सुरक्षिततेचे नियम – ऊर्जा पर्यावरण

1 दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्रोत बंद आहे आणि फ्यूज 2 काढलेला आहे याची खात्री करावी. तसेच “काम चालू आहे” असा फलक लावावा.

3 विद्युत काम करताना रबरी हातमोजे आणि रबरी चप्पल/बूट वापरावेत.

.4 उपकरणे आणि विद्युत बोर्डला योग्य अर्थिंग केलेली आहे याची खात्री करावी

5 शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्यास पाण्याचा वापर करू नये. माती किंवा वाळू वापरावी.

6 फ्यूजमध्ये योग्य फ्यूज वायरच वापरावी.

7 टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही हे

8 टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही हे तपासण्यासाठी करावा. त्याचा स्क्रूड्रायव्हर म्हणून वापर करू नये.

9 विद्युत काम करताना योग्य विद्युतरोधक साधने वापरावीत.

10 विजेचा धक्का लागलेल्या व्यक्तीला थेट स्पर्श करू नये. तिला विजेपासून दूर करण्यासाठी लाकडी काठी किंवा विद्युतरोधक वस्तू वापरावी.

11 कामाची जागा कामापूर्वी आणि कामानंतर स्वच्छ करावी.

12 योग्य प्रकारचे अग्निशामक यंत्र उपलब्ध ठेवावे आणि त्याची तपासणी/वैधता तपासावी.

13 जखम झाल्यास प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध असावी आणि तिचा वापर करावा.

.