इलेक्ट्रिक लॅब रिनोवेशन

प्रस्तावना-:

या प्रयोगात इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे विविध उपकरणे, साधने व साहित्य यांचा अभ्यास केला. घरगुती उपकरणे जसे की सोलर पॅनल, एक्वा फिल्टर, फॅन, मोटर इत्यादींचे कार्य समजून घेतले तसेच AC आणि DC करंट यातील फरकही शिकला. लॅबची साफसफाई व वस्तूंची योग्य रचना केली.

सर्वे-:

गावामध्ये जाऊन विविध इलेक्ट्रिकल साहित्य व उपकरणांची उपलब्धता तपासली. स्थानिक बाजारातून लागणारे साहित्य आणले. लॅबमध्ये वापरण्यास योग्य वस्तू निवडल्या.

उद्देश-:

इलेक्ट्रिकल उपकरणांचे कार्य समजणे

AC व DC करंट यातील फरक जाणून घेणे

इलेक्ट्रिकल लॅबमधील उपकरणांचे योग्य वापर शिकणे

व्यवहार्य अनुभव मिळवणे

साहित्य-:

4×8 चे दोन प्लायवुड

राऊंड पट्टी (१ इंची) – 200 फूट

मास्किंग टेप

निळा ऑइल पेंट, थिनर

पांढरा वुड प्रायमर

मिक्सर, सिलिंग फॅन, टेबल फॅन

सोलर पॅनल, एक्वा फिल्टर, इस्त्री, इंडक्शन स्टोव

फिटर मोटर (1 HP)

ड्रिल मशीन, हातोडी, टाय, वायर

35×5 अँगल, 30×5 तुकडे

इलेक्ट्रिकल लॅबची साधने

कृती-:

गावात जाऊन सर्वे करून सर्व साहित्य आणले.

4×8 च्या प्लायवुडवर व 2×4 च्या बोर्डवर एक्वा फिल्टर बसवले.

35×5 च्या अँगलला खाचा मारून भिंतीवर प्लायवुड बसवले.

निळा ऑइल पेंट, थिनर व प्रायमर वापरून रंगकाम केले.

ड्रिल मशीन, हातोडी, टाय व इतर साधनांचा वापर केला.

AC (अल्टरनेटिव्ह करंट) व DC (डायरेक्ट करंट) यांचा फरक शिकवला.

घरामध्ये 240 वॅट करंट वापरला जातो हे समजले.इलेक्ट्रिकल लॅब स्वच्छ करून कपाटांची रचना बदलली.

निरीक्षण-:

सर्व उपकरणे व्यवस्थित कार्यरत होती.

AC व DC करंट मधील फरक स्पष्ट झाला.

प्लायवुड बसवताना मोजमाप अचूक ठेवणे महत्त्वाचे आहे हे लक्षात आले.

निष्कर्ष- :

या कामातून इलेक्ट्रिकल लॅबमधील कामाची सखोल माहिती मिळाली. उपकरणांची बसवणी, वायरिंग, रंगकाम व उपकरणांची कार्यप्रणाली समजली.

भविष्यातील उपयोग- :

घरगुती व औद्योगिक वायरिंगसाठी उपयुक्त ज्ञान मिळाले.

इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी मदत होईल.

सोलर सिस्टिम्स व करंट सिस्टीम्सचे व्यवहार्य ज्ञान मिळाले.

मी हे शिकलो-:

AC व DC करंट मधील फरक

उपकरणे बसवण्याची व रंगकामाची पद्धत

इलेक्ट्रिकल लॅबची निगा राखण्याचे महत्त्व

व्यवहार्य कौशल्य व सुरक्षितता उपाय

कॉस्टिंग

अ . क्र.मालाचे नावएकूण मालदरएकूण किंमत
प्लावूड8*4= 260 f३८४०
हाप राऊंडर पट्टी175 f१०१७५०
चुका १*१७५०० g२५१२५
फेव्हीकॉल२५० ग्राम१२०१२०
ब्ल्यू ऑइल पॅन्ट१ लीटर४७४४७४
ब. आर. वाईट प्रायमर१ लीटर५०८५०८
मास्किंग टेप4 टेप२५१००
Trugrip UR TRA८०० G.२५५२२०
पिवळा ऑइल पेंट५०० मी . लीटर२७०१३५
१०मजुरी१८१८
११एकूण९०९०