पाणी परीक्षण (Water Testing) हे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पिकाला दिले जाणारे पाणी योग्य दर्जाचे नसेल, तर त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर आणि जमिनीच्या सुपीकतेवर होतो.
२. पाणी परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा? (How to take a Water Sample)योग्य निकाल मिळण्यासाठी पाण्याच्या नमुना योग्य पद्धतीने घेणे गरजेचे आहे:स्वच्छ बाटली वापरा: नमुन्यासाठी प्लास्टिकची १ लिटरची स्वच्छ बाटली वापरा.
(पूर्वी औषध किंवा केमिकल्स असलेल्या बाटल्या वापरू नका).
विहीर / बोअरवेलचा नमुना: विहीर किंवा बोअरवेल सुरू केल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी पाणी वाहू द्या, त्यानंतरच बाटलीमध्ये नमुना भरा.
नदी, नाला किंवा शेततळे: पाण्याचा प्रवाह चालू असलेल्या ठिकाणाहून मधोमध थोडे खोलवर हात नेऊन पाणी भरा.
काठावरचे साचलेले पाणी घेऊ नका.
बाटली भरणे: बाटली पूर्ण भरण्यापूर्वी ती त्याच पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
बाटली पूर्ण भरून घट्ट झाकण लावा, जेणेकरून त्यात हवा राहणार नाही.
माहितीचे लेबल लावा: बाटलीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर,
पाण्याचा स्रोत (विहीर/बोअरवेल) आणि नमुना घेतल्याची तारीख स्पष्ट अक्षरात लिहापानी का पीएच स्केल (pH Scale) 0 से 14
केलेले पाणी परीक्षण
ph 8
ec. 656
TDS 329
निगेटिव्ह रिझल्ट

)