Ferrocement (फेरो सिमेंट)-

  • Ferrocement ही सिमेंट मोर्टार आणि बारीक लोखंडी जाळी (Wire Mesh) वापरून तयार केली जाणारी बांधकाम पद्धत आहे.
  • यामध्ये लोखंडी जाळीला योग्य आकार देऊन त्यावर सिमेंट, बारीक वाळू आणि पाण्याचे मिश्रण लावले जाते.
  • सिमेंट मोर्टार घट्ट झाल्यानंतर मजबूत आणि टिकाऊ संरचना तयार होते.

प्रमुख साहित्य:

  • सिमेंट
  • बारीक वाळू
  • पाणी
  • लोखंडी जाळी
  • (Wire Mesh)लोखंडी तार

तयार करण्याची प्रक्रिया:

  • प्रथम लोखंडी जाळी आवश्यक आकारात तयार केली जाते.
  • जाळीला योग्य आकार देऊन घट्ट बांधले जाते.सिमेंट आणि बारीक वाळूचे मोर्टार तयार केले जाते.
  • हे मोर्टार लोखंडी जाळीवर व्यवस्थित लावले जाते.संपूर्ण जाळी मोर्टारने झाकल्यानंतर Curing केले जाते.
  • मोर्टार पूर्णपणे मजबूत झाल्यानंतर तयार Ferrocement संरचना वापरली जाते.

उपयोग:

  • पाण्याच्या टाक्या,छत व भिंती छोटे पूल,नाले
  • शेतीतील विविध संरचनाविविध आकाराच्या बांधकाम वस्तू

फायदे:

  • मजबूत आणि टिकाऊ असते.
  • तुलनेने कमी जाडीची संरचना तयार करता येते.
  • विविध आकारांमध्ये तयार करता येते.
  • योग्य पद्धतीने तयार केल्यास पाण्याच्या साठवणुकीसाठी उपयुक्त असते.
  • दुरुस्ती व देखभाल तुलनेने सोपी असते.

काळजी:

  • लोखंडी जाळी योग्य प्रकारे बसवावी.
  • मोर्टार जाळीवर पूर्णपणे आणि समान प्रमाणात लावावे.
  • तयार संरचनेचे योग्य Curing करावे.
  • काम करताना हातमोजे व इतर आवश्यक सुरक्षा साधने वापरावीत