दैनंदिनी (नर्सरी व्यवस्थापन):
आज आम्ही नर्सरी व्यवस्थापन या विषयाचे प्रात्यक्षिक केले.
सुरुवातीला नर्सरी परिसराची स्वच्छता करून सर्व साहित्य,
कुंड्या आणि ट्रे व्यवस्थित लावले.
त्यानंतर रोपांची पाहणी करून सर्व कुंड्या एकसारख्या रांगेत योग्य ठिकाणी ठेवण्यात आल्या.
रोपांना आवश्यकतेनुसार माती भरली,
पाणी दिले आणि त्यांची योग्य प्रकारे देखभाल केली.
यामध्ये चिंच, जांभूळ, गुलाब, नागिणीचे पान (Snake Plant),
विविध शोभेची झाडे, तुळस, कढीपत्ता, मोगरा, जास्वंद तसेच इतर अनेक प्रकारच्या रोपांची लागवड व संगोपन केले.
बीज ट्रेमध्ये योग्य प्रमाणात माती भरून काही नवीन रोपांची लागवड करण्याची प्रक्रियाही शिकली.
प्रत्येक रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली काळजी,
पाणी व्यवस्थापन, योग्य प्रकाश, स्वच्छता आणि नियमित निरीक्षण यांचे महत्त्व समजून घेतले.
या प्रात्यक्षिकामुळे नर्सरीचे नियोजन,
रोपांची योग्य मांडणी, लागवड, देखभाल आणि नर्सरी स्वच्छ व आकर्षक ठेवण्याचे कौशल्य आत्मसात करता आले.
याचा भविष्यात शेती व बागायती क्षेत्रात निश्चितच उपयोग होईल.
नर्सरी मध्ये आम्ही हे प्रॅक्टिकल शिकलो.
