५) निरीक्षण

  • फिल्टरमधून गेलेले पाणी तुलनेने स्वच्छ दिसते.
  • मोठ्या घन अशुद्धता खडीच्या थरात अडतात.
  • लहान कण वाळूत अडतात.
  • दुर्गंधी व रंग कोळसा/चारकोल कमी करतो.
  • स्टार्टर (Starter)
  • स्टार्टरSTARTER म्हणजे काय?
  • स्टार्टर हा इलेक्ट्रिक मोटर सुरक्षितपणे सुरू (Start) करण्यासाठी वापरला जाणारा विद्युत उपकरण आहे. तो मोटरला जास्त करंट, शॉर्ट सर्किट व ओव्हरलोडपासून संरक्षण देतो.
  • १. प्रस्तावना :
  • विज्ञान आश्रममध्ये इलेक्ट्रिकल कोर्स करत असताना आम्ही जुनी मोटर व स्टार्टर यांचे कार्य, भाग, कनेक्शन व वायरिंग प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे शिकलो. स्टार्टरमुळे मोटर सुरक्षित व नियंत्रित पद्धतीने सुरू होते हे समजले.
  • २. उद्देश :
  • स्टार्टरचे कार्य समजून घेणे.
  • स्टार्टरमधील भाग ओळखणे.
  • मोटर–स्टार्टर कनेक्शन व वायरिंग शिकणे.
  • बिघाड शोधून दुरुस्ती करणे.
  • ३. कृती :
  • वीजपुरवठा बंद केला.
  • स्टार्टर उघडून कॉन्टॅक्टर, ओव्हरलोड रिले, पुश बटण तपासले.
  • मोटरच्या टर्मिनल बॉक्समध्ये वायरिंग तपासली.
  • सैल/जळालेले कनेक्शन दुरुस्त केले.
  • योग्य कनेक्शन करून चाचणी घेतली.
  • ४. निरीक्षण :
  • सैल कनेक्शनमुळे मोटर सुरू होत नव्हती.
  • ओव्हरलोड रिले चुकीच्या सेटिंगवर होते.
  • दुरुस्तीनंतर मोटर सुरळीत सुरू झाली.
  • ५. निष्कर्ष :
  • या प्रॅक्टिकलमधून स्टार्टरचे महत्त्व, भाग, वायरिंग व संरक्षण पद्धती समजल्या. मोटर सुरक्षितपणे सुरू करण्याचे ज्ञान मिळाले व आत्मविश्वास वाढला.
  • टोटल खर्च
    920
    मजुरी
    120
    TOTAL=
    1040