नर्सरीचे प्रकार:
१)
कालावधीनुसार:
तात्पुरती नर्सरी : विशिष्ट हंगाम किंवा मर्यादित कालावधीसाठी उभारली जाते.
कायमस्वरूपी नर्सरी वर्षभर रोपे तयार करण्यासाठी.
यामध्ये स्वतःची जमीन, शेडनेट कार्यालय व सिंचन व्यवस्था असते.
विक्री व व्यापार करण्यासाठी झाडे लावण्यापूर्वी माती तयार करणे.
जेणेकरून मातीतील अन्नद्रव्ये त्यांच्या मुळांना मिळतील.
नर्सरीतील मुख्य कामे आणि व्यवस्थापनमाती तयार करणे: रोपांच्या वाढीसाठी आणि विक्रीसाठी माती सुटसुटीत व हलकी केली जाते.
मिश्रण प्रमाण: उत्तम वाढीसाठी साधारणपणे
२ भाग माती, १ भाग शेणखत आणि १ भाग वाळू एकत्र करून मिश्रण बनवले जाते.
रोप निर्मिती: बिया, फांद्या (काड्या), पाने आणि फुले यांपासून नवीन झाडे तयार केली जातात.
कलम करणे वनस्पतींचे विविध भाग वापरून नवीन दर्जेदार झाडे तयार केली जातात.
रुटिंग पावडरचा वापर: नवीन रोपे किंवा कलमे तयार करताना मुळे लवकर फुटण्यासाठी त्यांचे टोक रुटिंग पावडरमध्ये बुडवून लावले जाते.
कालावधी: योग्य निगा राखल्यास साधारणपणे १ ते १८० दिवसांच्या कालावधीत नवीन रोपे विक्रीसाठी तयार होतात.
नर्सरी व्यवसायाचे महत्त्व आणि फायदेखात्रीशीर आणि निरोगी रोपे: चांगल्या नर्सरीमधून शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना कीडमुक्त, सशक्त आणि उच्च दर्जाची रोपे मिळतात.
हंगामपूर्व लागवड: मुख्य शेतात लागवड करण्यापूर्वी नर्सरीत आधीच रोपे तयार ठेवून वेळेची बचत करता येते.
रोजगार निर्मिती: नर्सरी व्यवसायामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल मजुरांना वर्षभर रोजगार मिळतो.
आर्थिक फायदा: फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर विक्री करून चांगला नफा मिळवता येतो.
