तारेचे जोड करणे
तारेचे दोन टोक एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला तारेचे जोड (Wire Joint) असे म्हणतात.
तारेचे जोड करण्याची पद्धत
- प्रथम वीजपुरवठा पूर्णपणे बंद करावा.
- वायरवरील इन्सुलेशन आवश्यक तेवढे काढावे.
- दोन्ही तारांची टोके स्वच्छ करावीत.
- तारांची टोके एकमेकांना घट्ट वळवून जोडावीत.
- जोडावर इन्सुलेशन टेप किंवा योग्य कनेक्टर लावावा.
- जोड सैल नाही याची तपासणी करूनच वीजपुरवठा सुरू करावा.
प्रमुख जोड: ट्विस्टेड जॉइंट, स्ट्रेट जॉइंट, टी-जॉइंट आणि ब्रिटानिया जॉइंट.