*  उद्देश ;- डम्पी लेव्हलच्या साह्याने काटूर काढ़ने 


* साहित्य ;- डम्पी लेव्हल, वही पेन  


* कृती ;- सर्वात प्रथम बंधाऱ्याच्या मध्य भागी खोलगट जागेत  `स्टॅन्ड उभा करावा व स्टॅन्ड ची लेव्हल                     काढा 

२) डम्पि लेव्हल या उपकरणाला असलेली दुर्बीण तीन पैकी दोन फूट स्क्रूना समांतर ठेवावी . त्या नंतर ते       दोन्ही स्क्रू एकाच वेळी आत किंवा बाहेर फिरवून स्पिरिट लेव्हलमधील बुडबुडा बरोबर मध्यावर               आणावा 

३) त्यानंतर उरलेला तिसरा फूट स्क्रू ला दुर्बीण काटकोनात येईल अशा रीतीने फिरवावी . दुर्बीण स्क्रूवर     आणल्यानतंर हा तिसरा फूट स्क्रू योग्य रीतीने आत किंवा बाहेर फिरवून  बुडबुडा मध्यावर आणावा . 

४) दुर्बीनीत मध्यभागी तारेची फुली असते . याच्या वर व खाली दोन आडव्या रेषा असतात यांना स्टेडीय       म्हणतात 


* व्याख्या ;- समोच्च रेषा (कंटूर )  म्हणजे एका ठराविक ठिकाणापासून सारख्या उंचीवर असणाऱ्या                            ठिकाणांना जोडणारी रेषा होय 


डम्पि लेव्हल वापरताना स्पिरिट लेव्हल मधील बुडबुडा मध्यभागी आहे किंवा नाही हे वेळोवेळी अवश्य पहा 


* कौशल्ये ;- डम्पि लेव्हल स्टॅंडचा उपयोग करता येणे 

                    २) दिशा मार्क करता येणे , बेअरिंग (कोण ) मोजता येणे 

                    ३) दुर्बिणीमधून स्टाफवरील रिडींग बरोबर वाचता येणे 

                    ४) कंटूर लाईन्स काढता येणे