17-11-19= रविवार माझा इलेक्ट्रिक शिक्षण मध्ये पहिला दिवस आज मी येथे लाईट बिल कोणत्या पद्धतीने काढावा याबाबत शिकणे व वरचे हॉस्टेल से लाईट बिल काढले
18-11-19= स्टोरी झाल्यानंतर विशाल सरांनी फ्यूज बद्दल माहिती दिली व 3फेज फेस च्या कनेक्शनची डीपी वर जाऊन माहिती घेतली व तेथे 63 ॲम्पिअर चा फ्यूज टाकून दुपारनंतर अम्मांच्या रूम मधील दुरुस्त केला
19-11-19= आज आम्ही केबल मधील एलईडी काढून त्या चेक केल्या त्यातील कोणत्या चालू आहेत त्या पुन्हा बसवल्या खराब आहेत त्या दुरुस्त केल्या वायफायच्या राउटर साठी मधून वायर वर्कशॉप कॉर्नर पर्यंत आथरली व त्याचे कनेक्शन पूर्ण केले
20-11-19 आज आम्हीअर्थिंग बद्दल माहिती घेतली अर्थिंग चे प्रकार किती आहेत हे जाणून घेतले दुपारनंतर आम्ही कम्प्युटर लॅबला गेलो
21-11-19= आज आम्ही 3व1 फेज कनेक्शन याबाबत माहिती घेतली व आश्रम मधील कनेक्शन कसे व कुठे गेलेली आहे हे जाणून घेतले व दुपारनंतर गर्ल्स होस्टेल मधील हुटर कनेक्शन वरील रूम मधून खाली रूम मध्ये ही कनेक्शन काढले
22-11-19= आज आमचा दुपारपर्यंत ड्रॉइंग्स चा क्लास होता दुपारनंतर आम्ही शिवन लॅब मध्ये गेलो तेथे मी उशी तयार करणे शिकलो
23-11-19= शनिवार सुट्टी होती
24-11-19 =आज जाधव सरांनी एक मीटर लोखंडाचे वजन वापरून किती लोखंड वापरले त्याचे वजन काढण्यास शिकवले व दुपारपर्यंत संगणक लॅब गेलो दुपारनंतर फूडलॅबला चिकी बनवण्यास मदत केली
25-11-19= स्टोरी झाल्यानंतर सरांनी सर्व मुलांना प्रोजेक्ट वाटुन दिले व दुपारपर्यंत सेक्शन क्लीन केले दुपारनंतर soil lab मधील बोर्ड दुरुस्तीचे काम होते ते करण्यास गेलो व कडकनाथ कोंबडी वर सेमिनार दिला
26-11-19= तळ्याकडे जाणाऱ्या सर्विस वरचा बसबार दुरुस्त केला दुपारनंतर काढून तेथे पॉलिहाऊस मधील 10 AMP चा mcbकाढून तेथे 32AMP चा टाकला तळ्यावरील कनेक्शन पुन्हा स्पार्क झाल्यामुळे कनेक्शन चेक केले
27-11-19= द्यायची क्लासरुमचे वायरिंग चा थोडासा प्रॉब्लेम होता तो solv केला व तेथील कंनेक्शन्स जाणून घेतले कॉमन किचन मधील नवीन कनेक्शन काढले दुपारनंतर कंप्यूटर लॅबला गेलो तेथे पार्टी बॅनर तयार करण्यास शिकलो
28-11-19= अर्थिंग चे प्रॅक्टिकल केले ॲग्री ची आर्थिग केली soil lab मधील 16 एंपियर चा बोर्डाचा फ्युज गेल्यामुळे बोर्ड बदली करावा लागला तो बदली केला
29-11-19= सकाळी अकरा वाजेपर्यंत सरांनी पर्जन्य मोजणे व तापमान मोजून याबाबत माहिती दिली व ते समोरासमोर मोजून दाखवले दुपारपर्यंत ड्रॉइंग क्लास झाला दुपारनंतर शिवण लॅब मध्ये एम्ब्रोईडरी मशीन चालवायला शिकलो
30-11-19=शनिवार सुट्टी होती
1-1219= यात्रेनिमित्त घरी गेलो होतो
2-12-19=यात्रेनिमित्त घरी गेलो होतो
3-12-19= स्टाटर वर लेक्चर झाले व त्यानंतर तळ्यावरील पॅनल बॉक्सवर नवीन स्टार्टर बसवला व एकाच वेळेस तेथे दोन्ही मोटर्स चालू न होवो म्हणून तेथे एक फ्यूज कनेक्शन केले दुपारनंतर फ्यूज वर लेक्चर झाले
4-12-19= लेक्चर झाल्यानंतर पोल्ट्री फार्म मधील बोर्ड दुरुस्त केला भानुदास सरांचा जुना कुलर खराब झाला होता त्याला चेक केले व त्यांना दुसऱ्या नवीन कुलर बनवून दिला दुपारनंतर कम्प्युटरला आपला गेलो
5-12-19= आज आम्ही बजाज इलेक्ट्रिकल कंपनी रांजणगाव येथे भेट देण्यास गेलो होतो तेथे आम्ही T लाईट पोल कसे तयार होते हे शिकलो
6-12-19= आज दुपारपर्यंत ड्रॉइंग क्लास झाला दुपारनंतर मिशीवाल्या मध्ये गेलो तेथे मी हातातील ब्रेसलेट विणायला शिकलो
7-12-19= आज शनिवार सुट्टी होती
8-12-19= विशाल सरांनी फ्यूज वर लेक्चर घेतले व त्याचे प्रॅक्टिकल घेतले त्यानंतर प्रॅक्टिकल वही पूर्ण करत बसलो
9-12-19=सकाळी चोरी झाल्यानंतर फूड लॅब मधील जी नवीन वायरिंग केलेली होती ती व बोर्ड चेकिंग करून वर्कऑर्डर प्रमाणे मोजून घेतले स्टाटर स्पार्क होता तो चेक केला चार वाजल्यानंतर सेमिनार झाला
10-12-19= आज सकाळी ऊर्जा विषयी लेक्चर झाले 3फेज बस बारचा फ्यूज जळाला होता तो फ्यूज टाकला soil lab मधील इंडस्ट्रियल फिटिंग चे कनेक्शन कसे काढायचे याबाबत माहिती घेतली व ड्रॉइंग केली
11-12-19= आज मीटर ,मिलिमीटर ,सेंटीमीटर याबाबत माहिती घेतली मीटर टेप बाबत माहिती घेतली जनरेटर चेक केले कंपनीमार्फत चेक करण्यासाठी माणूस आला होता त्याच्याकडून माहिती घेतली व दुपारनंतर मोटार काढून ती मोटार खोलून चेक केली
12-12-19= सकाळी सनी सरांचे मशीन वर लेक्चर झाले त्यानंतर आम्ही कम्प्यूटर लॅबला गेलो तेथे आम्ही फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये पासपोर्ट साईज फोटो कसे एडिट करायचे ते शिकलो त्यानंतर सिंगल फेज मोटार होती ती चेक केली व तळ्यावर बसवली
13-12-19= मोशी ला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो
14-12-19= शनिवार आज सुट्टी होती
15-12-19= धरणावरून 15 एचपी ची मोटर काढून आणली नंतर विशाल सरांनी मोटारच्या पार्ट बद्दल माहिती दिली crab पाशील टाकीत पाण्यातली मोटर टाकली आणिibt पाशी नवीन कनेक्शन काढले फायनल कनेक्शन करण्यासाठी गावात विशाल सरांच्या घरी गेलो होतो
16-12-19= स्टोरी झाल्यानंतर अकरा वाजता आम्ही गावांमध्ये मोटार रिवायडींग साठी गेलो होतो चार नंतर सेमिनार झाला
17-12-19= आजारी असल्यामुळे घरी गेलो होतो
18-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
19-12-19= आजारी असल्यामुळे घरी होतो
20-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
21-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
22-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
23-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
24-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
25-12-19=आजारी असल्यामुळे घरी होतो
26-12-19= दुपारी घरून आल्यानंतर इंडस्ट्रियल फिटिंग करण्यासाठी soil lab मध्ये गेलो
27-12-19= आज शुक्रवार आज ड्रॉइंग क्लास होता दुपारनंतर शिवन लॅब मध्ये गेलो तेथे आम्ही भरत काम करण्यास शिकलो त्याच्यात मी लॉलीपॉप बनवला
28-12-19= आज शनिवार सुट्टी होती
29-12-19= आज खुशाल सरांनी सोलार कुकर बद्दल माहिती दिली व त्यानंतर कम्प्युटर लॅब ला गेलो होतो दुपारनंतर soil lab मधील टॉप पिन बसून दिल्या
30-12-19= आज जाधव सरांनी बायोगॅस बद्दल माहिती दिली तो कसा तयार करतात याबद्दल माहिती दिली व जनरेटर मध्ये नऊ लिटर डिझेल त्याचबरोबर दुपारनंतर आम्ही बायोगॅस बद्दल प्रॅक्टिकल केले
31-12-19= आज आमचे सनी सरांनी वेल्डिंग वर लेक्चर घेतले त्यानंतर आम्ही शरद डॉन मधील मेंटेनेस व बस बार बसवण्याचे काम करण्यासाठी गेलो
1-1-20= आज जाधव सरांनी डम्पी लेवल वर लेक्चर घेतले ते कसे काम करतात व याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती दिली व त्यानंतर आम्ही शरद डोम अपूर्ण काम करण्यास तेथे गेलो दुपारनंतर आम्ही कम्प्युटर क्लासला गेलो तिथे आम्ही आमचे ब्लॉग पूर्ण केले व चार वाजता येऊन बस बारचे काम पूर्ण करून घेतले
2-1-20= आज सनी सरांनी सिमेंट कसे बनवतात याबाबत माहिती दिली व कॉंक्रिट बद्दल माहिती दिली लेक्चर झाल्यानंतर आम्ही डोम मधील अपूर्ण काम पूर्ण करून टाकले दुपारनंतर आम्ही डम्पी लेवल प्रॅक्टिकल केले
डम्पी लेवल ची साधने- ओळंबा,डम्पीलेवल,मीटर टेप,स्टाफ
3-1-20=आज 11 वाजेपर्यंत शरद डोमची कॉस्टिंग काढली 11नंतर Drawing class होता व दुपारनंतर आम्ही शिवन लँबला गेलो
4-1-20= शनिवार सुट्टी होती
5-1-20= आज विशाल सरांनी शोषखड्डे बाबत माहिती दिली व त्यानंतर ई ग्रॅम चे काम करण्यासाठी कम्प्युटर क्लासला गेलो होतो दुपारनंतर ई-ग्राम चे काम पूर्ण केले व तीन नंतर प्रॅक्टिकल वही पूर्ण केले
6-1-20= आज स्टोरी झाल्यानंतर 2 टूर घेतल्या व त्यानंतर प्रमोदला बसबर बसण्यास मदत करण्यासाठी गेलो दुपारनंतर शिवण लॅब मध्ये प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतली व त्यानंतर इलेक्ट्रिकच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतली चार नंतर सेमिनार झाला
7-1-20= आज दीक्षित सरांच्या बाथरूमची वायरिंग काढून दिली व त्यानंतर प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी गेलो ग्रे वॉटर प्रॅक्टिकल केले चार नंतर प्रोजेक्टचे काम करायला घेतले
8-1-20= आज विशाल सरांनी आपल्या आश्रमात सिंगल फेज वन थ्री फेज आणि जनरेटर यांचे कनेक्शन कसे आहे याबाबत लेक्चर घेतले त्यानंतर बॉइज् होस्टेलचे मेंटेनन्स चे काम करायला घेतले
9-1-20= आज आम्ही सोलर पॅनल बद्दल माहिती दुपारपर्यंत एक इन्वर्टर सेट केला तो 96 kw होता पाय दुखत असल्यामुळे दुपारनंतर रूमवरती होतो
10-1-20= आज आम्ही मिल्क अस्टर मशीनचे काम पूर्ण केले त्यानंतर आम्ही दोन ग्रुप मध्ये विभागून एक ग्रुप ने शिलाई मशीन व दुसरा ग्रुप रेफ्रिजरेटर सेट करण्यासाठी गेला होता
11-1-20= आज शनिवार आज आम्ही वर्कशॉप वरील व बाकी सर्व ठिकाणचे सोलर स्टॅन्ड बनवून ते फिट केले
12-1-20= रविवार विशाल सरांनी इंजिन करते काम करते त्यातील पिस्टन चे कार्य काय आहे यावर लेक्चर घेतले व प्रॅक्टिकल घेतले व त्यानंतर सर्व ठिकाणचे सौर पॅनल बसून त्यांचे लास्ट कनेक्शन केले
13-1-20= आज स्टोरी झाल्यानंतर थ्री फेज मीटर बॉक्स बाहेर काढला दुपारनंतर आम्ही गर्ल्स होस्टेल समोरील ग्रे वॉटर या टाक्या बसण्यासाठी गेलो चार नंतर सेमिनार झाला
14-1-20= आज सकाळी ड्रॉइंग क्लास झाला नंतर आम्ही ग्रे वॉटर टाकी सेट केल्या दुपारनंतर आम्ही ट्यूबलाइट बद्दल माहिती घेतली ती कशाप्रकारे उडते त्याचे कारण काय माहिती थ्री फेज पॅनल बॉक्सचे पाठीमागे स्टॅन्ड बनवणे घेतली
15-1-20= आज मी 3fage फ्रेंम बनवला व तो त्या रूम मध्ये बसला दीक्षित सरांनी सोलर पॅनल बद्दल माहिती दिली सौर उर्जेवर लेक्चर घेते व दुपारनंतर आम्ही कम्प्युटर क्लासला गेलो तेथे आम्ही सर्वांनी ब्लॉक कम्प्लीट केले
16-1-20= आज सनी सरांनी लोखंड कसे बनते याबाबत लेक्चर घेतले पॅरलिसीस मशीनची सर्विस वायर ओढली दुपारनंतर सोलर पॅनल वरती डी आय सी वर्क शॉप मध्ये नवीन कनेक्शन काढायची आहे याचा आढावा घेतला व डायग्रॅम काढली
17-1-20= सकाळी ड्रॉइंग क्लास झाला दुपारनंतर शिवन लॅब मध्ये गेलो तेथे प्रोजेक्टचे काम पूर्ण केले
18-1-20= शनिवार सुट्टी होती
19-1-20= आज आज सकाळी सोलर कुकर प्रॅक्टिकल केले दुपारनंतर प्रोजेक्टचे काम पूर्ण करत होतो
20-1-20= स्टोरी झाल्यानंतर प्रोजेक्टचे काम पूर्ण केली गावात भैरवनाथाच्या मंदिरात फिटिंग साठी गेलो होतो त्यानंतर सेमिनार झाला तेथे आम्ही 26 जानेवारी च्या कार्यक्रमाचे नियोजन केले
21-1-20= काल जे गावातून प्लाऊड आणले होते त्याला पाणी लागून ते पुगु नये म्हणून त्याला कलर दिला त्याला साईट पट्टे मारल्या व शिवण लॅब मॅडम चा कुंडीचा प्रोजेक्ट कम्प्लीट केला