सुरक्षिततेचे नियम
ऊर्जा पर्यावरण
- दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्त्रोत बंद आहे आणि फ्युज काढलेला आहे की नाही याची खात्री करावी, आणि “काम चालू आहे” असा फलक फ्युज जवळ लावावा.
- ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये विजेची कामे करताना रबरी हातमोजे आणि रबरी चप्पल किंवा रबरी बूट वापरावे.
- ऊर्जा पर्यावरण विभागामध्ये उपकरणांना आणि विजेच्या बोर्डला व्यवस्थित अर्थिंग केलेली आहे की नाही याची खात्री करावी.
- जर इलेक्ट्रिकल विभागामध्ये शॉर्ट-सर्कीटमुळे आग लागली तर पाण्याचा वापर करू नये. मातीचा आणि रेतीचा वापर करावा.
- फ्युज मध्ये फ्युज वायरचाच वापर करावा.
- टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करावा, त्याचा वापर स्क्रू-ड्रायवर म्हणून करू नये.
- विजेची कामे करताना व्यवस्थित विद्युत रोधक आवरण असलेली उपकरणे वापरावी.
- विजेचा धक्का लागत असलेल्या माणसाला स्पर्श करू नये. त्या व्यक्तीला विजेपासून दूर करण्यासाठी लाकडी काठी किंवा विद्युत रोधक वस्तूचा वापर करावा.
- कामाची जागा वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ करावी.
- योग्य तो अग्निशामक संच विभागामध्ये उपलब्ध असावा, त्याचा वापरण्याचा दिनांक तपासून घ्यावा.
- जखम झाल्यानंतर प्राथमिक उपचार पेटीचा वापर करावा, प्राथमिक उपचार पेटी गृह विभागात उपलब्ध आहे.
