गाईचे अंदाजे वजन काढणे

उद्देश :गाईचे वजन काढणे .

साहित्य :मीटर टेप ,गाई

कृती :१गाईला मोकळ्या जागेवर उभी करावी .
२:गाईचा शिंगाच्या मधून ते माकडहाडापर्यंत माप मोजणे .
३गाईच्या छातीचा घेर म्हणजे पुढचा पायाच्या थोड मागे छातीचा घेर मोजायचा .

समजा छाती=७५. ६
लांबी =७८
सुत्र = (छाती )*(छाती ) *लांबी /६६६

(७५. ६७५. ६)(७८)/६६६
=६६९किलो
गाईचे वजन =६६९किलो

चारा तयार करणे

उद्देश: पौष्टिक चारा तयार करणे.

साहित्य: हिरवा चारा, सुका चारा, कुट्टी मशीन, मीठ, सोडा, गूळपाणी.

कृती:१. दहा किलो सुका चारा घेतला.

२. 40 किलो हिरवा चारा घेतला.

३. हिरव्या व सुक्‍या चाऱ्याची मिक्स कुट्टी केली.

४. कुट्टी पांगवली.

५. वरून मिठ व सोडा टाकला.

६. गुळाचे पाणी टाकले.

मीठ चवीसाठी टाकले, गूळही चवीसाठी टाकला, सोडा पचन होण्यासाठी टाकला.

काळजी:१. कुट्टी हवेशीर ठेवावी.

२. कुट्टी चा डिग नको म्हणजे ती गरम होणार नाही.

३. ताज्या चाऱ्याची कुट्टी करणे टाळावे.

४. चारा टाकण्याच्या दोन ते तीन तास आधी कुट्टी करून ठेवावी.

दूध काढण्याच्या पद्धती

उद्देश: दूध काढायला शिकणे.

साहित्य: दूध काढण्याची मशीन, गाय, पाणी, बादली.

पद्धती:१. हाताने दूध काढणे, २. मशीन ने दूध काढणे.

कृती: १. गरम पाण्याने मशीन धुऊन काढणे.

२. गाईचे सड व कास गरम पाण्याने धुणे.

३. पहिल्या दोन पिचकाऱ्या खाली पिळणे.

४. मशीन लावणे व दूध संपल्यावर खात्री करणे.

हाताने दूध काढणे:१. गायचे सड व कास गरम पाण्याने धुणे.

२. पहिल्या दोन पिचकाऱ्या खाली पिळने.

३. दूध काढणे ( सर्व दूध संपवणे)

सावधानी: १. शेपटी बांधणे.

२. पाय बांधणे.

३. गाय आणि दूध काढणाऱ्या ला इजा न होऊ देणे.

गाय धुणे

उद्देश: गाय धुणे , गाय स्वच करणे.

साहित्य:पाणी,गाय,बादली,मग,गाय.

कृती:१. बादलीत पाणी आणणे.

२. गायीला पाण्याने भिजवून घेतील.

३. ब्रश ने घासणे.

४. परत पाण्याने धुणे.