प्रात्याक्षिक :- प्राण्याचे अंदाजे वजन काढणे
साहित्य :- वजनकाटा ,मीटर टेप ,दोरी
कृती :-प्रथम शेळीच्या पोटाची जाडी मोजली नंतर तिला दोरीच्या साहायनी वजन काट्यावर अडकवले अशा प्रकारे वजन केले .
उद्देश :-गाईचे वजन काढणे सूत्र = अ *अ * ब /१०४१४
अ=छातीचे घेरा
अ =शिगपासून ते माकड हाडा परयेणथ लांबी { कम }
वजन =२०० *२००*२१५ /१०४१४
=८२५ .८११४४०७७२०४
गाईचे वजन =८२५.८११४४०७७२०४

प्रात्याक्षिक :- प्राण्याचे तापमान मोजणे
साहित्य :- थरमा मीटर ,वही ,पेन
कृती :- आधी आम्ही आम्हाला लागणारे साहित्य जमा केल त्या नंतर तिगा जनानी त्या शेळीला पकडल आणि त्या नंतर त्याचे आम्ही तापमान चेक केले . तसंच आम्ही गायाचे पण केले . त्या गायाणा आम्ही बांधल त्या नंतर त्याचे आम्ही तापमान चेक केले .
निरीक्षण :-
प्राण्याचे नाव | तापमान |
गौरी | १०३.३ f |
सोनम | १०१.२ f |
आफ्रिरीकन शेळी | १०२.२ f |
शिरॉई शेळी | १०१.४ f |
उसमानाबादी | १०१.३ f |
उसमानाबादी cross | १०१.१ f |


प्रात्याक्षिक :-बीज प्रक्रिया करणे .
साहित्य :- कांदा बी , m-45 पावडर , हँडग्लोज ,
उद्देश :- कांदा पिकाची बिजप्रक्रिया करणे .
कृती :-
1] सुरवातीला लागणारे साहित्य गोळा केली .
2] त्या नंतर हातात हँडग्लोज घालून कांद्याच्या बी मध्य म-45 पावडर टाकली .
3] आणि हाताने मिक्स केले
4] नंतर बीजप्रक्रिया केली बी प्लॉटवर पेरले आणि पानी दिले .
5] अशा प्रकारे बीजप्रक्रिया केली .
फायदे :-
1] उगवण क्षमता वाढते .
2] पिकांचे संगापान चांगल्या प्रकारे होते
3] पिकांची रोग प्रतिक्रिया शक्ति वाढते .
4] जमिनीचे आपयकारण जिवाणू पासून शंवरक्षण होते .




प्रात्याक्षिक :- शेतातील तण नियंत्रण करणे
साहित्य :- खुरपे रसायन – mecna 71,ozon , फवारणी यंत्र ,पाणी , इत्यादी .
कृती :- प्रथम शेतातील तण खुरप्याच्या साहाय्याने काढून टाकले नंतर फवारणी यंत्राच्या साहाय्याने रसायनाची फवारणी केली . फवारणी करताना हँडग्लोज मास्क इत्यादी . गोष्टी घालून फवारणी केली फवारणी आधी 16 लिटर पाणी घेतले त्यात 100ml ओझोन टाकले .
काळजी:- फवारनी करताना मास्क घालणे गरजेचे आहे . कारण रसायन विषारी असल्याने त्याचे दुष्परिणाम होतात . हॅन्डग्लोज घालून गरजेचे असते कारण विषारी रसायन हाताला लागण्याने ते अन्नाच्या मार्फे आपल्या पोटात जाण्याची भीती असते . तसेच काम झाल्यावर हात स्वच्छ साबणाने धुणे महत्वाचे आहे . तसेच फवारणी करताना एखादी व्यक्ती आपल्या जवळ येणार नाही याची सुद्धा काळजी घेणे असत महत्त्वाचे आहे फवारणी करताना त्या रासायनाचे प्रमाण सुद्धा बरोबर असणे गरजेचे आहे . कारण रसायनाचा अति वापर सुद्धा पिकांन साठी हानिकारक ठरू शकते .


प्रात्याक्षिक :- पिकाचा नफा तोटा अहवाल
कामाचा तपशील | नोंद | रुपये |
१) लागवडी खालील क्षेत्र | ६१५६०० | |
जमीन तयार करणे १) गवत काढणी २) सप्या तयार करणे | १)आम्ही शेतातील गावात व वाफे तयार करण्यात दोन तास गेले २) ५ तास | १)- ४५ रु २)- ३१५ रु |
१) बियांची लागवड करणे २) भेंडी – ५० ग्राम बी टाकणे | १ तास | २० रु -४५ रु |
प्रात्याक्षिक :- मिरची रोपाची बीजप्रक्रिया करणे
साहित्य:- पाणी , द्रायकोडमा , मग , मिरची ची रोपे
कृती:- रोपे सुरवातीला द्रायकोडमा पावडर मध्ये बुडवली त्या नंतर हाताने माती मध्ये छोटासा खड्डा केला . त्या मध्ये रोप लावली व हलक्या हाताने आजूबाजूला माती दाबली व त्यावर हळुवार पने पाणी सोडले . त्या नंतर आम्ही पॉलिहाऊस एका मिट्या पाईपमध्ये पाणी सोडन त्या मध्ये छोटी छोटी मिरचीची रोपे लावली व त्या मध्ये पाणी सप्लाय केले .
निरीक्षण:- मिरचीची रोपे चार मिनिट ट्रायकोडम पावडर मध्ये बुडवून ठेवली त्या नंतर त्याची वाढ चांगली झाली पाहिजे म्हणून पाईपमध्ये पाणी सोडल्या मुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यात मदत होते आणि पिकाला सुद्धा गरजे Iqbal पाणी दिले जाते


प्रात्याक्षिक :- सिडलिंग ट्रे मध्ये रोपे करणे .
उद्देश :- वनस्पती प्रसार पद्धतीचा आभ्यास करणे .
साहित्य:- कोको पिट , सिडलिंग ट्रे , मिरची बिया ,पुण्य जव्हल
कृती :-
- १) सर्व प्रथम लागणारी साहित्य जमा केली .
- २) त्या नंतर सिडलिंग ट्रे घेतला त्या ट्रे मध्ये कोकोपीट टाकले .
- ३) नंतर मिरचीच्या बिया टाकल्या आणि त्या नंतर कोकोपीट टाकले .
- ४) अशा रीतीने एकूण सहा ट्रे भरले .
- ५) त्या नंतर ते सर्व ट्रे पॉली हाऊस मध्ये नेऊन ठेवले व त्या वर पाणी मारून घेतले
- ६) अशा रीतीने सिडलिंग ट्रे मध्ये रोपे लावली .
काळजी :-
- १) सिडलिंग ट्रे स्वच्छ धुवून घेतलेले असावी .
- २) तयार कोकोपीट घ्यावे .
- ३) बियानाचे हाताने सिडलिंग ट्रे मध्ये रोपे करावे .


प्रात्याक्षिक :- गोठ्यातील नोंदीची अभ्यास करणे .
- गाईचा खांद्याच्या नोंदी
दिनांक | मुरघास | बाजरी | हरभरा काड | गोळी पेंट | भुसा | दूध |
२२/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | १२.३ lit |
२३/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | १२.२ lit |
२४/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | १०.९ lit |
२५/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | ११.८ lit |
२६/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | १५.० lit |
२७/८/२०२२ | २२kg | २०kg | ५kg | ३kg | २.५ kg | १४.७ lit |
- गायीचे आजार
दिनांक | गाई | लक्षणे | उपचार |
२२/८/२०२२ | सोनम | सडाला सुज येणे | Wispwy स्प्रे मारणे |
प्रात्याक्षिक :- शेतातील अवजारांचा अभ्यास करणे .
- उपयोग येणारे हत्यारे पुढील प्रमाणे :-
१) विळा :- गवत , जनावराचा चारा ,व पिकांची कापणी करण्यासाठी .
२) खुरपे :- पिकांची निदनी करण्यासाठी .
३) कुऱ्हाड :- शेतातील अनावश्यक झुडपे तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करतात .
४) टिकाव :- कमी क्षेत्रात जमीन खोडण्या साठी वापर करतात शेताच्या कडेवारील व शेतातील अनवश्याक झुडपे कडण्यासाठी वापरतात .
५ ) पवडी :– वाफे तयार करण्यासाठी माती ओढण्या साठी .
६ ) फावडे :- कमी क्षेत्रात जमिनीला सारी ,वरंबा , वाफे व आळे करण्यासाठी या हत्यारची वापर करतात . तसेच शेतात पाणी भरण्या साठी .
प्रात्यक्षिक :- जनावराचे वजन दुधाची क्षमाता व चाऱ्यातील पोष तत्वे .
उद्देश :-
१) जनावराचे वजन काढणे .
२) जनावराच्या वाजनापासून TDN काढणे .
३) जनावराच्या चाऱ्याचे वजन काढणे .
साहीत्य :- मीटर टेप ,वही,पेन,


प्रात्यक्षिक:- सोलर मिलकिन मशीन कशी चालते हे पाहणे .
उपयोग :-
1) कमी वेळात दूध काडने .
2)आपल्या कडून गाईच्या सडाला काही ईजा होत नाही
3)वेळ बचाव होतो
4) दुध पूर्ण काडते
प्रात्यक्षिक :-रोप लागवडीची संख्या ठरवणे .
साहित्य :- मीटर टेप ,नोंद वाही , पेन
कृती :- मीटर टेप ने शेतातील जागा मोजली उदा, लांबी रुंदी त्या नंतर हाताने गवते उपटली नंतर नोंदवाहीत नोंद केली आजू बाजू ची जागा मोजली .
मिरची रोप लावली ते लावण्या साठी हाताने छोटासा खड्डा केला नंतर लाईनीनी एक एक मिरची रोप लावली नंतर त्याला मागणे पाणी घातले .
प्रात्यक्षिक :- पिकाला पाणी देण्याची पद्धती .
1)पटाणे पाणी देणे
- पाणी जास्त वाया जाते
- मेहनत जास्त जाते
2) ठिंबक शिंचन
- झाडाच्या खिड्यापाशी पाणी थेंब थेंब पडते
- पाण्याची बचत होते
- पाण्याच्या विरघरळ्या प्रमाणे खत डेटा येते
- खर्च जास्त होतो
3) तुषार शिंचन
- पाणी पावसा सारखे किवा फवाऱ्या सारखे जाते
- पाणी बचत होते
- काडी किडापासून संवरक्षण होते
- हवा जास्त असेल तर पाणी वाया जाते
- विद्रव्य खत देता येत नाही
4) ठिंबक शिंचनाचे साहित्य
- मोटर 2) मेन लाईन 3) संबमेन लाईन 4) रबर टेबल 5) जॉईनार 6) ड्रीपर लाईन 7 )ड्रॉपर
प्रात्यक्षिक :- कलम
निरीक्षण :-
- दाब कलम
- गुठी कलम
- पाचर कलम
प्रात्यक्षिक :- फवारणाचे द्रावण तयार करणे .
साहित्य :- पंप , मास्क , draggon ,Gibrelic acid ,imicbbride etc , हँडग्लोज
कृती :-
1) पंप धुवून घेणे
2) 10 लीटर पाणी – dragen supar 1 लीटर =1.5
Gibrelic acid – 1 लीटर = 2 ml
imicbbride etc – 1 लीटर = 1 ml
3) हे द्रावण पंपाच्या साह्याने काकडी व गवार पिकावर फवारले .
प्रात्यक्षिक :- सरी पद्धत
- सरी पीक पद्धत ही पिकाच्या ओळीपासून संख्या काढून त्यामधून पाणी देणे होय सऱ्याचीत्या बी जमिनीच्या उतारापासून 10 ते 12 फूट ठेवतात त्या पद्धतीत पाणी व पिकाच्या मुळ्या चा प्रत्यक्ष संबंद येते नाही पाण्याची बचत होते .
फायदे :-
१) पिकांचा पाण्याशी थेट संबंद येत नाही
२) जमिनीत हवा खेळती राहते
३)जमिनीचा पोत कायम राहते
४) जमिनीतील आद्र्रता बऱ्याच काळ टाकते
प्रात्यक्षिक :- किड आणि रोग असलेले पानाचे नमुणे गोळा करणे .
साहित्य :- कटर , पिरावी ,गब्ज , वही , पेन
निरीक्षण :- पपई :- पपई पानाच्या काही भाग कीड लागली होती व काही मागी
निरिक्षण :- आंबा :- आंब्याच्या पाना वरती काही होले होते व पानाच्या साई टने वाळत आले आहे व काही भाग किड्यांनि खाला आहे .

