१. माती परीक्षण
. आज मी तुम्हाला माती परीक्षणाबद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आपण माती परीक्षण म्हणजे काय व ते कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
. माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचे विश्लेषण करणे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीची सुपीकता किंवा आरोग्य तपासता येते आणि पिकांसाठी खतांची मात्रा ठरवता येते.
. माती परीक्षण करण्यासाठी सर्वप्रथम ज्या क्षेत्रातील माती परीक्षण करायचे आहे त्या शेतातून माती आणाली. व त्या मातीचे सॉइल टेस्टिंग किट च्या मदतीने नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियमचे प्रमाण बघायचे. जर यातील कशाचे पण प्रमाण कमी असले तर ते वाढवण्यासाठी त्या घटकाची फवारणी करायची. माती परीक्षण हे पिक लावण्याच्या 45 दिवसाआधी करावे लागते व एकदा फवारणी झाली की तीन महिन्यांनीच माती परीक्षण आपण करू शकतो. नाहीतर आपल्याला चुकीचे निष्कर्ष भेटू शकतात.
२.बीज प्रक्रिया
. आज मी तुम्हाला बीज प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहे ज्यामध्ये आपण बीज प्रक्रिया कशी करतात हे बघणार आहोत व मी माझा अनुभव आपल्याला सांगणार आहे.
. बीज प्रक्रिया म्हणजे बीजोपचार किंवा बियाण्यांची योग्य प्रकारे प्रक्रिया करणे. यामध्ये पेरणीपूर्ती बियाण्यांवर केलेल्या विविध उपचारांचा समावेश होतो. ही प्रक्रिया बियाण्यांमध्ये रोगजंतूंचा नाश करून त्यांना उगवण्यासाठी सशक्त बनवते. बियाण्यांना विशिष्ट रासायनांनी,जैविक घटकांनी आणि उकळलेल्या पाण्याने प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्यांचे उगवण क्षमतेचे प्रमाण वाढते आणि पीक चांगले येते.
. रासायनिक बीज प्रक्रिया :-
. रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी येड्यांवर रासायनिक पदार्थांनी. या प्रक्रियेत बियाण्यांवर विशिष्ट रसायनांचे लेप दिले जाते, जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल आणि त्यांची उगवण क्षमता वाढेल. रासायनिक बीज प्रक्रियेमुळे बियाणांचे बुरशी, बॅक्टेरिया आणि किडींपासून संरक्षण होते. उदाहरणार्थ = कार्बो-डायझीम, थायराम किंवा मॅन्कोझेब यांसारखी रसायने बियाण्यांना लागणारे रोगजंतू नष्ट करून त्यांचे संरक्षण करतात. ज्यामुळे उगवलेले पिक अधिक सशक्त होते.
. आम्ही केलेली बीज प्रक्रिया पुढील प्रमाणे :-
पहिल्यांदा छोटा बटाट्यांना उन्हात पसरवून ठेवले. व दुसरीकडे एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचे कार्बो-डायझिंग टाकले. मग या तयार झालेल्या रसायनाला बटाट्यांवर फवारले. मग बटाट्यांना उलटे करून त्यांच्या मागच्या बाजूवरही हे रसायन फवारले. या रसायनामुळे बटाट्यांना बुरशी लागणार नाही किंवा त्यांच्यावर कीड लागणार नाही. व त्यांना वाढीसाठी मदत करेल.
३. दूध काढायच्या पद्धती
आज मी तुम्हाला प्राण्यांचे दूध कसे काढायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. यामध्ये आपण दूध काढण्याच्या पद्धती व त्यांचे फायदे व तोटे बघणार आहोत.
. जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीने दूध काढणे व योग्य प्रकारे हाताळणे गरजेचे आहे.
. 1] हाताने दूध काढणे :-
i) मूठ पद्धत :- या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने गायीचे दूध काढण्यासाठी केला जातो.
ii) चिमटा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने शेळी व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
iii) अंगठा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
. फायदे :- कासे तील दूध पूर्णपणे काढले जाते, सडाला इजा होत नाही.
. तोटे :- वेळ जास्त जातो, लेबर चार्ज जास्त जातो, जास्त जनावर असतील तर ही पद्धत वापरता येत नाही.
४. TDN पद्धतीने प्राण्यांचे खाद्य काढणे.
आज मी तुम्हाला TDN पद्धतीने खाद्य कसे काढायचे ते सांगणार आहे.
TDN म्हणजे एकूण पचनीय घटक (Total Digestive Nutrients). TDN पद्धतीने आपण कोणत्याही प्राण्याचे एका दिवसाचे खाद्य काढू शकतो. उदा.) शेली, मेंढी, गाय, कोंबडी इ.
TDN पद्धतीचे सूत्र =
वरील सूत्राप्रमाणे आपल्याला ज्या प्राण्याचे खाद्य काढायचे आहे त्या प्राण्याचे वजन माहित असायला पाहिजे. सुत्राप्रमाणे वजनाचे ३% कढायचे जे काही उत्तर येईल ते त्या प्राण्याचे एका वेळेचे खाद्य असणार आहे. त्या ३% खाद्याचे २ भाग करायचे २५% खुराक व ७४% चारा. आता या चार्याचे परत दोन भाग करायचे २५% सुका चारा व ७५% ओळ चारा. या सर्व कृती करून झाल्यात की तुमच्या प्राण्याचे एका दिवसाचे पौष्टिक खाद्य मिळेल.
मी काढलेले आमच्या एका कालवडीचे खाद्य पुढील प्रमाणे =
5. ऊती संवर्धन
. आज मी तुम्हाला कृती संवर्धनाबद्दल माहिती देणार आहे. यामध्ये ऊती संवर्धन म्हणजे काय ते कसे करतात व त्याचे फायदे काय याबद्दल आपण माहिती देणार आहोत.
. ऊती संवर्धन म्हणजे एखाद्या झाडाची एक ऊती काढून तिची प्रयोग शाळेत रोप बनवणे.
. आता ऊती संवर्धन कसे करतात ते आपण जाणून घेऊ. सर्वात पहिल्यांदा ज्या झाडाचे रोप बनवायचे आहे त्या झाडाची एक ऊती काढून घ्यायची. तिला एका बंद डब्यामध्ये काही रसायने ठेवून लागणारे तापमानात काही दिवसांसाठी तसेच ठेवायचे. हळूहळू त्याला मुळे यायला सुरुवात होईल. त्यानंतर त्याला प्लास्टिक चे काही ट्रे भेटतात त्यात लावायचे. नंतर त्याचे रोप तयार होईल, ते झाल्यावर त्या रोपाला आपल्या शेतात किंवा तुमच्या बागेत लावू शकतात.
. ऊती संवर्धनाचे खूप फायदे आहेत पण त्याच्यातला एक सर्वात भरी असा फायदा म्हणजे समजा तुमच्याकडे एक पेरूचे झाड असेल जे खूप चविष्ट व मोठे पेरू देते. आणि तुम्हाला त्याची अजून रोपं पाहिजेत तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात. पण तुम्ही म्हणाल की आपण फलाच्या मदतीने पण रोप बनवू शकतो तर हीच पद्धत का तर याचे उत्तर म्हणजे जर तुम्ही फळांच्या मदतीने झाड लावले तर ते तसेच मोठे किंवा चविष्ट पेरू देईल याची संभाव्यता खूप कमी असते. पण जर तुम्ही ऊती संवर्धनाची पद्धत वापरली तर तुम्हाला तसेच पेरू भेटतील. त्यामुळे ही पद्धत आपल्याला खूप उपयोगी आहे.
6. फवारणी
आज मी तुम्हाला फवारणी बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आपण फवारणीचे प्रकार, फवारणी करताना लागणारी सुरक्षा व त्याचे फायदे यांच्या बद्दल महिती सांगणार आहे.
खाऱ्यामध्ये फवारणीचे प्रकार नसतात तर त्याच्यात वापरल्या जाणाऱ्या स्प्रेच्या नोझलचे प्रकार असतात. ज्याच्या मदतीने आपण फवारणी करतो.