Extention board bharne –
माहिती :
- एक्स्टेंशन बोर्ड हे एक विद्युत उपकरण आहे. याचा उपयोग एका प्लगच्या साहाय्याने अनेक विद्युत उपकरणांना वीजपुरवठा करण्यासाठी केला जातो.
- यामध्ये प्लग, सॉकेट, वायर, स्विच आणि फ्यूज यांचा वापर केला जातो.
- एक्स्टेंशन बोर्डची अंतर्गत वायरिंग योग्य पद्धतीने केल्यास विद्युत उपकरणांना सुरक्षितपणे वीजपुरवठा करता येतो.
वायरिंगमधील वायरचे प्रकार :
- फेज वायर (Phase): विद्युत प्रवाह उपकरणापर्यंत नेते.
- न्यूट्रल वायर (Neutral): विद्युत परिपथ पूर्ण करण्यासाठी वापरली जाते.
- अर्थिंग वायर (Earthing): विद्युत गळती झाल्यास सुरक्षिततेसाठी वापरली जाते.
आवश्यक अवजारे :
- स्क्रूड्रायव्हर
- वायर कटर
- वायर स्ट्रिपर
- टेस्टर
प्रक्रिया (Process) :
- सर्वप्रथम एक्स्टेंशन बोर्ड, प्लग, सॉकेट, वायर व आवश्यक अवजारे घेतले.एक्स्टेंशन बोर्डचे बाहेरील कव्हर काळजीपूर्वक उघडले.
- बोर्डमधील प्लग, सॉकेट, स्विच व वायर यांची ओळख करून घेतली.वायरचे योग्य माप घेऊन आवश्यक तेवढी वायर तयार केली.
- वायरचे टोक स्ट्रिपरच्या साहाय्याने सोलले.फेज, न्यूट्रल व अर्थिंग वायरची ओळख करून घेतली.प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वायरिंग जोडणी केली.
- सर्व टर्मिनलचे स्क्रू घट्ट केले.वायर सैल राहणार नाहीत याची तपासणी केली.
- बोर्डचे कव्हर व्यवस्थित बसवले.प्रशिक्षकांनी तपासणी केल्यानंतर बोर्डचे कार्य पाहिले.
काळजी :
- वायरिंग करताना वीजपुरवठा बंद असावा.
- वायरची जोडणी घट्ट असावी.
- फेज, न्यूट्रल व अर्थिंग योग्य ओळखावे.
- खराब वायर वापरू नयेत.
- वायरिंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
निष्कर्ष: या प्रॅक्टिकलमध्ये एक्स्टेंशन बोर्डची अंतर्गत वायरिंग करणे, वायरचे प्रकार व विद्युत जोडणी यांची माहिती मिळाली.

