टाईनी हाउस
प्रस्तावना :-
आजच्या वेगवान जीवनशैलीत व वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची कमतरता भासत आहे. मोठ्या घरांच्या तुलनेत लहान, किफायतशीर व पर्यावरणपूरक घरांची संकल्पना पुढे येत आहे. त्यालाच टायनी हाऊस असे म्हणतात.
या प्रकल्पामध्ये आम्ही १० फूट × १० फूट क्षेत्रफळाचे टायनी हाऊस डिझाइन केले आहे.
सर्वे :-
कमी खर्चात व कमी जागेत आवश्यक सोयी उपलब्ध करून देणारे घर म्हणजे टायनी हाऊस.
या प्रकल्पात आम्ही १०x१० फूट टायनी हाऊस डिझाईन केले आहे.
यात –
स्वयंपाकघर
हॉल
स्नानगृह व शौचालय
उद्देश :-
कमी जागेत जास्तीत जास्त उपयोग करणे
कमी पैशात जास्त जागेचा वापर करणे.
स्वस्त व किफायतशीर घर उपलब्ध करून देणे.
किचन, हॉल व बाथरूम यांसारख्या मूलभूत सोयी समाविष्ट करणे.
पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम करणे.
ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या कमी करणे.
साहित्य :-
१.५ × १.५ इंच ट्यूब
सिलिंग शीट (PUC) – छतासाठी
भिंत शीट (सिमेंट शीट) – भिंतीसाठी
नट व बोल्ट – जॉईंट्स व जोडणीसाठी
सिमेंट प्लायवूड – मजल्यासाठी व आतील कामासाठी
बाथरूम साहित्य –
नळ (Tap)
कमोड (कमोड/शौचालय सीट)
बेसिन (हात धुण्याचे बेसिन)
काळी वायर 1.5 mm/2.5
हिरवी वायर 1.5mm/2.5
लाल वायर 1.5 mm/2.5
कृती :-
फ्रेम तयार करणे
१.५ x १.५ इंच ट्यूब वापरून चौकट (Frame) तयार करणे
नट-बोल्टच्या सहाय्याने जोडणी करणे
भिंती व छत बसवणे
भिंतींसाठी सिमेंट शीट लावणे
छतासाठी PUC शीट बसवणे
वायरिंग केली व बोर्ड भरले आणि, वायर साठी वायरिंग पाईप लावले.
नळ (Tap) बसवणे
कमोड (Toilet Seat) बसवणे
बेसिन (Wash Basin) बसवणे
निरीक्षण :-
टायनी हाऊस प्रकल्पामध्ये कमी जागेत व कमी खर्चात किचन, हॉल व बाथरूम या आवश्यक सोयी उपलब्ध झाल्या.
साहित्याचा योग्य वापर करून घर मजबूत, टिकाऊ व पर्यावरणपूरक बनले आहे.
निष्कर्ष :-
१०x१० फूट टायनी हाऊस कमी खर्चात, कमी जागेत व टिकाऊ साहित्य वापरून बांधता येते.
यामध्ये सर्व मूलभूत सुविधा मिळून हे घर किफायतशीर व उपयुक्त ठरते.
भविष्यातील उपयोय :-
टायनी हाऊस संकल्पना भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील गृहसमस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे घर पोर्टेबल, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असल्याने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी व लहान कुटुंबासाठी उपयोगी आहे
मी हे शिकलो:-
वायरिंग कसे करायचे ते शिकलो.
PUC सिल्लिंग लावायचं शिकलो.
स्टाईल्स बसवायला शिकलो.
प्लंबिंग शिकलो.
दरवाजा आणि खिडकीची फ्रेम बनवायला शिकलो.
पेंटिंग कसे करायचे ते शिकलो.

गेस्ट हाउसचे बांधकाम
प्रस्तावना :
गेस्ट हाऊस बांधकाम हा एक महत्वाचा प्रकल्प असून त्यामध्ये जागेची आखणी, विटांची मांडणी, भिंतींची उंची, खिडक्या–दरवाज्यांची जागा .या सर्व प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करावी लागते. या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रत्यक्ष बांधकाम कसे करायचे, कोणते साधन कसे वापरायचे आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता कशी राखायची हे शिकून घेतले.
सर्वे :
बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेचा सखोल सर्वे करण्यात आला.
जागेचे मोजमाप घेण्यात आले.
गेस्ट हाउसची दिशा, वारा–तापमान याचा विचार करण्यात आला.
या सर्वेच्या आधारे अंतिम प्लॅन आणि मोजमाप निश्चित करून चौकट तयार करण्यात आली.
उद्देश :
गेस्ट हाऊसचा बांधकाम कार्य प्रत्यक्ष अनुभवणे
मार्किंग, प्लॅनिंग आणि मोजमाप यांचा योग्य वापर शिकणे
विटा लावणे, भिंत उचलणे, प्लॅस्टर करणे या मूलभूत टप्प्यांवर कौशल्य मिळवणे
बांधकामासाठी आवश्यक उपकरणांची ओळख करणे
सुरक्षित आणि दर्जेदार बांधकाम कसे करावे हे जाणून घेणे
साहित्य :
ACC
केमिकल
थापी , घमेल
कळंबा स्पिरिट
लाईन दोरी
फक्की, मोजपट्टी, हातोडा इत्यादी
कृती :
सर्वप्रथम गेस्ट हाऊसचा संपूर्ण प्लॅन काढण्यात आला. त्यामध्ये भिंतींची रचना, दारे-खिडक्या, बाथरूमची जागा इत्यादींचा समावेश होता.प्लॅननुसार जागेवर फक्कीने अचूक आखणी (Marking) करण्यात आली. गेस्ट हाऊसच्या बेसलाइनसाठी मजुरांकडून विटांची सरळ लाईन लावण्यात आली.
कळंबा स्पिरिट व लाईन दोरी वापरून भिंती सरळ आणि समतोल ठेवत विटा रचण्यात आल्या.ज्या जागी खिडक्या आणि दारे बसवायची होती, तेथे आवश्यक जागा सोडण्यात आली.भिंती निर्धारित उंचीपर्यंत उचलण्यात आल्या.
कॉस्टिंग :
| अ. क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | ACC | 1600 | 80 | 1,28,000 |
| 2 | केमिकल | 23 | 500 | 11,500 |
| 3 | मजुरी [25%] | 34,875 | ||
| total | 174,375 |
निरीक्षण :
मार्किंग अचूक झाल्यास संपूर्ण बांधकाम व्यवस्थित होते.
भिंतींची उंची वाढवताना लाईन दोरी अत्यंत आवश्यक ठरली.
कळंबा स्पिरिटमुळे भिंत एकदम सरळ व संतुलित राहिली.
ग्रीलच्या आकारानुसार वेल्डिंगची गुणवत्ता बदलते हे लक्षात आले.
प्लॅस्टरची फिनिशिंग भिंतींच्या दिसण्यावर परिणाम करते.
निष्कर्ष :
गेस्ट हाऊस बांधकाम प्रक्रियेमुळे आम्हाला प्रत्यक्ष बांधकामाची सर्व टप्प्यांमधील अचूकता आणि कौशल्य शिकायला मिळाले. मार्किंग, विटांची रचना, लेव्हल तपासणे, या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या प्रकल्पामुळे आम्ही बांधकामाचे तांत्रिक ज्ञान तसेच कौशल्य आत्मसात केले.
भविष्यातील उपयोग :
गवंडी आणि बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी अनुभव उपयुक्त
मोठ्या इमारती, घर, शेड किंवा ऑफिस बांधकामासाठी बेसिक कौशल्य विकसित होते
ग्रील बनवणे, प्लॅस्टर करणे याची स्वतंत्र कामेही करू शकतो
बांधकामातील अचूकता व सुरक्षा याबद्दल चांगले ज्ञान मिळाले

ग्रील
प्रस्तावना :
गेस्ट हाऊसच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूत बांधकामासाठी ग्रील बसवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पात आम्ही तीन वेगवेगळ्या मापांचे ग्रील मोजून, त्यांचे कॉस्टिंग करून, आवश्यक साहित्य खरेदी करून स्वतः ग्रील तयार केले. या प्रक्रियेत वेल्डिंग, ग्राइंडिंग, मोजमाप, फ्रेम तयार करणे, रेडॉक्साईड व पेंटिंग यासारखी कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची आणि वापरण्याची संधी मिळाली.
सर्वे:
. सर्वात प्रथम गेस्ट हाऊसच्या खिडक्यांचे मोजमाप घेतले असता खालीलप्रमाणे तीन वेगवेगळ्या आकाराच्या ग्रीलची आवश्यकता असल्याचे आढळले:
पहिली ग्रील: 6 ‘× 5’
दुसरी ग्रील: 4 ‘ × 7’
तिसरी ग्रील: 2′ × 20″
मोजमापांच्या आधारे कॉस्टिंग केले व त्याप्रमाणे साहित्य खरेदी करण्यात आले.
उद्देश:
गेस्ट हाऊससाठी आवश्यक त्या आकाराच्या मजबूत ग्रील तयार करणे* गेस्ट हाऊसला सुरक्षा प्रदान करणे* धातू काम, वेल्डिंग, ग्राइंडिंग आणि फ्रेम फॅब्रिकेशन या कौशल्यांचा विकास करणे कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे ग्रील तयार करणे
साहित्य:
. 30×3 L-angle
2×2 स्क्वेअर जाळी
10×10 स्क्वेअर बार
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
Red oxide प्राइमर
काळा ऑइल पेंट
कृती:
. सर्व खिडक्यांचे अचूक मोजमाप घेतले. तीन वेगवेगळ्या मापांच्या ग्रीलची कॉस्टिंग केली व साहित्य खरेदी केले.30×3 L-angleवापरून सर्व ग्रीलची फ्रेम तयार केली. ४×७ ग्रीलसाठी फ्रेममध्ये 2×2 जाळी बसवली. त्यावर 4 इंच अंतरावर आडवे 10×10 स्क्वेअर बार लावले.व चार उभे स्क्वेअर बार बसवले. सर्व बार व अँगलची वेल्डिंग करून मजबुती दिली.वेल्डिंगनंतर संपूर्ण ग्रीलला ग्राइंडिंग करून स्मूथ फिनिश दिली. भिंतीत बसवण्यासाठी 30×3 अँगलचे चार तुकडे जोडले. ग्रीलला प्रथम Red Oxide प्राइमर लावला. त्यानंतर काळा ऑइल पेंट लावून फिनिशिंग दिले.
आलेल्या अडचणी :
.तीन वेगवेगळ्या मापांमुळे प्रत्येक ग्रीलसाठी फ्रेम वेगळ्या प्रकारे मोजावी लागली.
स्क्वेअर बारचे अंतर अचूक ठेवणे वेळखाऊ ठरले.
वेल्डिंग केल्यानंतर जॉइंट्स स्मूथ करण्यासाठी जास्त ग्राइंडिंग करावी लागली.
मोठ्या ग्रीलला हलवणे व सरळ ठेवणे कठीण गेले.
कॉस्टिंग :
| अ. क्र. | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 30X30x3 L angal | 210 kg | 70 | 14,700 |
| 2 | 10X10 [] BAR | 424 kg | 60 | 25,440 |
| 3 | 2X2 जाळी | [168] 2f | 22 | 3,696 |
| 4 | 30 x 3 पट्टी | 27 kg | 70 | 1,890 |
| 5 | रॉड पुडा | 3 | 400 | 1,200 |
| 6 | कटींग व्हिल | 20 | 25 | 500 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 20 | 30 | 600 |
| 8 | पॉलिश व्हिल | 10 | 30 | 600 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 2 | 200 | 400 |
| 10 | प्रायमर | 4 l | 240 | 960 |
| 11 | थीनर | 2 l | 120 | 240 |
| 12 | ब्रश | 4 | 40 | 160 |
| 13 | Electricity [10%] | 5,000 | ||
| 14 | मजुरी [15%] | 8,000 | ||
| 15 | TOTAL | 63,000 | ||
निरिक्षण :
सर्व ग्रील मजबूत व योग्य मापात तयार झाल्या. L-angle व स्क्वेअर बारच्या वापरामुळे ग्रीलची मजबुती खूप वाढली. पेंटिंगमुळे ग्रीलला आकर्षक मिळाले. संपूर्ण प्रक्रियेत मोजमाप अचूक ठेवणे सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे जाणवले.
निष्कर्ष :
.प्रकल्पातून आम्हाला ग्रील फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले. वेल्डिंग, ग्राइंडिंग, फ्रेम तयार करणे, प्राइमिंग आणि पेंटिंग या सर्व कामांचे चांगले ज्ञान झाले. गेस्ट हाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्रील्स यशस्वीरीत्या तयार करण्यात आल्या आणि कमी खर्चात उच्च गुणवत्ता मिळवली.
भविष्यातील उपयोग :
पुढील काळात अशाच प्रकारचे ग्रील, दरवाजे, फेन्सिंग किंवा खिडकी संरचना तयार करता येतील. या कौशल्याचा वापर करून स्वतंत्र काम किंवा व्यवसाय सुरू करता येईल.
कॉट तयार करणे
प्रस्तावना :
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक असा लोखंडी कोट (Cot) तयार करणे हा होता. कोटचे डिझाईन, फ्रेम तयार करणे, ग्राइंडिंग, वेल्डिंग, रेडऑक्साईड आणि पेंटिंग अशा सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष करून मेटल फॅब्रिकेशनचे मूलभूत कौशल्य आत्मसात करण्याचा हेतू या प्रकल्पातून साध्य केला.
सर्वे :
बाजारात उपलब्ध मेटल ट्यूब्सची जाडी, प्रकार आणि गुणवत्ता
1×2 स्क्वेअर ट्यूब व 1×1 सपोर्ट ट्यूबची मजबुती
वेल्डिंग व ग्राइंडिंगसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता
रेडॉक्साईड आणि ऑइल पेंटच, टिकाऊपणा आणि किंमत
उद्देश:
या कॉट तयार करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश असा होता की गेस्ट हाऊससाठी वापरता येईल असा मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी लोखंडी कॉट तयार करणे.
गेस्ट हाऊस मध्ये अधिक वापर व वजन सहन करणारे फर्निचर आवश्यक असते, त्यामुळे लोखंडी स्क्वेअर ट्यूबचा वापर करून मजबुतीला प्राधान्य देण्यात आले.
गेस्ट हाऊसच्या सोयीसाठी दीर्घकाळ टिकणारे, कमी देखभालीचे आणि सुरक्षित फर्निचर तयार करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता.
साहित्य:
1” x 2” स्क्वेअर ट्यूब
1” x 1” स्क्वेअर ट्यूब
0.75″ x 0.75″ स्क्वेअर ट्यूब
वेल्डिंग रॉड
ग्राइंडिंग डिस्क
पॉलिश व्हील
रेडऑक्साईड प्रायमर
काळा ऑइल पेंट
पॉलिश पेपर
लंबी
कटिंग मशीन, वेल्डिंग मशीन
कृती:
सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.
माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.
1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.
कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.
फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.
सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.
15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.
पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले
.संपूर्ण कोटला पॉलिश व्हीलने पॉलिश केले.
फ्रेमला गंज रोखण्यासाठी रेडऑक्साईड लावला.
रेडऑक्साईड सुकल्यावर जोईंट लंबी लावली त्यानंतर पॉलिश पेपरने घासले.
शेवटी कोटला काळा ऑइल पेंट लावून अंतिम फिनिशिंग दिले.
आलेल्या अडचणी :
1×1 सपोर्ट तुकड्यांचे मोजमाप अचूक ठेवणे
वेल्डिंग करताना ट्यूब सरळ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागली
ग्राइंडिंग करताना सरफेस पूर्ण सपाट आणण्यासाठी जास्त वेळ लागला
रेडॉक्साईड सुकण्यास उशीर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया थोडी उशीर झाली
पाय (Legs) व फ्रेम एकाच लेव्हलवर आणणे आव्हानात्मक होते
कॉस्टिंग :
| अ . क्र | मालाचे नाव | एकूण माल | दर | एकूण किंमत |
| 1 | 0.75 x 0.75 स्क्वेअर ट्यूब | 20′ | 25 | 500 |
| 2 | 1 x 2 स्क्वेअर ट्यूब | 360′ | 30 | 10,800 |
| 3 | 1 x 1स्क्वेअर ट्यूब | 100′ | 35 | 3,500 |
| 4 | 1/2 x 1/2 स्क्वेअर ट्यूब | 100′ | 40 | 4,000 |
| 5 | रॉड पुडा | 2 | 400 | 800 |
| 6 | कटींग व्हिल | 5 | 25 | 125 |
| 7 | ग्रीडिंग व्हिल | 5 | 30 | 150 |
| 8 | पॉलिश व्हिल | 3 | 30 | 150 |
| 9 | कटींग व्हिल [14 in] | 1 | 200 | 200 |
| 10 | लंबी | 2 kg | 500 | 1000 |
| 11 | प्रायमर | 2 L | 240 | 480 |
| 12 | थीनर | 2 L | 120 | 240 |
| 13 | काळा ऑईल पेंट | 2 L | 340 | 680 |
| 14 | रोलर | 1 | 50 | 50 |
| 15 | Electricity [10%] | 2,270 | ||
| 16 | मजुरी [15%] | 3,400 | ||
| 17 | total | 28,350 |
कृती:
सर्वप्रथम कोटचे पूर्ण डिझाईन तयार करण्यात आले.
माप, फ्रेमचे स्वरूप आणि सपोर्टचे स्थान निश्चित केले.
1×2 स्क्वेअर ट्यूब वापरून वरची मुख्य फ्रेम तयार केली.
कोपऱ्यांवर अचूक जॉइंट तयार करून वेल्डिंग केले.
फ्रेमच्या मजबुतीसाठी 1×1 च्या एकूण 2 सपोर्ट तुकड्या बसवल्या.
सर्व तुकडे समान अंतरावर बसवण्यात आले.संपूर्ण फ्रेम ग्राइंडिंग करून वेल्डिंग जॉइंट्स स्वच्छ आणि गुळगुळीत केले.
15 इंच लांबीचे 1.5×1.5 च्या ट्यूबचे पाय बसवले.
पायांना वेल्डिंग करून नंतर ग्राइंडिंग केले
निरिक्षण
वेल्डिंग व ग्राइंडिंगने कोटची मजबुती आणि फिनिशिंग उत्कृष्ट आली.
सर्व सपोर्ट तुकडे योग्य वापरल्यामुळे फ्रेमला मजबूत आधार मिळाला.
रेडऑक्साईडमुळे धातूचे गंजापासून संरक्षण झाले.
काळ्या पेंटमुळे कोट आकर्षक आणि टिकाऊ झाला.
निष्कर्ष :
या प्रकल्पातून मेटल फॅब्रिकेशनचे महत्त्वाचे कौशल्य — डिझाइनिंग, कटिंग, वेल्डिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग आणि पेंटिंग यांचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून एक मजबूत व दर्जेदार लोखंडी कोट तयार करण्यात आला.
भविष्यातील उपयोग :
घरगुती व हॉस्टेल वापरासाठी टिकाऊ कोट
कस्टम फर्निचर डिझाईनसाठी आधारभूत कौशल्य
विविध आकारमानाचे लोखंडी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी तांत्रिक ज्ञान
फेरो सिमेंट
प्रस्तावना
फेरो सिमेंट हे एक आधुनिक बांधकाम साहित्य आहे. यामध्ये सिमेंट, वाळू, पाणी आणि लोखंडी जाळी (Wire Mesh) यांचा वापर केला जातो. फेरो सिमेंट वजनाने हलके पण मजबूत असून कमी खर्चात टिकाऊ बांधकामासाठी वापरले जाते. आजकाल पाण्याच्या टाक्या, छप्पर, भिंती आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये फेरो सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
सर्वे
फेरो सिमेंटची माहिती मिळवण्यासाठी खालील सर्वे करण्यात आला:
बांधकाम कामगारांशी चर्चा
शिक्षक व पालकांकडून माहिती इंटरनेट व पुस्तकांचा अभ्यास जवळील फेरो सिमेंटच्या टाक्यांचे निरीक्षण
या सर्वेक्षणातून फेरो सिमेंटचे फायदे व उपयोग समजले.
उद्देश
या प्रकल्पाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:
फेरो सिमेंटची संपूर्ण माहिती मिळवणे
त्याचे घटक व रचना समजून घेणे
पारंपरिक सिमेंटपेक्षा असलेले फायदे जाणून घेणे
आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे
साहित्य
या प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य:
सिमेंट
वाळू
पाणी
लोखंडी जाळी (Wire Mesh)
वही, पेन व संदर्भ पुस्तके
कृती
फेरो सिमेंट तयार करण्यासाठी खालील कृती केल्या जातात:
- लोखंडी जाळीचा आवश्यक आकार तयार करणे
- सिमेंट व वाळूचे मिश्रण बनवणे
- हे मिश्रण जाळीवर थरांमध्ये लावणे
- योग्य प्रकारे पाणी शिंपडून curing करणे
निरीक्षण
फेरो सिमेंटच्या अभ्यासातून पुढील निरीक्षणे झाली:
फेरो सिमेंट हलके पण मजबूत असते
कमी जाडीमध्ये जास्त मजबुती मिळते
तडे जाण्याची शक्यता कमी असते देखभाल खर्च कमी असतो
निष्कर्ष
फेरो सिमेंट हे कमी खर्चात, टिकाऊ व मजबूत बांधकामासाठी उपयुक्त साहित्य आहे. आधुनिक बांधकाम क्षेत्रात फेरो सिमेंटला मोठे महत्त्व आहे. योग्य पद्धतीने वापर केल्यास याचे आयुष्य जास्त असते.
भविष्यातील उपयोग
फेरो सिमेंटचा भविष्यातील उपयोग:
पाण्याच्या टाक्या
घरांचे छप्पर व भिंती
प्रकल्पातून काय शिकलो
या प्रकल्पातून मला पुढील गोष्टी शिकायला मिळाल्या:
फेरो सिमेंट म्हणजे काय
आधुनिक बांधकाम साहित्याचे फायदे
सर्वेक्षण व निरीक्षण कसे करावे
माहिती व्यवस्थित मांडण्याची पद्धत
