गेस्ट होस्टेल वायरिंग

१) प्रस्तावना

मी विज्ञान आश्रममध्ये इलेक्ट्रिकल कोर्स करत असताना गेस्ट होस्टेल वायरिंग हा प्रत्यक्ष प्रोजेक्ट निवडला. या प्रोजेक्टचा उद्देश प्रत्यक्ष इमारतीमध्ये पूर्ण वायरिंग सिस्टिम कशी डिझाईन करायची, बसवायची व सुरक्षितपणे चालू करायची हे शिकणे होता.
या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काम आम्ही स्वतः केले, जसे की डायग्राम काढणे, मार्किंग करणे, मटेरियल खरेदी करणे, वायरिंग करणे, बोर्ड भरणे, MCB बसवणे आणि अर्थिंग करणे. त्यामुळे आम्हाला थिअरीसोबत प्रॅक्टिकल ज्ञान मिळाले.

२) उद्देश

  1. गेस्ट होस्टेलसाठी योग्य वायरिंग प्लॅन तयार करणे.
  2. डायग्रामप्रमाणे प्रत्यक्ष साइटवर काम करणे शिकणे.
  3. सेफ्टी नियम पाळून इलेक्ट्रिकल काम करणे.
  4. मार्किंग, पट्टी फिटिंग आणि वायरिंगचा अनुभव घेणे.
  5. स्विच बोर्ड, MCB बोर्ड आणि अर्थिंग कनेक्शन करणे शिकणे.
  6. मटेरियल निवड व खरेदी कशी करायची हे समजून घेणे.
  7. खर्चाचा अंदाज (आर्थिक नियोजन) लावणे शिकणे.
  8. टीमवर्क, टाइम मॅनेजमेंट आणि जबाबदारीने काम करणे शिकणे.

३) कृती (प्रक्रिया)

  1. सर्वप्रथम गेस्ट होस्टेलची पाहणी करण्यात आली.
  2. कुठे लाईट पॉईंट, फॅन पॉईंट, प्लग पॉईंट व स्विच बोर्ड येणार याचा डायग्राम काढण्यात आला.
  3. डायग्रामप्रमाणे लेझर मशीन वापरून अचूक मार्किंग करण्यात आले.
  4. मार्किंगनंतर पट्टी (PVC पट्टी) फिटिंग करून घेतली.
  5. आवश्यक मटेरियलची यादी तयार केली.
  6. गावामध्ये जाऊन वायर, स्विच, सॉकेट, MCB, बोर्ड, पट्टी इत्यादी मटेरियल खरेदी केली.
  7. खरेदी करताना योग्य दर्जाचे आणि योग्य रेटचे मटेरियल कसे निवडायचे हे शिकलो.
  8. पट्टीमध्ये योग्य साईजची वायर टाकून वायरिंग पूर्ण केली.
  9. स्विच बोर्ड भरले आणि कनेक्शन व्यवस्थित केले.
  10. MCB बोर्ड भरणे व त्याचे कनेक्शन शिकले.
  11. संपूर्ण वायरिंगनंतर अर्थिंग करण्यात आली.
  12. शेवटी सर्व पॉईंट्स चेक करून टेस्टिंग करण्यात आली.

४) निरीक्षण

  1. डायग्राम असल्यामुळे काम नियोजनबद्ध आणि सोपे झाले.
  2. लेझर मार्किंगमुळे काम अचूक आणि सरळ झाले.
  3. पट्टी फिटिंग योग्य केल्यामुळे वायरिंग नीट आणि सुरक्षित झाली.
  4. चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे वायरिंग टिकाऊ झाली.
  5. MCB मुळे सेफ्टी वाढली.
  6. अर्थिंग केल्यामुळे विद्युत धोक्याचा धोका कमी झाला.
  7. टीममध्ये काम केल्यामुळे वेळेचे योग्य नियोजन झाले.
  8. प्रत्यक्ष काम करताना आत्मविश्वास वाढला.

५) निष्कर्ष

या गेस्ट होस्टेल वायरिंग प्रोजेक्टमधून मला इलेक्ट्रिकल क्षेत्रातील खूप महत्त्वाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. मी मार्किंग, पट्टी फिटिंग, वायरिंग, बोर्ड भरणे, MCB बसवणे, अर्थिंग करणे हे सर्व काम स्वतः शिकले.
याशिवाय मटेरियल खरेदी, खर्चाचा अंदाज (आर्थिक ज्ञान), टाइम मॅनेजमेंट आणि टीमवर्क यासारख्या कौशल्यांचा विकास झाला.
हा प्रोजेक्ट माझ्या भविष्यातील इलेक्ट्रिकल कामासाठी खूप उपयोगी ठरेल आणि मला एक जबाबदार व कुशल इलेक्ट्रिशियन बनण्यास मदत करेल.

गेस्ट होस्टेल वायरिंग ची कॉस्टिंग

अ.क्रमालाचे नाव / साहित्यनग / मीटरदर (₹)एकूण किंमत (₹)
1Angle holder2530750
216 Amp Socket3120360
36 Amp Socket2340920
46 Amp Switch4820960
5ceiling roz530150
6bulb7w 9w7100700
7zero bulb340120
8tube light72001400
9ceiling fan316504900
10adapter725175
11exhaust fan313504050
12reguletar3220660
13insulation tape2010200
143 model460240
152 model350150
166 model8100800
1712 model3150450
18MCB16amp 40 mp4150930
19fusnaer1220240
20U=clamp540200
21square box3010300
22raud plag1020 packet200
23fix pipe10 RS.meter100
24tie1120 packet120
25MCB box1350350
262.5 wire(red)3370011100
271.5 wire(black)000
281.5 wire(red)416006400
291.0 wire(green)116001600
300.75en patti1050500
311.0en patti30501500
3250/60 scoru30260
3335/83100300
30000

एकूण मटेरियल खर्च = ₹30000 /-

Plan diagram