बीज प्रक्रिया (Seed Treatment) म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यावर रासायनिक, जैविक किंवा इतर पदार्थांची प्रक्रिया करून बियाण्याचे संरक्षण करणे. यामुळे उगवण चांगली होते, रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.
बीज प्रक्रिया चे फायदे.
बीज प्रक्रियेचे फायदेबियाण्याची उगवण चांगली होते.
बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
सुरुवातीच्या अवस्थेत रोपे निरोगी राहतात
.उत्पादन आणि दर्जा सुधारतो.
बियाण्याची नासाडी कमी होते.
बीज प्रक्रिया चे प्रकार.
बीज प्रक्रियेचे प्रकाररासायनिक बीज प्रक्रियाबुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरून केली जाते.उदाहरण: थायरम, कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब (पिकानुसार शिफारस केलेले औषध वापरावे).जैविक बीज प्रक्रियाउपयुक्त सूक्ष्मजीव वापरले जातात.उदाहरण: रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी (फॉस्फेट विद्रावक जीवाणू), ट्रायकोडर्मा.सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रियाझिंक, मॉलिब्डेनम इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून रोपांची वाढ सुधारली जाते.
