बिज प्रकीया..
बीजप्रक्रिया’ म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. याने तद्नंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.बीजप्रक्रियेसाठीचे साहित्य : बियाणे, बुरशीजन्य औषधे: ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी इत्यादी.साधने : घमेले, बादली, रद्दी पेपर, हातमोजे इत्यादी.कृती:बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर खरेदी करतात. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती एका मातीच्या कुंडीत घेऊन पेरतात. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरून त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता.