Cloud kitchen
strat from 5th April
हे आहे क्लाईड कीचन!!

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत चालली आहे. अगदी खाण्यापिण्याच्या सवयी देखील! क्लाउड किचन म्हणजेच अशी एक संकल्पना जिथे पारंपरिक रेस्टॉरंटशिवाय फक्त ऑनलाइन ऑर्डरवर आधारित जेवण तयार केलं जातं. आणि अशा नव्या क्षेत्रात मला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी खूपच खास गोष्ट आहे.
मी नुकताच क्लाउड किचनमध्ये इंटर्नशिप सुरू केली आहे आणि आतापर्यंतचा अनुभव खूपच शिकवणारा आहे. इथे काम करताना मी केवळ जेवण बनवण्याची किंवा ऑर्डर प्रक्रिया समजून घेण्यापेक्षा अधिक गोष्टी शिकतो आहे – किचन मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, ग्राहकांची अपेक्षा समजून घेणं, आणि सिस्टिमॅटिक काम कसं केलं जातं हेही.
सर्वात विशेष म्हणजे – इथलं काम अत्यंत वेगवान आहे. प्रत्येक ऑर्डर वेळेत आणि योग्य क्वालिटीसह पोहोचवणं हेच मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळे वेळेचं नियोजन आणि टीमवर्क खूप महत्त्वाचं ठरतं.
माझ्या इंटर्नशिपमध्ये मी डिजिटल ऑर्डर व्यवस्थापन, इन्व्हेंटरी कंट्रोल, आणि सोशल मीडियाद्वारे ब्रँड प्रमोशन यासारख्या बाबतीत देखील सहभाग घेतो आहे. या सर्व गोष्टी मला माझ्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करताना उपयोगी ठरणार आहेत.
शेवटी, ही इंटर्नशिप माझ्यासाठी एक उत्तम संधी ठरली आहे..!
वेगवेगळ्या भाजींची कापण्याच्या पद्धती
१. फोडणीसाठी बारीक चिरणे
फोडणीसाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, आले, मिरची, टोमॅटो यांचा समावेश होतो. या भाज्या फार वेळ शिजवायच्या नसतात, त्यामुळे त्या बारीक चिरल्या जातात.
उदा
- कांदा – बारीक चिरलेला
- लसूण – बारीक किसलेला किंवा ठेचलेला
- हिरवी मिरची – बारीक चिरलेली किंवा उभी फोडलेली
- टोमॅटो – बारीक किंवा मध्यम चिरलेले
२. मध्यम फोडी
ही पद्धत सामान्य भाजीसाठी वापरली जाते. जसे की वांगी, दोडका, भेंडी, टोमॅटो वगैरे. यामध्ये भाजी न जळता, नीट शिजावी यासाठी मध्यम आकाराच्या फोडी केल्या जातात.
उदा
- वांगी – चौकोनी किंवा लांबट फोडी
- भेंडी – १ ते १.५ इंच लांबीचे तुकडे
- दोडका – अर्धगोल किंवा लांब फोडी
३. जुलिएन कटिंग
हा प्रकार मुख्यतः गाजर, कोबी, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांसाठी वापरला जातो. या पद्धतीत भाजी बोटासारखी लांबट, पातळ पट्टीसारखी कापली जाते. चायनीज पदार्थ किंवा स्टर फ्राय भाजीसाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो.
उदा
- गाजर – लांब, पातळ पट्ट्या
- ढोबळी मिरची – उभ्या, लांबसर पट्ट्या
- कोबी – बारीक, उभे तुकडे
५. मोठ्या फोडी
पुलाव, उकडणं, किंवा गोड भाजीसाठी भाज्या मोठ्या फोडींमध्ये कापल्या जातात. यामध्ये भाजी शिजल्यावरदेखील आकार टिकतो.
उदा
- बटाटा – मोठ्या चौकोनी फोडी
- सुरण – जाडसर काप
- गाजर – मोठ्या कापात
६. भरली भाजीसाठी
भरली वांगी, भरली मिरची, किंवा भरलेलं कारलं बनवताना भाजी संपूर्ण ठेवून केवळ आतमध्ये भरण्याइतकी फोड करावी लागते.
उदा
- वांगी – चार फोडी करायच्या, पण देठाकडून जोडून ठेवायच्या
- मिरची – उभी चीर
- कारलं – दोन्ही टोकं कापून आतील भाग साफ करणे