Arc Welding (आर्क वेल्डिंग) :
आर्क वेल्डिंग ही दोन धातूचे भाग उष्णतेच्या साहाय्याने जोडण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत इलेक्ट्रोड आणि Workpiece यांच्यामध्ये Electric Arc निर्माण केला जातो. या Arc मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने धातूचा भाग आणि इलेक्ट्रोड वितळतात. थंड झाल्यानंतर वितळलेला धातू मजबूत जोड तयार करतो.
आर्क वेल्डिंगचे प्रमुख भाग :
Welding Machine – वेल्डिंगसाठी विद्युत प्रवाह पुरवते.
Electrode – जोड तयार करण्यासाठी वापरला जातो.
Electrode Holder – इलेक्ट्रोड पकडण्यासाठी.
Welding Cable – विद्युत प्रवाह नेण्यासाठी.
Earth Clamp – Workpiece ला विद्युत सर्किटशी जोडण्यासाठी.
Workpiece – जोडायचे धातूचे भाग.
आर्क वेल्डिंगची प्रक्रिया
सर्वप्रथम जोडायचे धातूचे भाग स्वच्छ करून योग्य स्थितीत ठेवले जातात. त्यानंतर ते व्यवस्थित fix केले जातात. Electrode Holder मध्ये योग्य Electrode बसवला जातो. मशीन सुरू करून Electrode आणि Workpiece यांच्यामध्ये Arc निर्माण केला जातो. निर्माण झालेल्या उष्णतेमुळे धातू वितळतो आणि थंड झाल्यावर मजबूत जोड तयार होतो.
Arc Welding चा उपयोग :
-आर्क वेल्डिंगचा उपयोग लोखंडी गेट, ग्रिल, मशीन पार्ट्स, पाइप, वाहनांचे पार्ट्स आणि विविध धातूंच्या संरचना जोडण्यासाठी केला जातो.
Arc Welding करताना काळजी :
Welding helmet आणि योग्य safety gloves वापरावेत.
वेल्डिंगच्या प्रकाशाकडे थेट पाहू नये.
कामाची जागा हवेशीर ठेवावी.
विद्युत वायर व कनेक्शन व्यवस्थित तपासावे.
ओल्या हाताने किंवा ओल्या जागेत विद्युत उपकरणे हाताळू नयेत.
वेल्डिंगनंतर गरम धातूला लगेच हात लावू नये.