1. ]गोठयातील नोंदीचा अभ्यास

Chart

दिनांककडवळह . काडखुराकवजन वाढ
2 /2/202312 kg2.700 gm
3 /2/202312 kg2.700 gm
4 /2/202312 kg2.700 gm
5 /2/202312 kg2.700 gm
6 /2/202312 kg2.700 gm
7 /2/202312 kg2.700 gm
8 /2/202312 kg2.700 gm
9 /2/202312 kg2.700 gm
10 /2/202312 kg2.700 gm
11 /2/202312 kg2.700 gm
12 /2/202312 kg2.700 gm
13 /2/202312 kg2.700 gm
14 /2/202312 kg2.700 gm
15 /2/202312 kg2.700 gm
16 /2/202312 kg2.700 gm

2.] मुरघास तयार करणे

उद्देश :- जनावरांना उन्हाळ्यात ओला चारा म्हणजेच मुरघास बनवण्यास शिकणे .

साहित्य :- मका , विळा , कुट्टि मशीन , मुरघास कल्चर , केबल टाय , सेलोटेप , बादली , टफ , प्लॅस्टिक पिशवी , rumiferm

कृती :-1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.

2) किचन मागच्या शेतातून मका तोडली.

3) तोडलेली मका कुट्टीमशीन जवळ वाहूणं आणली.

4) मक्याचे 1 ते 2 cm अंतराचे तुकडे केले.

5) 100 gm rumiferm powder + 2 टप मक्याची कुट्टी मिश्रण

6) एका bag मध्ये 2टप कुट्टी टाकल्यावर त्यामध्ये एक मूठ कल्चर टाकले. व त्यावर पायाने दाबून घेतले.

7) bag भरल्यावर bag च्या तोंडाला केबल टाय ने पॅक बंद केले.

8) व नंतर त्याला सेलोटेपणे पॅक केले.

9) नंतर ती bag साईडला व्यवस्थित ठेवली.

अनुभव :- मका तोडतेवेळी ऊन असल्यामुळे मका तोडायला त्रास होत होता. दादा इंगवले यांनी माहिती दिल्यावर मुरघास कसा करायचा ते समजले.

3.]प्राण्याचे अंदाजे वजन काढने

साहित्य :- मीटर टेप ,वेट मशीन

उद्देश:- प्राण्यांचे वजन काढण्यात शिकणे व त्यांचा अभ्यास करणे

कृती :- सर्वप्रथम मीटर टेपने गायीच्या पुढील पायाच्या टोकापासून तर शेपटीपर्यंत माप घेतले

छातीचा घेरा मोजला

नंतर छातीचा वर्ग × लांबी (भागिले 666) हे सूत्र वापरून वजन काढले

method :- 1 )वजन काटा 2) सूत्र

सूत्र:- 1) छातीचा वर्ग गुणिले लांबी ( भागिले 666 )

2) छातीच्या घेरा ×लांबी { भागिले y}

अनुभव:- पुस्तकातील सूत्रानुसार आम्हाला प्राण्यांचे वजन काढता आले नाही कारण त्यात थोड्याशा चुका झाल्या होत्या

अ. क्रशेळ्यांची नावेवजन
1)कान टोचलेली काळी42.2 kg
2)न. कान टोचलेली काळी29 kg
3)पांढरी शेळी36.9 kg
4)आर्मी कलर21.2 kg
5)तांबडी शेळी36.8 kg
6)छोटी काळी15.2 kg
7)मान वाकडी34 kg
8)आफ्रिकन बोर39.4
अ. क्रकरडांची नावेवजन
1)A14.2 kg
2)A24.2 kg
3)B14 kg
4)B24.3 kg
5)C15.3 kg
6)C24.7 kg
अ. क्रगाईंची नावेवजन
1)लक्ष्मी गाई76.37 kg
2)गौरी गाई605 kg
3)सोनम गाई411 kg

साहित्य:-मीटर टेप , वजन काटा

4.]शेतीच्या मोजमापकाचा अभ्यास करणे

शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करणे

उद्देश ;- शेतीच्या मोजमपकांचा अभ्यास करण्यास शिकणे

साहित्य :- मीटर टेप

100 m = 328 feet inch

700 feet =213.36

1 गुंठा = 33 * 33 =1089 sq meter

40 गुंठे =1 एकर

1 एकर = 43560 sq feet

2.05 एकर =1 हेक्टर

1 हेक्टर -108900 sq feet

5.]रोप लागवडीची संख्या ठरवणे

उद्देश :- रोप लागवडीची संख्या ठरवण्यात शिकणे .

साहित्य :-मीटर टेप

  • रोपांमधील अंतर समान असल्यास :-
  • 1) वाढ चांगली होते .
  • 2)हवा खेळती राहते .
  • 3) सर्व लोकांना समान सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते

सूत्र :-रोपांची संख्या = क्षेत्रफळ ÷ रोपांचे अंतर

उदाहरण = केळी :- 1.5 × 1.5 cm

=43560 sq feet ÷ 1.5×1.5m

जर संख्या फीट मध्ये असेल तर ती मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये करणे

=13200÷2.5= 5860 रोपे

6.]पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे

साहित्य :-कोळप, मिटर टेप, फावडे

उद्देश:- पीक लागवडीस जमीन तयार करण्यास शिकणे

  • 1 ओळ =72 फुट
  • 72= फूट =2160cm
  • 1 ओळ= 2160cm
  • 2 बियांचे अंतर बरोबर 20 सेंटीमीटर
  • एका ओळीत बियांची संख्या किती …?
  • = 1 ओळीत बियांची संख्या = 2160 cm ÷20
  • = 108 बिया
  • तर 15 ओळीत किती बिया ?
  • = 108 ×15 बिया
  • = 1620

कृती :- 1)जमिनी निश्चित करणे

2) जमीन स्वच्छ करणे ( उदाहरण दगड प्लास्टिक वनस्पती अवशेष ) 3)शेताची फळबाळी करून जमीन समतोल करणे

4) पिकांच्या प्रकारानुसार सरी साऱ्या गादीवाफे बेड तयार करणे

5) पाणी देण्याची सोय करणे पाट पाणी तुषार सिंचन ठिबक सिंचन

7.]पिकांना लागणारे अन्नद्रव्य

अन्न द्रव्व कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व उपाय .

नत्र : – झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते फुट व फळे कमी येतात .

उपाय ; – यूरिया ची फवारणी करावी .

2 . स्फुरद ; – पाने हिरवट लांबट होवून वाढ खुटते पानाची मागील बाजू जाभाळट होते .

उपाय : – 1% डिंअमोनियं फॉस्फेटची फवारणी करावी .

3 . पालश : – पानाचे कडा तांबडसर होवून पानावर तांबडे पिवळे टिपके पडतात खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात .

उपाय : – 0 . 5 % सळफेत ऑफ पोर्टसची फवारणी करावी . ( 50 gm + 10 लिटर पाणी )

4 . लोह : – सेनड्याकडील पानाचे शिरमधील भाग पिवळा होतो . व झाडांची वाढ खुंटते .

उपाय : – 25 kg फेरस सळफेत जमिनीतून शेण खाता सोबत देणे किवा 0.2 % चिलेटेड लोहाची फवारणी करणे .

5. बोरॉन : – झाडचा सेण्डा कोवळी पाने पांढरी होवून मारतात सुरकुत्या पडून पिवळे चटते पडतात .

उपाय : – 20 ते 30 gm बोरीक अॅसिड पावडर ची फवारणी 10 लिटर पण्याकया पानववर करावी .

8.]वनस्पती संरक्षण उपकरणांचा वापर व उपयोग

उद्देश :-वनस्पतींना फवारणी करण्यास शिकणे

साहित्य :-पंप ,( पोलिट्रिन 10 ml= 10 लिटर पाणी )

  • फवारणी करताना घेतली जाणारी काळजी :-
  • औषध फवारणी आधी पंप स्वच्छ धुऊन घ्यावा
  • पाणी व औषधाचे प्रमाण निश्चित करून घ्यावे
  • फवारणी करताना पंपाचे नोझल पूर्णपणे काम करते का हे पाहाव
  • फवारणी करण्यापूर्वी हॅन्डग्लब व मास घालावा
  • फवारणी करताना केले जाणारे द्रावण अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी
  • फवारणी करून झाल्यावर पंप पुन्हा स्वच्छ धुऊन जागेवर ठेवावा
  • फवारणीच्या वेळी धूम्रपान आणि मद्यपान करण्यास टाळ
  • Power duKnapsack sprayHand rate power sprayer

निरीक्षण :- स्प्रे पंपा

9.]पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

पृष्ठभागावर पाणी देणे

  1. मोकळे पाणी सोडणे
  2. सपाट वाफ्यात पाणी सोडणे
  3. सार पद्धतीने पाणी सोडणे

निरीक्षण :- जागा :-

प्लॉट नंबर 4 ( वेळ:- 12 mi )

water :-3600 lit

तुषार सिंचन:- size:- 4×4 feet,15×15feet,45×45feet

कमतरता:- dry spot

2) हवा :- हवेमुळे रेनगनचे पाणी दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकते

3) ऊन:- जे बारीक थेंब आहेत ते उन्हामुळे त्यांचे बाष्पीभवना मध्ये रूपांतर होते

4) 25% पाणी वाया जाते

१० प्रत्ययक्षिकाचे नाव : – लेअर पोल्ट्री अर्थकारण

उदेश : – पोल्ट्री चा खर्च काढण्यास शिकलो .

जागा : ३२ , १२ चे सेड व बांधकाम प्रमाण १ : ३ मीटर्

बांधकाम खर्च : – ३,४, ९ ) इंचच विटा = १३०० =१०,४००

वाळू ( कच ) = ०. २४२ =६३ )

सिमेंट ( ५० kg ) = १७२ kg = १२०४

मजुरी = २५ % = ३०, ५८ ,७५

टोटल खर्च : = १५२९३, ७५२३

प्लास्टरचा खर्च : – प्रमाण १ : ३ मीटर्

वाळू ( कच ) = ०. १८९ ब्रास = ४१९.४२१

सिमेंट = ( ५० kg ) = २७० केजी = १८९ rs

मजुरी = २५ % = ५० kg =५३५

टोटल खर्च : – २९७६ .७५

कोबा खर्च : – प्रमाण १ : २: ४ मीटर्

वाळू = ०. १५६२ ब्रास = ३९५२

सिमेंट ( ५० kg ) = ३२७ .२३१ kg = २२९०.६१

=खडी = ०. ३०४ ब्रास – ६९९२

खर्च = ३३८४.४ rs

मजुरी : = ३५ % =८४६.१

टोटल खर्च : = ४२३०५

सेड खर्च : – कैची

१. गोल पाईप ( १ इंच ) =१६५ feet = ९००० rs

२. sq ट्यूब ( २,२ ) =१३० feet =७१५० rs

३. जळी ( ११५२ sq feet ) = ८६ kg = १४६३० rs

४. हुक = ६४ नग = ३२० rs

५. पत्रे ( ६,३,३९ ) =२० नग = १४४०६ rs

11. प्रत्यक्षिकाचे नाव :- सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे

उदेश : – सुक्या चऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकणे .

साहित्य : – बादली, पाणी , मीठ ,गुळ, कुट्टि मसिन , ताडपत्री , कॅरेट इ .

कृती : – 1 . शेतातील ताट कट करून आणले . ते सुकवून

2 . त्यानंतर कुट्टि मसिन जवळ आणून ठेवले व कुट्टि मसिन मध्ये लहान करून घेतली .

3 . ते एका ताडपत्रीवर ओतून त्यामध्ये गुळ पाणी व मीठ मिक्स केले . व ( 10 . kg ) कुट्टि केली .

4. त्याला खालून वरुण चांगल मिक्स करून घेतले .

5. 100 kg चाऱ्यासाठी 5 लिटर पाणी व 1 kg गुळ आणि 500 gm मीठ

6. त्यानंतएर सुक चारा तयार झाला व ताडपत्री मध्ये झाकून ठेवला .

7. अश्या प्रकारे सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यास शिकलो .

12 . प्रत्यक्षिकाचे नाव : – शेतातील तण नियंत्रण

उदेश : – शेतातील तण नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणे

साहित्य :-

तानाची व्याख्या : – आपण न लावलेले व आपल्याला नको अशलेले गवत म्हणजे तण नियंत्रण होय .

तण मुळे होणारे नुकसान :-

1.कीड :- किडचा प्रभाव वाढतो

2. पाणी :– पाणी वाया जाते

3. हवा :- हवा खेळती राहत नाही

4. प्रकाश अन्नद्रव :- प्रकाश आणि अन्नदरावांची स्पर्धा होते .

5. खर्च :- लागवडीचा खर्च वाढतो .

ताण नियंत्रणच्या पद्धती :-

1भिवतीक पद्धत :- 1 जमीन ओली असताना हाताच्या सहयाने गवत काढणे .

2 खुरपयच्या सहयाने गवत काढणे .

3 जमिनीची खोल नांगरट करणे

2 रासायनिक पद्धत :- 1 विशिस्त रासायनाच्या मदतीने तानाचे नियंत्रण केले जाते .

2 उदा , 1 2,4,D ,GLAYFOSET

2 रासायनांचा वापर दोन पद्धतीने केला जातो .

1 silective ,

2 non silective

silective म्हणजे सर्व silect केलेले ,

आणि non silective म्हणजे काहीही न सिलेक्ट केलेल .

silective हे उभ्या पिकत वापरता येते .

आणि non silective हे मोकळ्या रानात वापरता येते .

पेरणीपुर्वी :- उदा , सोयाबीन शेती करताना पेरणी बरोबर जमिनीत चांगली ओल असताना vernolate trifluralin हे केमिकल पेरणिपूर्वी फवारले जाते .

तण नाशक फवारताना घेतली जाणारी काळजी :-

1 जमिनीत चांगली ओल असावी

2 फवारणीचा पंप चांगल्या प्रकारे धुवून ठेवावा .

3 एकाच ठिकाणी जास्त वेळ फवारू नये .

4 तोंडाला मास्क बंधावा .

5 मास्क लावल्या शिवाय फवारू नये

13 प्रत्यक्षिकाचे नाव :- कलम पद्धतीचा अभ्यास करणे

उदेश :- कलम करण्यास शिकणे

पाचर कलम :- चांगल्या जातीची फांदी आणून कट करावी . व आपल्याला ज्या झाडावर कलम करायचे आहे त्या झाडाच्या मध्ये उभ्या चीर पडायचा व जी चांगल्या जातीची फांदी असेल ती त्या खोडात लावावी . कापलेल्या खोडला मध्यभागी उभा काप द्यावा . चांगल्या जातीच्या जाड फांदी कटरणे कापावी . फांदीची सर्व पाने कट करून टाकावी . पूर्ण जोड पल्यासतीकच्या फितीने बांधून टाकावा .

गुटी कलम :- कलमा साठी एक जाड फांदी निवडून घ्यायची . व त्या फांदीला जेवढी पाने दिसतील तेवढी काढून घ्यावी व डोळ्याच्या पुढील भागात 1,2 इंच लांबीची गोलाकार साल काढावी व त्यामध्ये हवा व पाणी जावू नये अशी काळजी घ्यायची . कलम तयार होताना त्यास पाण्याची आवशक्त असते .

कलम करताना घ्यायची काळजी :-

 1 )कलम करताना चाकूने शरीराला इजा होवू नये .

( 2) कलमा साठी फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी .

( 3 ) कलम करताना कोवळी व जुनी फांदी निवडू नये .

14 . प्रत्यक्षिकाचे नाव :- शेळीच्या वजाणवरून तिचे खाद्य काढणे .

उदेश :- शेळीच्या वजनवरून तिचे खाद्य काढण्यास शिकणे .

DM = पाण्याचे प्रमाण . o

DM = DRY MATTER

मोठी काळी शेळी वजन =42 kg

15.प्रत्यक्षिकाचे नाव :-प्राण्याचे तापमान घेणे

उदेश :- प्राण्याचे तापमान घेण्यास शिकणे .

साहित्य : –डिजिटल थरमामीटर,फरक

कृती :-

1)सर्वप्रथम गाईला घट्ट बाधून घेतले. व गाईच्या मोरखील पकडले .

2)त्यानंतर थरममीटर ने गाईच्या शेनयेत त्या जागी आत सेर घालावे .

3)प्राण्याचे तापमान हे 100 c ते 102 क पर्यंत (normal) असावे.

4)आपल्या गाईला ताप नव्हता.

निरीक्षण :-

नावे

गंवरी _ 100.6 c

सोनम _ 100.9 c

मोठी काळी शेळी _ 101.8. c

बारकी काळी शेळी _ 102.1. c

आफ्रिकन बोअर _ 101.5. c

अनुभव :- 100. c ते 102. c पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला टॅप आहे .

4. आपल्या गाईला ताप नव्हता .

निरीक्षण :- नावे

गौरी ,100.6’c

2 सोनम ;100 . 9’c

3 मोठी काळी शेळी ,101.8’c

4 बारकी काळी शेळी ,102.1’c

5 आफ्रिकन बोर ,101.5’c

अनुभव :- 100’c ते 102’c पेक्षा जास्त तापमान असेल तर गाईला ताप आहे .

16.प्रत्यक्षिकाचे नाव :-बिजप्रकीय करणे .

उदेश :- बिजप्रक्रिया करणे

बीज प्रक्रिया म्हणजे बीज लावण्या आधी बीज वर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय .

साहित्य : –पाणी ,मीठ ,भांडे इ .

कृती :-1 जशे की कुठलेही बियाणे होताना बघून घ्यावी ,समजा सोयाबीन बी घेतली तर त्यावरील वजन किमत व्यअलुडईती त्या बियांच्या आनुवंशिक युद्धत किती टक्के बिया उगवतात ते बघणे व शारीरिक शुद्धता किती टक्के बघणे पयकेटवर हे लिहले असते ,मग त्यावरून समजते की आपल्या किती बिया उगवतात लावल्यावर तेवड्या बिया नाही उगवल्या तर त्या परत करता येतात कंपनीला ,

भोवतीक पद्धत :- म्हणजे केमिकल वापरलेले बी होय .

30 gm मीठ 1 लिटर पाण्यात त्या प्रमाणे 300 gm मीठ 10 लिटर पण्यात द्रावण तयार करून घेणे तयार केलेल्या द्रावणात बियाणे 8-10 मिनिटे बुडवून ठेवावे .

टीप :- पाण्याचे वरती तरंगलेले बिया खराब असते जसे कीड लागले अर्ध तुटलेले वजन कमी असलेले ते बाजुला ठेवणे .

17.प्रत्यक्षिकाचे नाव :-बियाउगवण्याची क्षमता .

उदेश :- बिया उगवण्याची क्षमता बघण्यास शिकणे .

साहित्य :- पाणी ,बिया ,वाटी इ .

कृती :- 1 सर्व साहित्य गोळा करणे

2 प्रयोगासाठी व प्रॅक्टिकल साठी आम्ही शिल्लक राहिलेले धण्याचे बिया होण्यास कारवणे आणले .

3 आम्ही 100 बिया एक प्लेट मध्ये घेतल्या व 100 बिया बुडतील एवढ्या पाण्यात घेतल्या एका वाटीमद्धे .

4 व 3 तास पाण्यात ठेवल्या .

उगवण्याची क्षमता :- सूत्र ; उगवणे क्षमता = मोड आलेली बी =एकूण बिया – 100

18.प्रात्यक्षिकांचे नाव :- कीड लागलेल्या झाडाच्या पानाचे नमुने गोळा करणे .

उद्देश :- पानावरची किडी ओळखण्यास शिकलो

वांगी :- लक्षणे :- वांगी या फळाला हॉल पडले आहे आणि फळ कापल्यावर अली दिसत आहे .

कीड :- फळ पोखरणारी अळी :-या साठी आम्ही पेरूची आणि मिरचीची अळूची मक्याची चवळीची पालकांचे याचे नमुने आणून बघितले व त्यावरच्या अली आलेल्या रोग पहिले .

पान पालक :- पानावर पांढरे चट्टे व खडबडीत भाग होते म्हणजेच या पानावर रसशोषणारी अळी होती .

रस शोषण करणारी किडी :- या प्रकारच्या किडी पानावर बसून मधील रस शोसून घेतात रस शोसलेला भाग खडबडीत किव्हा चेहऱ्यावर घामोळ्या आल्यासारखं दिसत .

उदा :- तुडतुडे मावा पांढरी मावा कोळी इ .

पेरूची पान :- चांगले पान हि दोन्ही बाजूने प्लॅन दिसले व खडबडीत नव्हते.

खराब पान :- त्यावर दोन्ही बाजूने खडबडीत होते व पांढरे ठिपके होते त्या पांढरे ठिपक्याना लोकरी मावा हा रोग होता .

सुबाभूळ :- त्या पानांमागे चिकट झाले होती या चिकट मावा हा रस शोषणाची कीड होती त्यावर हि अळी होती .

थ्रिप्स तुडतुडे :- मिरचीची पाने मिरचीच्या पानावर चेहऱ्यावर घामोळी आल्यावर दिसते ताशे चेहऱ्यावर घामोळे आले आहेत थ्रिप्स झाल्यावर व मिरचीची पाने हि खालच्या बाजूने दुमडलेले आहेत .

मक्याची पाने :मक्याच्या झाडाचे खोड व पाने खाल्लेली दिसली खोड कीड व पोखरणारी अळी त्यावर होती .

19.प्रात्यक्षिकांचे नाव :- फवारणीचे द्रावण तयार करणे .

उद्देश :- फवारणीचे द्रावण तयार करण्यास व त्याचे प्रमाण ओळखण्यास शिकणे व बनवण्यास .

साहित्य :- पंप . केमिकल . पाणी . मास्क .इ .

कृती :- (१)सर्वप्रथम पंप स्वछ धुवून घेतल(२))(नंतर नोझल साफ करून पाणी वेवस्थित फवारतो कि नाही ते चेक केले .(३) नंतर ३ लिटर पाण्यात निम ऑइल हे केमिकल ९० ml टाकले व त्यामध्ये मायक्रोणुत्रेम्स हि पावडर टाकली २५ gm (४) नंतर पंपामध्ये 15 लिटर पाणी भरले व मास्क घातला (५) व पेरूच्या बागेला वांगीच्या प्लॉटला व चवळील आणि मिरचीच्या प्लॉटला फवारणी केली .(६) तशेच जास्त फवारणी करू नये .

प्रमाण :- १ लिटर पाण्यात २ ml निम ऑइल आणि १५ लिटर पाण्यात २५ gm मायक्रोनुत्रियांस पावडर घ्यायची .

हे केमिकल पेरूच्या झाडांना द्रावण लोकरी मावा हि कीड व रोग आल्यामुळे फवारले होते .

चवळी :- चवळी पानावर काळे ठिपके होते म्हणजे त्या पानावर काळा मावा रोग होता व पोखरणारी अळी लागलेली होती म्हणून निम ऑइल या केमिकलचा वापर केला

20.प्रात्यक्षिकांचे नाव :- दुधातील भेसळ ओळखणे .

उद्धेश :- दुधातील भेसळ ओळखण्यास शिकणे .

साहित्य :- पाणी . दूध .इ

कृती :- १. सर्व प्रथम दूध व पाणी घेत

२. त्यानंतर एक दुधाचा थेम्ब हातावर टाकला व

३. नंतर दुसऱ्या दुधात थोडं पाणी टाकून तो थेंब हातावर टाकला .

४. v पाणी न टाकलेलं दूध हळूहळू खाली येत होत .

५. व ज्या दुधात पाणी टाकलेले ते जोराने खाली येत होते .

६. ज्या दुधात पाणी जास्त असते ते दूध पाणचट लागते .