता येते.


13) पावर अक्सो
पावर अक्सो मंजे लाकूड किंवा लोखंडे कापण्यासाठी याचा उपयोग होतो.

14. फेरो सिमेंट
फेरोसमेंटचा वापर तुलनेने पातळ, कठोर, मजबूत पृष्ठभाग आणि अनेक आकारांमध्ये संरचना तयार करण्यासाठी केला जातो जसे की बोटींसाठी हुल, शेल छप्पर आणि पाण्याच्या टाक्या.
फेरोसिमेंटची वैशिष्ट्ये:
- मजबूती: फेरोसिमेंट संरचनात्मकदृष्ट्या खूप मजबूत असते आणि ती मोठ्या प्रमाणावर भार सहन करू शकते.
- हलके वजन: इतर बांधकाम साहित्यांच्या तुलनेत हलके असते.
- लवचिकता: या सामग्रीचा आकार आणि डिझाइन विविध प्रकारांनी बदलता येतो.
- कमी खर्च: कमी खर्चात निर्माण करता येते आणि देखभाल खर्चही कमी असतो.
- जलरोधक: फेरोसिमेंट जलरोधक असते आणि त्यामुळे पाण्याचे नुकसान टाळते.
फेरोसिमेंटचे घटक:
- सिमेंट: बांधकामासाठी वापरले जाणारे मुख्य साहित्य.
- वाळू: सिमेंट मोर्टार तयार करण्यासाठी वापरली जाते.
- पाणी: सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण तयार करण्यासाठी.
- स्टील वायर जाळी: मुख्यतः चिकन मेश किंवा इतर लहान व्यासाच्या स्टील वायर जाळीचा वापर केला जातो.
फेरोसिमेंटचे फायदे:
- कमी खर्च: कमी खर्चात उत्तम गुणवत्ता मिळते.
- जलरोधक: पाणी शोषणाचे प्रमाण कमी असल्यामुळे जलरोधक असते.
- लवचिकता: विविध आकार आणि डिझाइनमध्ये उपलब्ध.
- टिकाऊ: दीर्घकाळ टिकणारी सामग्री.
- देखभाल सोपी: कमी देखभाल आवश्यक असते
साहित्य- रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच असलेला 30 cm चे चार रोड घेतले
२) 30 सेंटिमीटर इतके रोड कापून घेतला
३) वन गुणिले वन फूट ची वेल्ड मॅच कापून घेतली
४) चिकन मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून घेतली
५) मग चौकोनी रॉड ला वेळ मी जाळी जोडून घेतली
६) त्यावर तारेने चिकन मे जाळी जोडून घेतली
७) १.३ .३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले
८) त्यावर तयार केलेले सिमेंट व वाळू याचे मिश्रण त्यावर टाकले व ते एक आल्यावर घेतली सारा त्याच्यामध्ये सर्वसामान करून घ्या
उद्देश – मोबाईल ॲप वर लेवल चेक करणे
साहित्य – मोबाईल ( कंपास, लेव्हल ,ट्यूब)
कृती 1) सर्वात पहिले मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करणे
2) मोबाईल ॲपवर आपण कुठेही माप घेऊ शकतो
3) आपल्याकडे कोणतेही साहित्य नसलं तरी आपण मोबाईल ॲप द्वारे कोणत्याही वस्तूचे माप घेऊ शकतो (लेवल ट्यूब ॲप )
15) मोबाईल ॲप
उद्देश – मोबाईल ॲप वर लेवल चेक करणे
साहित्य – मोबाईल ( कंपास, लेव्हल ,ट्यूब)
कृती 1) सर्वात पहिले मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करणे
2) मोबाईल ॲपवर आपण कुठेही माप घेऊ शकतो
3) आपल्याकडे कोणतेही साहित्य नसलं तरी आपण मोबाईल ॲप द्वारे कोणत्याही वस्तूचे माप घेऊ शकतो (लेवल ट्यूब ॲप )


16.CNC wood rowter
CNC wood router
CNC वुड राउटर म्हणजे संगणक नियंत्रित यंत्र (Computer Numerical Control) जे लाकूड कापण्यासाठी, कोरण्यासाठी, आणि नक्षीकाम करण्यासाठी वापरले जाते. हे यंत्र संगणक प्रोग्रामिंगद्वारे नियंत्रित केले जाते, ज्यामुळे अचूकता आणि पुनरावृत्तीक्षमता मिळते.
CNC वुड राउटर म्हणजे काय?
CNC वुड राउटर हे एक ऑटोमेटेड मशीन आहे जे संगणक नियंत्रित प्रणालीचा वापर करून लाकूडावर विविध प्रकारची कामे करते. यामध्ये ड्रिलिंग, कटिंग, मिलिंग, नक्षीकाम आणि प्रोफाइलिंग अशा कामांचा समावेश होतो.
CNC वुड राउटरची वैशिष्ट्ये:
- अचूकता: संगणक नियंत्रित असल्यामुळे अत्यंत अचूक कामे केली जाऊ शकतात.
- पुर्नरावृत्तीक्षमता: एकच डिझाइन पुन्हा पुन्हा तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे मास प्रोडक्शन सोपे होते.
- स्पीड: मॅन्युअल कामांच्या तुलनेत ही प्रक्रिया जलद असते.
- सुरक्षितता: ऑटोमेशनमुळे मॅन्युअल हस्तक्षेप कमी होतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होते.
- विविधता: लाकूड, प्लास्टिक, अॅक्रेलिक, आणि इतर अनेक मटेरियलवर काम करता येते
CNC वुड राउटरचे फायदे:
- कमी वेळ आणि श्रम: मॅन्युअल प्रक्रियेपेक्षा कमी वेळ लागतो आणि श्रम बचत होते.
- उच्च उत्पादकता: मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते.
- अचूकता आणि गुणवत्ता: कामाची अचूकता आणि गुणवत्ता उच्च असते.
- डिझाइनची लवचिकता: संगणकावर डिझाइन बदलून विविध प्रकारचे काम करता येते.
CNC वुड राउटरसाठी टूल पाथ जनरेट करण्याचे टप्पे:
- डिझाइन तयार करणे (Design Creation):
CAD सॉफ्टवेअर वापरणे: Autocad, Fusion 360, या सारख्या CAD (Computer-Aided Design) सॉफ्टवेअरचा वापर करून डिझाइन तयार करा. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचे तंतोतंत मॉडेल तयार करण्याची परवानगी देते.
डिझाइन आयात करणे: जर तुमच्याकडे आधीच तयार डिझाइन असेल तर ते सॉफ्टवेअरमध्ये आयात करा. - डिझाइनला टूल पाथमध्ये रूपांतर करणे (Converting Design to Tool Path):
CAM सॉफ्टवेअर वापरणे: CAD डिझाइनला टूल पाथमध्ये रूपांतर करण्यासाठी CAM (Computer-Aided Manufacturing) सॉफ्टवेअर वापरले जाते. काही सामान्य CAM सॉफ्टवेअरमध्ये VCarve, Aspire, आणि Fusion 360 यांचा समावेश होतो.
मशीन सेटअप: मशीनचे पॅरामीटर्स सेट करा, जसे की मशीन प्रकार, वर्कपीसची मिती, आणि टूलची निवड.
टूल पाथ सेटिंग्स: कटिंग डेप्थ, कटिंग फीड रेट, स्पिंडल स्पीड इत्यादी सेट करा. - सिमुलेशन आणि व्हेरिफिकेशन (Simulation and Verification):
सिमुलेशन चालवणे: CAM सॉफ्टवेअरमध्ये टूल पाथची सिमुलेशन चालवा, ज्यामुळे कापण्याच्या प्रक्रियेचा पूर्वावलोकन करता येतो.
व्हेरिफिकेशन: सिमुलेशनमधून मिळालेल्या निकालांची पडताळणी करा आणि आवश्यकतेनुसार टूल पाथमध्ये बदल करा. - G-Code जनरेट करणे (Generating G-Code):
G-Code निर्यात करणे: एकदा टूल पाथ तयार झाला की, CAM सॉफ्टवेअरद्वारे त्याचे G-Code मध्ये रूपांतरण करा. G-Code हा मशीनला कसे चालवायचे याचे निर्देश देणारा कोड आहे.
फाईल सेव्ह करणे: तयार केलेले G-Code फाईल सेव्ह करा. - G-Code मशीनमध्ये लोड करणे (Loading G-Code into the CNC Machine):
फाईल ट्रान्सफर: G-Code फाईल USB किंवा नेटवर्कद्वारे CNC वुड राउटरमध्ये ट्रान्सफर करा.
मशीन सेटअप: CNC मशीनवर वर्कपीस व्यवस्थित सेट करा आणि टूल्स लोड करा. - CNC मशीन चालू करणे (Running the CNC Machine):
CNC कंट्रोलर सेटिंग्स: मशीन कंट्रोलरवर G-Code फाईल लोड करा आणि आवश्यक सेटिंग्स तपासा.
प्रक्रिया सुरू करणे: सगळे सेटअप पूर्ण झाल्यानंतर, मशीन चालू करा आणि प्रक्रिया सुरू करा.
CNC वुड राउटरसाठी वापरले जाणारे सामान्य सॉफ्टवेअर:
CAD सॉफ्टवेअर:
1 AutoCAD
2 Fusion 360
3 SketchUp
4 CAM सॉफ्टवेअर:
VCarve
Aspire
Fusion 360 (हे CAD आणि CAM दोन्ही आहे)
Easel .

सेफ्टी फर्स्ट: CNC वुड राउटर वापरताना नेहमी सुरक्षितता नियमांचे पालन करा.
स्पीड आणि फीड्स समजून घ्या: योग्य कटिंग स्पीड आणि फीड रेट वापरा, जेणेकरून टूलचा आयुष्य वाढेल आणि कामाचे गुणवत्ताही सुधारेल.
प्रोपर मेंटेनन्स: CNC मशीनची नियमित देखभाल करा.
टूल पाथ जनरेट करणे आणि G-Code तयार करणे ही प्रक्रिया सुरुवातीला कठीण वाटू शकते, परंतु योग्य प्रशिक्षण आणि सरावाने ती सोपी होते.

17. सुतार काम
साहित्य: रंदा, फळी ,पॉलिसी व्हील, रंग, कटर मशीन इत्यादी.

आश्रम चे नवीन हॉस्टेल साठी वीस बेड साठी पाइनवुड लाकडाचे फळे कटिंग केले. त्या फळीला पॉलिशिंग केले त्यानंतर कटिंग केले नंतर त्याला इत्यादी सुतार काम केला.

सुतार कामाचे अवजारे :

