Lathe Machine (लेथ मशीन) :
- लेथ मशीन हे वर्कशॉपमध्ये वापरले जाणारे एक महत्त्वाचे मशीन टूल आहे. याचा उपयोग धातू, प्लास्टिक किंवा इतर योग्य Workpiece ला आवश्यक आकार आणि माप देण्यासाठी केला जातो.
- लेथ मशीनमध्ये मुख्यतः Workpiece फिरतो आणि Cutting Tool त्यावर कटिंग प्रक्रिया करतो. यामुळे गोलाकार, बेलनाकार आणि शंकूच्या आकाराचे विविध पार्ट्स तयार करता येतात.
लेथ मशीनचे कार्य :
- लेथ मशीनमध्ये प्रथम Workpiece Chuck मध्ये घट्ट पकडला जातो. मशीन सुरू केल्यानंतर Spindle च्या साहाय्याने Workpiece फिरतो. त्यानंतर Cutting Tool ला योग्य दिशेने पुढे नेले जाते.
- Cutting Tool Workpiece वरील अतिरिक्त धातू काढून टाकते आणि आवश्यक आकार तयार करते. योग्य माप मिळेपर्यंत ही प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने केली जाते.
लेथ मशीनचे प्रमुख भाग :
- Bed – मशीनच्या सर्व भागांना मजबूत आधार देतो.
- Headstock – वर्कपीस फिरवण्यासाठी आवश्यक यंत्रणा यात असते.
- Chuck – वर्कपीस घट्ट पकडून ठेवतो.
- Tailstock – लांब वर्कपीसला आधार देण्यासाठी वापरला जातो.
- Carriage – कटिंग टूलला वर्कपीसच्या दिशेने नियंत्रित हालचाल करण्यास मदत करते.
- Tool Post – कटिंग टूल घट्ट पकडून ठेवतो.
- Lead Screw – Threading सारख्या कामांसाठी वापरला जातो.
- Spindle – Chuck आणि वर्कपीसला फिरवण्यास मदत करते.
लेथ मशीनवर केली जाणारी कामे :
- Turning – वर्कपीसचा व्यास कमी करण्यासाठी.
- Facing – वर्कपीसचा टोकाचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी.
- Drilling – छिद्र पाडण्यासाठी.
- Threading – बाहेरील किंवा आतील थ्रेड तयार करण्यासाठी.
- Knurling – पृष्ठभागावर विशिष्ट pattern तयार करण्यासाठी.
- Taper Turning – शंकूच्या आकाराचा पृष्ठभाग तयार करण्यासाठी.
- Boring – आधीच्या छिद्राचा आकार वाढवण्यासाठी.
लेथ मशीन वापरताना घ्यावयाची काळजी :
- मशीन सुरू करण्यापूर्वी सर्व भाग व्यवस्थित तपासावेत.Workpiece Chuck मध्ये घट्ट बसवावा.Cutting Tool योग्य प्रकारे घट्ट बसवावे.
- Safety goggles वापरावेत.सैल कपडे, दागिने आणि मोकळे केस मशीनपासून दूर ठेवावेत.मशीन चालू असताना फिरणाऱ्या Workpiece ला हात लावू नये.
- मशीन सुरू असताना मोजमाप घेऊ नये.धातूचे तुकडे हाताने काढू नयेत; योग्य Brush वापरावा.
- मशीनमध्ये असामान्य आवाज किंवा vibration जाणवल्यास मशीन बंद करावे.काम पूर्ण झाल्यावर मशीन बंद करून परिसर स्वच्छ ठेवावा.