1. मोटार रिवाइंडिंग प्रक्रिया समजून घेणे

. मोटारच्या वायरिंगची पुनर्रचना करून तिचे कार्यक्षमतेचे गुणस्थापन करणे

2. कौशल्य विकास

. मोटारची विच्छेद तपासणी रिवाइंडिंग आणि पुन्हा असेंबली करण्याचा अनुभव मिळवने

3. समस्या निराकरण

मोटर वायंडीमध्ये दोष ओळखणे आणि सुधारणे

इलेक्ट्रिकल मोटर, इन्सुलेशन सामग्री वाइंडिंग वायर वायनिंग मशीन किंवा जीग, मल्टीमीटर , इन्सुलेशन प्रतिकार प्रशिक्षण, हॅन्ड स्टूल, मायक्रोमीटर, स्क्रीमॅटिक डायग्राम, स्क्रू गेज

पहिल्यांदा गावामध्ये गेलो. तिथे मोटार रिवाइंडिंग दुकानांमध्ये गेलो. तिथे मल्टीमीटर घेऊन आम्ही मोटरची वायरिंग चेक केली. त्यामध्ये वायडिंग गेली आहे का नाही ते बघितले मोटर दोन पार्ट असतात त्यामध्ये फुटबॉल आणि एक मोटर असते ते वेगवेगळे केले तर त्यामध्ये फेज (लाल) च्या वायरीला कंटिन्यू येत नव्हती. त्यामुळे असं समजले की वायडिंग गेली आहे. मोटर चे वरचे स्क्रू खोलले ते खूप टाईट झाले होते म्हणून स्क्रू ड्रायव्हरने त्याच्यावरील गंज काढला. मोटर खोलली त्यामध्ये सहा वेढे होते. त्याच्यामध्ये 24 स्लॉट होते. स्टार्टिंग वायडिंग आणि रनिंग वायरग असे दोन प्रकार असतात. त्याच्यामधील स्टार्टिंग वाइंडिंग पूर्णपणे होती. तिला एका बाजूला कट करून प्लास घेऊन त्याच्याने खेचून काढली. पहिल्यांदा एक दोन काढून घेतल्या नंतर प्लास ने वरती करून त्यांच्या टेक्निकने काढले आम्ही खूप ताकद लावत होतो त्यांनी सहजरीत्या काढले वाइंडिंग काढलेले प्रत्येक वेढ्याचे वेगवेगळे गुच्छ केले. ते मोजून पण घेतले पहिल्या वेड्या त 28 तार होत्यात दुसऱ्या वेड्यात 24 तास होत आणि तिसऱ्या वेळेत 12 तारखेला आणि चौथ्या वेळेत 6 तार होत्या. प्रत्येक वेळेचे वेगवेगळे वजन करून त्याची वहीत नोंद घेतली. नंतर सर्वांची बेरीज करून दीड किलो वायर निघाले जेवढी वायर निघाली तेवढीच डबल वाइंडिंग मध्ये टाकावी लागते नाहीतर शॉक सर्किट होऊ शकतो. रिवायडींग साठी त्यांनी मशीनला तार लावून वायडिंग केली . वाइंडिंग झाल्यावर मोटर मध्ये पेपर टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये नीट वाइंडिंग बसवली व वरून बांबूच्या काड्या ऍक्युरेट कापून त्याच्यावर बसवल्या तीन वायर वरती काढल्या . वायडिंग वरती लीड ऍसिड ओतले त्यामुळे वाइंडिंग चांगली राहते. त्याच्यानंतर मोटर फिट करून चेक केली.

मोटार रिवाइंडिंग एक महत्त्वपूर्ण देखभाल कार्य आहे जे इलेक्ट्रिकल मोटरच्या आयुष्याचा विस्तार आणि कार्यक्षमता पुणे स्थापित करते योग्य पद्धतीने पालन करून योग्य साहित्य वापरून आणि सखोल तपासणी करून आपण याची खात्री करून शकतो ही रिवाइंडिंग केलेली मोटरची प्रभावी आणि विश्वसनीयपणे कार्य करते