शेंगदाणा खारे हा पौष्टिक, चविष्ट व स्नेक आहे. यामध्ये चांगले फॅट्स आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळते.

साहित्य

साहित्य प्रमाण, शेंगदाणे 2 किलो, मीठ 500 ग्रॅम, पाणी 4L खायचे तेल आवश्यकतेनुसार .

कृती

शेंगदाणे स्वच्छ निवडून घेणे. पाण्यात मीठ पूर्णपणे खारट द्रावण करा. शेंगदाणे या द्रावणात30-60 मिनिटे भिजवा. भिजलेले शेंगदाणे बाहेर काढून पाणी निथळून घ्या. शेंगदाणे ड्रायर मध्ये वाळवून घ्या. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा. अतिरिक्त तेल निघाल्यावर पूर्ण थंड करा. 100g किंवा200g पॅकेटमध्ये भरून सील करा. लेबल लावून साठवण करा

कॉस्टिंग

शेंगदाणे(2kg×145)=290.00, मीठ(0.5kg×30)=15.00, गॅस/वीज खर्च 13.75, पॅकिंग(12 पिशव्या×4.91)=56.00, एकूण खर्च 374.75

10% इतर खर्च 31.06 एकूण उत्पादन खर्च 405.81

जर12 पॅकेट तयार झाले तर,

प्रति पॅकेट खर्च=405.81÷12=33.81(अंदाजे)

पौष्टिक मूल्य

प्रथिने भरपूर, चांगले फॅट्स, ऊर्जा देणारा स्नेक, फायबर व खनिजे

,,