इन्स्टंट पुरण
प्रस्तावना :- आजच्या डिजिटल जगात प्रत्येक गोष्ट हि कमी वेळेत तयार होऊन मिळेल अशी हवी असते यांचे कारण बऱ्याच महिला आज जॉब किंवा स्वत:चा व्यवसाय करतात त्यामुळे घरच्या कामासाठी खूप कमी वेळ राहतो म्हणून कमी वेळेत तयार होतील असेच पदार्थ बनवण्यास आवडतात आणि आता रेडी टू इट प्रॉडक्ट मुळे ते सहज सोपे झाले आहे म्हणून लोकांच्या मागणी नुसार आम्ही फूड लॅब प्रोजेट मध्ये इन्स्टंट पुरणं ची निवड केली .
*प्रकल्पाचे नाव :- हरभऱ्याला मोड आणून इन्स्टंट पुरण तयार करणे.
*साहित्य : – हरभरा , गूळ, साखर , वेलची ,गॅस ,प्याकिग पिशवी इ .
* कृती : – १) प्रथम हरभरा निवडून स्वछ दोन पाण्याने धुवून थोड कोमट पाण्यात २४ तास भिजत ठेवला . २) २४ तासा नंतर हरभऱ्याला एका सूती कापडा मध्ये ४८ तास मोड आणण्यासाठी ठेऊन दिले . ३) साधरण १.५ ते २ इंच लांबीचे मोड हरभऱ्याला आल्यानंतर त्यांचे पुन्हा वजन करून सोलर ड्रायरला वाळत घातले .
४) तीन दिवसांत हरभरा पुर्णपणे वाळला . त्या नंतर त्यांचे पुन्हा वजन केले . हरभऱ्याची वरची साल काढण्यासाठी एका कापडावर हरभरा टाकून एका लाटण्याने लाटून साल वेगळी केली .
५) साल काढल्यावर हरभराच्या डाळीचे वजन करून घेणे.
६) जेवढे हरभराच्या डाळीचे वजन त्यांच्या ८०% गूळ आणि २०% साखर व वेलची पूड घेऊन एकत्रित मिश्रण गरम करून पुरण तयार करणे .
७) तयार केलेले ओले पुरण पुरण यंत्राने बारीक करून सोलार ड्रायरला ड्राय करून घ्यावे .
८) पुरण ड्राय होण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो . ९) ड्राय झालेले पुरण मिक्सर मध्ये बारीक करून चाळणीने चालून एका एअर टाईट पाउच मध्ये पॅक करून स्टीकर लावावे .
#SPROUTING PURAN#
अनू | मटेरिअल | वजन | दर | किमत |
1 | हरभरा | 2 kg | 80 | 160 |
2 | गूळ | 1600gm | 40 | 64 |
3 | साखर | 400gm | 40 | 16 |
4 | विलेची | 20gm | 3000 | 60 |
5 | प्याकिंग पिशवी | – | 2 | 10 |
6 | लेबल | – | 2 | 10 |
7 | गॅस | 60gm | 906rs 14200 | 3.82 |
8 | मिक्सर | 1/2unit | 7rs 1unit | 3.50 |
9 | ड्रायिग् चाज | 2days | 7rs/1days | 14.00 |
341.32 | ||||
मजुरी 35% | 119.46 | |||
एकूण खर्च | 460.78rs |
#2.5 kg इन्स्टंट पुरण तयार करण्यासाठी =460.78 rs
#1 kg इन्स्टंट पुरण तयार करण्यासाठी 184.31 kg
#500 gm =92.15 rs
#250 gm =46.07 rs
#इन्स्टंट पुरण विक्री किमत =400 rs -184.31=215.54 rs नफा झाला .