नाव : जयेश पांचाळ
विभाग : पशु पालन
प्रोजेक्ट नाव : कंम्पास्ट खत
विभाक प्रमुख : भानुदास सर
उद्देश : कंम्पास्ट खत तयार करणे .. कारण शेतात , झाडाला , याना खत मिळावं म्हणून ..
साहित्य : बकेट , घमेला , फावढा , पाणी , इ ,
कंम्पास्ट खत :
कंम्पास्ट खत म्हणजे काय :
कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. याला कंम्पास्ट खत असे असे म्हणतात …
कंम्पास्ट खताचे प्रकार :
शेणखत, लेंडीखत, सोनखत इ. हिरवळीचे खत – जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. रासायनिक खत – उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
कंम्पास्ट खत तयार कस करणे :
कंपोस्ट खत : निर्मितीसाठी झाडांचा पालापाचोळा, शेतातील तसेच गोठ्यातील काडीकचरा, बजारातील टाकाऊ पदार्थ, पिकांची धसकटे, भुसा, भाज्यांचे टाकाऊ भाग, पाने, देठ, गवत, किचनमधील उरलेले घटक यांसारख्या टाकाऊ पदार्थांचा वापर करू शकतो. खड्डयामध्ये कंपोस्ट बनविताना वरीलप्रमाणे सर्व गोष्टी एकत्र करून घ्याव्यात. .
कंम्पास्ट खताचे फायदे :
कंपोस्ट वापरण्याचे फायदे :
- याच्या वापराने जमिनीची खत शक्ती फार कमी वेळात वाढते.
- त्याच्या वापराने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- सिंचनाची गरज कमी असल्याने सिंचनाचा खर्चही कमी येतो.
- कंपोस्ट खतापासून मिळणाऱ्या पोषक तत्वांमुळे झाडांची वाढ वाढते.
- हे खत शेतात वापरल्यास पिकांचा दर्जा चांगला राहतो.
कंम्पास्ट खताबद्दल माहिती :
जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय.