सॉसची माहिती
विकतच्या टोमॅटो सॉस मध्ये साखर असते, प्रिझर्व्हेटीव्ह असतात. बायकोला मधुमेह आहे. तिच्यासाठी साखर नसलेला टोमॅटो सॉस बनवावा म्हणुन आंतरजालावर शोध घेऊन त्याच्या विविध पाकृ वाचल्या आणि त्यातून सुरु करुन, एक पाकृ बनवली.
घरी करण्याचा मुख्य उद्देश, साखरे शिवाय (आणि सोडियम बेन्झोएट शिवाय) बनविणे असला तरी, चव मस्त येत असल्याने, घरीच बनवणे चांगले वाटू लागले.
वेळः कामाचा ४० मिनीट, एकंदरीत दोन तास.
साहित्यः
लाल कडक टोमॅटो – अर्धा किलो
कांदा: मध्यम आकाराचा- १
लसूणः ७-८ पाकळ्या
अॅपल साइडर व्हिनेगर – १/२ कप
दालचिनी पावडरः दोन तीन चिमुट
काळीमीर पुडः दोन ते तीन चिमुट
मीठः १/२ चहाचा चमचा
काळे मिरे: १ चहाचा चमचा
जीरे: १ चहाचा चमचा
लवंगः ७-८ पाकळ्या
वेल्दोडे: ७-८
दालचीनी: २ ते ३ इंच
कृती:
टोमॅटो धुवून पातळ चिरुन घ्या. कांदा सुद्धा पातळ चिरुन घ्या. लसूण पाकळ्या सोलून चिरुन घ्या. हे तिन्ही पदार्थ कु़कर मध्ये टाकून जरा कालवून घ्या. (पाणी टाकायचे नाही.)
झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होई पर्यंत शिजवून घ्या.
किमान अर्धा तास झाकण न उघडता गार होऊ द्या. गार झाल्यावरच झाकण उघडा.
शिजवलेल्या मिश्रणाला असे पाणी सुटते.
एका भांड्यावर मोठी गाळणी ठेवा. मिक्सर मधुन हे मिश्रण सुटलेल्या पाण्यासकट थोडे थोडे टाकुन (चार भाग, अर्ध्या किलोच्या रेसिपीला) जमेल तेवढी बारिक पेस्ट करुन घ्या. आणि गाळणीत टाकुन चमच्याने ढवळून ढवळून गाळुन घ्या.
गाळलेली पेस्ट ही सॉस पेक्षा पातळ असते.
हा उरलेला चोथा. यात बिया असतात. याचे काय करता येईल ते करावे, सॉस साठी याचा उपयोग करत नाही.
आता पांढर्या सुती रुमालाच्या आकाराच्या कापडात जीरे, काळे मीरे, लवंग, वेल्दोडे (फोडून सालीसकट), दालचीनीचे तुकडे ठेवुन पुरचुंडी बांधा.
मी हा सॉस फ्रिज मध्ये ठेवतो, आठवडाभर चांगला रहातो. त्यापेक्षा जास्त काळही रहात असेल पण आता पर्यंत आठवड्याभरात संपून गेल्याने, अजून किती काळ टिकेल याची कल्पना नाही. बाहेर कधी ठेवला नाही, त्यामुळे बाहेर किती दिवस टिकतो याची माहिती नाही. जाणकारांनी कृपया माहिती पुरवावी.
स्त्रोतः आंतरजाल, त्यापैकी ९०% ही खालील दुव्यावरुन घेतलीय.