शेळीपालन
शेळीपालनाच्या पद्धती
1.बंदिस्त शेळीपालन पद्धती
2.अर्धबंदिस्त. शेळीपालन पद्धती
बंधीस्त शेळीपालन
शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.
अर्धबंदिस्त शेळीपालन
शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.
1.उस्मानाबादी
मूळ स्थान :लातूर ,तुळजापूर ,उदगीर, उस्मानाबाद
रंग :काळा
पाळण्याचा उद्देश :दूध ,मटन
शरीराचे वजन :नर = 50 मादी = 40
जुळे देण्याची क्षमता : 60%ते 80%
वैशिष्टे :1. चविष्ट मटणसाठी प्रसिद्ध
2. दोन पिले देते .
3. रोग प्रतिकरक शक्ति उत्तम
2. सानेन
मूळ स्थान : स्विझरलँड
रंग : पांढरा
पाळण्याचा उद्देश: दूध
शरीराचे वजन :नर =80 ,मादी =65
जुळे देण्याची क्षमता 65%
वैशिष्टे :1. जगात सर्वात जास्त दूध देणारी जात.
2. दररोज 3 ते 4.5 लीटर दूध देवू शकते.
3. सांगमनेरी
मूळ स्थान : सांगमनेर ,अहमदनगर
रंग :पांढरा किवा क्वचित दुसऱ्या रंगाचे ठिबके असतात .
पाळण्याचा उद्देश : दूध ,मटन
शरीराचे वजन :नर =40 ,मादी =50
जुळे देण्याची क्षमता : 25%
वैशिष्टे :1. संख्या कमी होत चालली आहे
2. संवर्धनाची गरज आहे
4. सिरोहि
मूळ स्थान : राज्यस्थान गुजरात पालमपुर
रंग : मुख्यता तपकिरी त्यावर हलक्या तपकिरी रंगाचे ठिबके असतात .
पाळण्याचा उद्देश :दूध , मटन
शरीराचे वजन : नर = 70 ,मादी = 40 ते 50
जुळे देण्याची क्षमता : 40%
वैशिष्टे :1. बंधीस्त शेळीपालणासाठी उपयूक्त
2. बकरी ईद साथी विशेष मागणी .
5. आफ्रिकन बोअर
मूळ स्थान : दक्षिण आफ्रिका
रंग : मानेवर गडद तपकिरी व पूर्ण शरीरावर पांढरा
पाळण्याचा उद्देश : दूध , मटन
शरीराचे वजन :नर =100 ते 130 , मादी 70 ते 90
जुळे देण्याची क्षमता : 90%
वैशिष्टे :1. खायला व्यवस्तीत मिळाल्यास दाररोज 200 ते 250g वजनात वाढ
6. बीटल
मूळ स्थान :पंजाब , हरियाणा
रंग :90% शेळयांमध्ये काळा रंग
पाळण्याचा उद्देश :दूध , मटन
शरीराचे वजन : नर 80=120 , मादी =60
जुळे देण्याची क्षमता : 53%
वैशिष्टे :1. बंधीस्त शेळी पालणासाठी उपयुक्त
2. नरामध्ये दाट दाढी असते .
3. मादीमध्ये दाडी आढळत नाही .